Lokmat Sakhi >Parenting > वयात आलेल्या मुलांशी बोलताना पालक हमखास करतात ४ चुका, म्हणून मुलं आईबाबांशी बोलणं टाळतात

वयात आलेल्या मुलांशी बोलताना पालक हमखास करतात ४ चुका, म्हणून मुलं आईबाबांशी बोलणं टाळतात

4 Mistakes Parents Make With Teens and Tweens : मुलं मोठी झाली, वयात आली तर पालक त्यांच्याशी लहान मुलांसारखं वागतात आणि तिथेच नात्यात खटके उडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 05:19 PM2023-09-26T17:19:14+5:302023-09-26T17:19:46+5:30

4 Mistakes Parents Make With Teens and Tweens : मुलं मोठी झाली, वयात आली तर पालक त्यांच्याशी लहान मुलांसारखं वागतात आणि तिथेच नात्यात खटके उडतात

4 Mistakes Parents Make With Teens and Tweens | वयात आलेल्या मुलांशी बोलताना पालक हमखास करतात ४ चुका, म्हणून मुलं आईबाबांशी बोलणं टाळतात

वयात आलेल्या मुलांशी बोलताना पालक हमखास करतात ४ चुका, म्हणून मुलं आईबाबांशी बोलणं टाळतात

मुलांचे आणि पालकांचे नाते हे प्रेमळ आणि मायेचे असते. मुलांच्या ग्रोथमागे आपल्या पालकांचा मोठा हात असतो. पालकांचं प्रेम, सल्ले आणि योग्य दिशा दाखवल्यामुळेचं मुलं यशस्वी होतात. वयानुसार पालकांचे वागणे देखील बदलायला हवे. काही पालक मुलं वयात आल्यानंतरही, त्यांना लहान मुलांसारखी वागणूक देतात. त्यांना स्पेस देत नाही.

पर्सनल स्पेसमध्ये डोकावतात किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. ज्यामुळे मुलांची चीडचीड होते. किंवा ते कोणतीही गोष्ट समजून घेण्यास तयार होत नाही. जनरेशन गॅपमुळे देखील पालक आणि मुलांमध्ये एक भिंत निर्माण होते. ही भिंत जर आपल्याला ओलंडायची असेल तर, मुलांच्या या ४ काही गोष्टी समजून घ्यायला हवे(4 Mistakes Parents Make With Teens and Tweens).

प्रायव्हसी न देणं

मीडियम वेबसाइटनुसार, 'जर मुलं वयात येत असतील तर, प्रायव्हेट स्पेस देणं गरजेचं आहे. अनेक पालक मुलांना प्रत्येक गोष्टीत टोकतात. ज्यामुळे मुलं हट्टी होतात. किंवा पुढे जाऊन मुलं आपल्या पालकांची परवानगी घेत नाही. मुलं जेव्हा वयात येतात, तेव्हा शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही खूप बदल होण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत त्यांच्यावर विश्वास दाखवून समजावून सांगा. व काही गोष्टीत लक्ष ठेऊन प्रायव्हसी द्या.

तुमचीही मुलं मोबाईल फोनवर तासंतास घालवतात? ५ सोपे उपाय, सवय सुटेल - मुलं लागतील अभ्यासाला

मित्रांशी संबंध

अनेक पालकांना त्यांच्या मुलांचे आयुष्य त्यांच्या नियंत्रणात ठेवायचे असते. मुलांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मित्र निवडावेत यासाठी ते प्रयत्न करतात. पण मुलांना त्यांच्या गरजेनुसार मित्रांची गरज असते, हे त्यांना समजत नाही. त्यामुळे मित्र निवडताना त्यांना अडवू नका. त्यांना फक्त मित्रांबद्दल विचारपूस करा, खोलवर जाऊ नका.

स्वतःला परफेक्ट समजणे

कोणतीही व्यक्ती परिपूर्ण असू शकत नाही आणि प्रत्येक पालकाने हे स्वीकारले पाहिजे. जर आपण आपली चूक सर्वांसमोर मान्य करत नाही, किंवा त्यांची चूक सतत शोधून त्यांना दाखवत असाल तर, मुलं चिडचिडे होऊ शकतात. ज्यामुळे मुलं आतून स्वतः खचून जाऊ शकतात. किंवा तुमच्यापासून काही गोष्टी लपवूही शकता.

दर १० पैकी ६ टीनएज मुलींना आहे ॲनिमियाचा त्रास, वयात येतानाच ॲनिमिया झाला तर, डॉक्टर सांगतात..

पिढीतील बदल

अनेक पालकांना आपल्या पिढीचे पालकत्व आपल्या मुलांवर लादायचे असते. परंतु, वेळेनुसार आपले पालकत्व देखील बदलायला हवे. मुलांच्या पिढीतील बदल स्वीकारायला हवे. जर असे केले नाहीतर, मुलं तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. ते तुमच्यासोबत बोलणे टाळू शकतात.

Web Title: 4 Mistakes Parents Make With Teens and Tweens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.