Join us  

मुलं कॉन्फिडन्स गमावून बसतात कारण पालकांच्या ४ चुका, मुलं कॉन्फिडण्ट व्हायची तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 1:15 PM

4 Parenting Tips If you want Confident Child : आपण मुलांशी काहीवेळा नकळत चुकीचे वागतो, मात्र त्याकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज असते.

आपल्या मुलांमध्ये छान आत्मविश्वास असावा. त्यांनी न घाबरता, न कचरता सगळ्या गोष्टी कराव्यात असं पालक म्हणून आपल्याला कायम वाटतं. मग अगदी शाळेत कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायचे असो नाहीतर समाजात वावरताना एखादी गोष्ट करणं असो. मुलांनी कायम आत्मविश्वास बाळगून असावं अशी आपली इच्छा असते. पण मुलं कधी एखाद्या गोष्टीला घाबरतात किंवा पुढाकार घ्यायला नको म्हणतात. अशावेळी त्यांनी ती गोष्ट करणं त्यांच्या कसं फायद्याचं आहे, त्यातून त्यांना काय शिकायला मिळणार आहे आणि भविष्यात त्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो असं सगळं आपण त्यांना सांगतो. आपण हे सगळं सांगत असलो तरी त्यांच्यात ते रुजण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक असते. याबरोबरच आपण मुलांशी काहीवेळा नकळत चुकीचे वागतो, मात्र त्याकडे आवर्जून लक्ष देण्याची आणि त्यामध्ये सुधार करण्याची गरज असते. अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया (4 Parenting Tips If you want Confident Child)...

१. इतरांसमोर त्यांना अपमान वाटेल असं वागवू नका 

अनेकदा मुलं चुकीचं वागली किंवा आपल्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी काही केलं नाही की आपण त्यांना काहीतरी बोलतो किंवा हात उगारतो. ते चुकीचं वागले हे जरी खरं असलं तरी इतरांसमोर मुलांशी असं वागणं त्यांच्यासाठी अपमानास्पद असू शकतं. विशेषत: मुलांच्या मित्रमैत्रीणींसमोर वागताना जास्त काळजी घ्यायला हवी. कारण इतरांसमोर त्यांचा अपमान झाला तर त्यांच्या आत्मविश्वासावर त्याचा परीणाम होतो. 

(Image : Google)
  

२. मुलांना प्रमाणापेक्षा जास्त प्रोटेक्ट करु नये

अनेकदा मुलांना लागेल, काहीतरी होईल म्हणून आपण त्यांना जास्त प्रोटेक्ट करायला जातो. पण यामुळे त्यांच्या आतून येणाऱ्या गोष्टी दबल्या जातात. ते स्वत:ला एक्सप्लोअर करत असतील तर त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. मुलांची काळजी वाटणं ठिक आहे पण म्हणून त्यांना ओव्हर प्रोटेक्ट करणं योग्य नाही. ते त्यांच्या विकासाच्या आड येऊ शकतं. 

३. सतत परफेक्शनची अपेक्षा नको

आपल्या मुलांना सगळं यायला हवं असं वाटणं ठिक आहे. पण म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी अतिशय नीट आणि योग्य पद्धतीनेच करायला हव्यात अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे मुलांवर एकप्रकारचा ताण येऊ शकतो आणि त्याचा त्यांच्या कल्पकतेवर, क्षमतांवर चुकीचा परीणाम होण्याचीच शक्यता जास्त असते. 

(Image : Google)

४. सगळ्यांना आनंदी ठेवण्यास सांगू नका

आपण मोठे लोकही अनेकदा सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात बऱ्याच चुका करुन बसतो. सतत दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात आपला आतला आवाज आपण ऐकत नाही आणि त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर परीणाम होतो. म्हणूनच मुलांना सतत चांगलं वागण्याची आणि सगळ्यांना आनंदी ठेवण्याची सक्ती करु नका.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं