Join us  

मुलांच्या शाळेत पेरेण्ट्स मिटिंगमध्ये वर्गशिक्षकांना विचारा ४ प्रश्न, तरच कळेल मुलांची प्रगती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2024 2:53 PM

4 Questions to Ask in Your Child's School Parent-Teacher's Meeting : मुलांच्या शाळेत गेल्यावर शिक्षकांना नेमकं काय विचारावं हेच अनेक पालकांच्या लक्षात येत नाही.

मुलांच्या शाळेत पॅरेण्ट्स (Parent's Teacher's Meeting) मिटिंग होते. पॅरेण्ट्स मिटिंगमध्ये आईबाबा आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल वर्गशिक्षकेला प्रश्न विचारतात. शिक्षकही काही गोष्टी सांगतात (Parenting Tips). मात्र अनेकदा बोलणं मोघम होतं आणि मुलांची नेमकी वाढ, प्रगती, वागणं यातली सुधारणा कळत नाही. कारण नेमके प्रश्न विचारलेच जात नाहीत. तर तुम्ही मुलांच्या शिक्षकांना नेमकं काय विचाराल?(4 Questions to Ask in Your Child's School Parent-Teacher's Meeting).

मुलगा/मुलगी वर्गात कृतीशील असते का?

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, आपलं मुल वर्गात किती सक्रीय आहे? हा प्रश्न मिटिंगमध्ये आवर्जून विचारायला हवा. कारण यामुळे मुलं शिकवण्याकडे किती लक्ष देतात? विविध ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात का? यातून मिळणाऱ्या उत्तरामुळे मुलांची शिकण्याची क्षमता आणि आवड याची कल्पना येऊ शकते.

बाप म्हणून मला अपराधी वाटतंच, फरहान अख्तर सांगतो आईबाबा वेगळे होतात पण मुलं मात्र..

कोणते विषय आवडते/कोणते कच्चे?

काही मुलांना निवडक विषय फार आवडतात. आणि एखाद विषयामध्ये सुधारणा करावी लागते. अशावेळी आपण वर्गशिक्षकेला याबद्दल प्रश्न विचारू शकता. सगळ्याच विषयामध्ये सर्वांगीण विकास कसा करता येईल? याबद्दलची माहिती पालकांना मिळेल. जेणेकरून पालक घरी देखील त्या विषयाचा अभ्यास घेऊ शकतील.

अभ्यास सोडून काय आवडतं शाळेत?

अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना इतरही काही उपक्रम/ॲक्टिव्हिटित रस असतो. ते नेमके काय, कसा उत्साह असतो. इतरांशी कसं जमवून घेतो ते विचारा.

सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात 'या' पद्धतीने बदाम खाल तर मिळेल पोषण; अन्यथा कर्करोग आणि..

मुलं आपल्या सामानाची व्यवस्थित काळजी घेतात का?

मुलं आपल्या वस्तूंची नीट काळजी घेतात का? यावरून मुलं घेत असलेली जबाबदारी आणि आत्मनिर्भरता दिसून येईल.

टॅग्स :पालकत्वशिक्षकसोशल व्हायरल