कॅल्शियम आणि प्रोटीनचे हेल्दी मेळ म्हणजे दुध. लहानपणीपासून आपल्याला दुध पिण्याची सवय लावली जाते. दुध प्यायल्याने शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. उच्च दर्जाची प्रथिने आणि जीवनसत्त्व 'ब' च्या व्यतिरिक्त दूधात कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ड' आढळते, जे हृदय सुदृढ ठेवते, यासह आपले वजन सुद्धा नियंत्रित ठेवण्यात मदत करते.
दूधामध्ये पोटॅशियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटीऑक्सीडेंटससुद्ध असतात. यामुळे हाडे आणि दात अतिशय मजबूत राहतात. दुध केव्हाही, कधीही, कुठेही पिणे उत्तम. परंतु दूधासोबत इतर काही पदार्थांचं सेवन करणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं हितावह नसतं. त्यामुळं आपल्या पाल्यांना जर दुध प्यायल्या देत असाल तर, त्याच्यासोबत या ४ गोष्टी देऊ नका.
दूधासोबत व्हिटामिन सी चे फळे देऊ नका
संत्री, लिंबू, अननस, मोसंबी यासारख्या फळांसोबत दुध प्यायल्या देऊ नये. अशा फळांमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. जर हे फ्रूट दूधात मिसळल्यास पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते लिंबूवर्गीय फळांमध्ये असलेले एन्झाईम्स आणि अॅसिड्स पचन बिघडवण्याचे काम करतात.
दुध आणि केळ
बनाना शेक हे उन्हाळ्यातील लोकप्रिय पेय आहे, परंतु मुलांना या मिश्रणापासून दूर ठेवले पाहिजे. डॉक्टरांच्या मते, केळी आणि दुध एकत्र प्यायल्याने शरीरात टॉक्सिन्स तयार होतात. यासोबतच आयुर्वेदात असेही म्हंटले आहे की दुध आणि केळी एकत्र प्यायल्यामुळे पचन आणि चयापचय क्रिया मंदावते.
दुध आणि द्राक्षे
द्राक्षे चवीला गोड आणि आंबट असतात आणि ती अम्लीय देखील असतात. म्हणूनच दुध आणि द्राक्षे दोन्ही एकत्र खाऊ नये. अशाने मुलांमध्ये पोटदुखी, जुलाब आणि पोट फुगणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
दही आणि फळ
दूधाव्यतिरिक्त, दही देखील एक दुग्धजन्य पदार्थ आहे, जे फळांसोबत देखील खाल्ले जाते. बरेच लोक स्नॅक म्हणून दही त्यासोबत मिसळलेली फळे खातात. हे मिश्रण पोटासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी चांगले नाही. दही हे एक प्रोबायोटिक आहे, जे चांगल्या बॅक्टेरियांनी भरलेले आहे. त्यामुळे दही सोबत फळ खाऊ नये.