Lokmat Sakhi >Parenting > लहान वयातच केसांची मुळे पांढरी झाली? केस गळतात? मुलांना खायला द्या ४ पदार्थ-केस होतील दाट

लहान वयातच केसांची मुळे पांढरी झाली? केस गळतात? मुलांना खायला द्या ४ पदार्थ-केस होतील दाट

4 Superfoods To Avoid Premature Greying in Kids : लहान मुलांचे केस पांढरे होणारच नाही, फक्त न चुकता ४ गोष्टी खायला द्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 01:01 PM2024-02-27T13:01:26+5:302024-02-27T13:02:09+5:30

4 Superfoods To Avoid Premature Greying in Kids : लहान मुलांचे केस पांढरे होणारच नाही, फक्त न चुकता ४ गोष्टी खायला द्या..

4 Superfoods To Avoid Premature Greying in Kids | लहान वयातच केसांची मुळे पांढरी झाली? केस गळतात? मुलांना खायला द्या ४ पदार्थ-केस होतील दाट

लहान वयातच केसांची मुळे पांढरी झाली? केस गळतात? मुलांना खायला द्या ४ पदार्थ-केस होतील दाट

वाढत्या वयानुसार केसांची समस्या वाढत जातात. पण जर लहानपणीच केस पांढरे होऊ लागले तर? केसांची योग्य निगा न राखल्यास केस गळणे, केसात कोंडा, केस पांढरे यासह इतर समस्या निर्माण होतात. पण सध्या लहान मुलांचे केस वयाआधीच पांढरे होऊ लागले आहेत. यामागे अनहेल्दी डाएट आणि केसांची योग्य निगा न राखल्यामुळे केस पांढरे होत जातात. बऱ्याचदा लहान मुलं काही पदार्थ खाणं टाळतात (Hair Care Tips). पण त्यातील पौष्टीक पदार्थ आरोग्य आणि केसांसाठी फायदेशीर ठरतात (Grey Hairs).

जर केसांची योग्य वाढ आणि केस कधीच पांढरे होऊ नये असे वाटत असेल तर, लहान मुलांना न चुकता ४ गोष्टी खायला द्या. याची माहिती आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसर यांनी शेअर केली आहे(4 Superfoods To Avoid Premature Greying in Kids).

केस पांढरे होऊ नये म्हणून..

आवळा

आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे केस लवकर पांढरे होत नाही. मुलांना आवळा ज्यूस प्यायला द्या. जर आपल्याला आवळा ज्यूस आवडत नसेल तर, आवळा कॅण्डी खा. किंवा आपण आवळ्याचा रस कोमट पाण्यात मिसळून रिकाम्या पोटी पिऊ शकता. याचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

पालकांच्या ४ चुकांमुळे मुलं खचतात, गुरु गौर गोपाल दास सांगतात; करिअर ग्रोथसाठी पालकांनी..

काळे तीळ

केसांसाठी काळ्या तिळाचा वापर फायदेशीर ठरू शकते. यामुळे केसांमध्ये रक्ताभिसरण चांगले होते. शिवाय केसांची योग्य वाढ होते. मुख्य म्हणजे तिळामध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ सारखे गुणधर्म असतात, जे केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जातात.

मनुके

मनुके हे आयर्नचे पॉवरहाउस आहे. त्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. शिवाय त्यातील मुख्य पौष्टीक घटक मिनरल्स अॅब्जॉर्ब करण्यास फायदेशीर ठरते. यासह निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. आपण मुलांना रोज सकाळी भिजवलेले काळे मनुके खायला देऊ शकता.

बाबाही बनेल मुलांचा जीवाभावाचा दोस्त! करा स्वत:त ४ सोपे बदल-बापलेकरांचं नातं होईल घट्ट

कडीपत्ता

कडीपत्त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि बी १२ आढळते. याशिवाय कडीपत्ता लोह आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. आहारात कडीपत्त्याचा समावेश केल्याने केस गळणे कमी होते. यासह केस पांढरे होण्यापासून रोखते, आणि केसांची वाढ सुधारते. आपण कडधान्य, पुलाव, सूप, भाजी यासह इतर पदार्थांमध्ये कडीपत्त्याचा समावेश करू शकता. आपण मुलांना आवळा-कडीपत्त्याची चटणी देखील खायला देऊ शकता.

Web Title: 4 Superfoods To Avoid Premature Greying in Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.