Lokmat Sakhi >Parenting > मुलांना गुड टच - बॅड टच कसे समजावून सांगाल? पालकांनी करायला हव्या ४ गोष्टी

मुलांना गुड टच - बॅड टच कसे समजावून सांगाल? पालकांनी करायला हव्या ४ गोष्टी

4 Tips for Teaching Children Good Touch and Bad Touch : पालक मुलांशी काही गोष्टी बोलतच नाहीत आणि मुलांना चुकीची माहिती मिळते, तसे होवू नये..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2023 05:33 PM2023-12-17T17:33:15+5:302023-12-18T15:34:24+5:30

4 Tips for Teaching Children Good Touch and Bad Touch : पालक मुलांशी काही गोष्टी बोलतच नाहीत आणि मुलांना चुकीची माहिती मिळते, तसे होवू नये..

4 Tips for Teaching Children Good Touch and Bad Touch | मुलांना गुड टच - बॅड टच कसे समजावून सांगाल? पालकांनी करायला हव्या ४ गोष्टी

मुलांना गुड टच - बॅड टच कसे समजावून सांगाल? पालकांनी करायला हव्या ४ गोष्टी

लहान मुलांना खूप प्रश्न पडतात. वयानुसार आपण आपल्या मुलांना माहिती देत राहतो. त्यांच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये, ते कायम सुरक्षित राहावे. या गोष्टीची त्यांना चिंता सतावत असते. अशावेळी मुलांच्या सुरक्षेसाठी पालक काही खास पाऊले उचलतात. यासह त्यांना गुड टच बॅड टचची माहिती देणंही गरजेचं आहे. मुलांची जशी समज वाढते, तशी त्यांना पालकांनी अनेक गोष्टींची माहिती द्यायला हवी.

लहान मुलांचे मन कोमल आणि नाजूक असते. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने मुलांना वाईट नजर, गुड टच बॅड टचची  माहिती द्या (Parenting Tips). पण त्यांना याची माहिती कशी द्यावी? कोणत्या वयात मुलांना गुड टच बॅड टच बद्दल सांगावे?(4 Tips for Teaching Children Good Touch and Bad Touch).

सीएस, मॉट चिल्ड्रन हॉस्पिटल नॅशनल पोल ऑन चिल्ड्रन्स हेल्थनुसार, अनेक पालक आपल्या मुलांशी गुड टच बॅड टचबद्दल बोलण्यास टाळतात. याबद्दल आपण त्यांना कशी माहिती द्यावी, याचा विचार करतात. पालक अनेकदा मुलांना स्वतःचे सरंक्षण कसे करावे, याची माहिती देतात. रस्ता क्रॉस कसे करावे, सीटबेल्ट कसे लावावे, कोणा अनोळखी व्यक्तीने काही दिले तर खाऊ नये, असे आपण त्यांना सांगत असतो. पण गुड टच बॅड टचबद्दल बोलणं टाळतो. त्यांना याबद्दल योग्य वयात माहिती देणं गरजेचं आहे.'

दीपिका पादुकोण ट्रोल होतेय, मात्र ओपन रिलेशनशिपचा निर्णय अनेकजण का घेतात? कमिटमेण्टची भीती की..

गुड टच बॅड टच म्हणजे काय?

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, काही स्पर्शातून प्रेमाची भावना कळते. सुरक्षित वाटते. त्याला गुड टच असे म्हणतात. त्यांना गुड टच हे स्पर्शातून समजावून सांगा. जसे की, मिठी मारणे, मायेने गालावर किस करणे. त्यांना सांगा की जर एखाद्या व्यक्तीने हात पकडला आणि तुम्हाला चांगलं वाटलं तर तो व्यक्ती चांगला आहे. काही स्पर्श आपल्याला आवडत नाही. अनेकदा आपल्याला या स्पर्शामुळे अस्वस्थ वाटते. अशा वेळी त्याला बॅड टच असे म्हणतात, हे समजावून सांगा.

शरीराच्या अवयवांची माहिती द्या

मुलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सची माहिती देणे गरजेचे आहे. जर कोणा व्यक्तीने प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर, त्यांना त्याच वेळी ओरडणे किंवा विरोध करण्यास शिकवा. काही लोकं चॉकलेट किंवा खेळण्याचं आमिष दाखवून मुलांना उचलून घेतात, त्यांना अयोग्यरीत्या स्पर्श करतात. अशावेळी अमिषाला बळी न पडता, तेथून पळ कसा काढायचा हे शिकवा. शिवाय घाबरून न बसता, या गोष्टी पालकांसोबत शेअर करण्यास सांगा.

मुलांसोबत टाईम स्पेंड करा

अनेक वेळा कामाच्या व्यापामुळे पालकांना मुलांसोबत टाईम स्पेंड करायला मिळत नाही. मुलांना इच्छा असूनही त्यांच्या भावना किंवा समस्या पालकांसमोर मांडता येत नाहीत. अशा स्थितीत मुलांसोबत गप्पा मारा, त्यांना नियमित दिनचर्याबद्दल विचारा. मुलांसोबत वेळ घालवा. असे केल्याने तुमच्यात एक बॉण्ड तयार होईल. ज्यामुळे मुलं तुम्हाला कोणी बॅड टच केलं तर, शेअर करण्यात घाबरणार नाहीत.

लग्नाचा निर्णय घेताना तरुणीने भावी नवऱ्याला विचारायला हवा एक प्रश्न, उत्तर चुकले तर...

मुलांच्या वागणुकीकडे लक्ष द्या

अनेकदा लहान मुलांना गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती नसते. अशावेळी जर त्यांना कोणी चुकीच्या ठिकाणी स्पर्श केलं, साहजिक त्यांना भीती वाटेल. ते या गोष्टी उघडपणे कोणाकडेही व्यक्त करू शकत नाहीत. अशा स्थितीत मुलं खचतात. या गोष्टींचा त्यांच्या मानसिक आणि अभ्यासावरही परिणाम होतो. त्यामुळे मुलांच्या वागण्याकडे नेहमी लक्ष द्या.

आई-वडिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे

- मुलं जेव्हा ३ ते ४ वर्षांची होतील, तेव्हाच त्यांना गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती द्या.

- इतर कोणाच्याही समोर त्यांचे कपडे काढू नका.

- मुलांना समजावून सांगा की तुमच्याशिवाय कोणीही त्यांच्या प्रायव्हेट पार्टसला स्पर्श करू शकत नाही.

- जर डॉक्टरांनी पालकांच्या उपस्थितीत त्यांच्या शरीराला स्पर्श केला तर, तो एक गुड टच आहे.

- मुलांना सांगा की जवळचे नातेवाईक देखील त्यांच्या प्रायव्हेट पार्टसला स्पर्श करू शकत नाहीत.

- पालकांना गुड टच बॅड टचबद्दल माहिती देताना अडचण येत असेल तर, त्यांना व्हिडिओद्वारे समजावून सांगा.

Web Title: 4 Tips for Teaching Children Good Touch and Bad Touch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.