Join us  

अभ्यास करत नाहीत म्हणून मुलांना ट्युशन लावता? ४ सोप्या टिप्स; शिकवणीची गरजच पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 3:15 PM

4 Effective Ways to Improve Study Habits for Your Kids : पालकांनी ४ गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे; मुलांमध्ये अभ्यास करण्याची गोडी वाढेल

मुलांबाबत पालकांची एकच तक्रार असते (Study Habits). ती म्हणजे पाल्य वेळेवर अभ्यास करत नाही. काही मुलं अभ्यास करताना फार नखरे करतात. अभ्यास कर म्हटलं की, तोंड वाकडं करून बसतात (Child care). पूर्वी मुलं पालकांना घाबरून अभ्यास करायचे, पण आता परिस्थिती अगदी उलट आहे. त्यात मुलांचं अभ्यासापासून लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी जसे की मोबाईल, गेम्स, इंटरनेट यांची व्याप्ती वाढली आहे. अशावेळी मुलांचा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी करावं काय? असा प्रश्न निर्माण होतो.

मुलांचा घरी अभ्यास होत नाही म्हणून, पालक त्यांना ट्युशन लावतात. पण ट्युशन लावूनही मुलं अभ्यास करत नाहीत. जर ट्युशन न लावता मुलांनी अभ्यास करावा असं वाटत असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा(4 Effective Ways to Improve Study Habits for Your Kids).

मुलांसाठी वेळापत्रक बनवा

मुलांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून त्यांना सतत अभ्यास कर म्हणून, त्यांच्या मागे तगादा लावू नका. त्यांच्या खेळण्याच्या वेळेत मुलांना अभ्यास करायला सांगू नका. त्यांच्या रुटीननुसार टाईम टेबल तयार करा. अभ्यासाची वेळ निश्चित करा. त्या वेळेत मुलांना अभ्यास करायला सांगा.

तमन्ना भाटिया म्हणते, वाईट दिवस-वाईट माणसं अनेक गोष्टी शिकवतात, आपण मात्र विसरु नये की..

अभ्यासाचे वातावरण तयार करा

अभ्यास करण्यासाठी फक्त ठराविक वेळ किंवा टाईम टेबल गरजेचं नाही. अभ्यास करण्यासाठी तसे घरात वातावरणही तयार करा. मुलांची अभ्यास करण्याची जागा शांत आणि सकारात्मक ठेवा. मुलांना अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र खोली द्या. ज्यामुळे मुलांचं अभ्यास करताना लक्ष विचलित होणार नाही.

सोशल मिडीयाचा योग्य वापर

आजकाल मुलं फक्त शिकवणीवर अवलंबून राहत नसून, तर सोशल मिडीयाचाही वापर करतात. विविध विषयातील प्रश्न आणि सखोल माहितीसाठी मुलं सोशल मिडियाचा वापर करतात. त्यांना इंटरनेटचा पुरेपूर वापर करायला शिकवा.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

प्रेरणा देखील महत्वाची

मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन करत राहा. त्यांनी अभ्यासात केलेल्या प्रगतीपासून ते त्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करा. ज्यामुळे मुलांचे अधिक मन लावून अभ्यास करण्याची इच्छाशक्ती वाढेल.

टॅग्स :पालकत्वसोशल व्हायरल