आजकाल लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला मोबाईल फोनचं व्यसन लागलं आहे (Mobile Phone). सोशल मिडीयाचं व्यसन इतकं वाढलं आहे की, मुलांना मोबाईल फोन सोडवत नाही (Addiction). लहान मुले फोनवर काय बघतात हे पूर्णपणे त्यांच्या पालकांवर अवलंबून असतं. मुलांची फोनची सवय मोडायची असेल तर आधी पालकांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे (Parenting).
मुलांची मोबाईल फोनची सवय मोडण्यासाठी बालरोगतज्ज्ञ डॉक्टर दीपिका रुस्तगी यांनी सांगितलेल्या काही गोष्टी फॉलो करून पाहा. यामुळे मुलांची मोबाईल फोन पाहण्याची सवय सुटेल आणि, आनंदाने अभ्यासाला बसतील(4 Tips on How to keep a child away from mobile phones).
टाईम टेबल सेट करा
मुलांची स्क्रीन टायमिंग कमी करण्यासाठी त्यांच्या दिनचर्येत बदल करा. दिवसभरात तासभर मोबाईल फोन पाहण्याची मुभा द्या. हा नियम मुलांनी पाळावा म्हणून पालकांनी स्ट्रीक्ट व्हायला हवे. मुलांना विविध गोष्टींमध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल
विविध गोष्टींमध्ये व्यस्त ठेवा
मुलांना विविध गोष्टींमध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. विविध प्रकारचे खेळ, पुस्तक वाचन, किंवा इतर अॅक्टिव्हिटीमध्ये मुलांना गुंतवून ठेवा. डान्स, मैदानी खेळ, त्यांचा आवडता जोपासण्यासाठी मदत करा. यामुळे मुलं आवडीने मोबाईल फोन सोडून छंद जोपासतील.
फोन स्वतःपासून दूर ठेवा
जेव्हा मुल आपल्यालासोबत असेल तर, त्यांच्यासमोर मोबाईल फोनचा वापर करू नका. त्यांच्यासोबत बोला, त्यांच्यासोबत विविध खेळ खेळा, नवनवीन गोष्टी सांगा. यामुळे मुले आपोआप मोबाईल फोनपासून दूर राहतील.
मित्रांसोबत खेळायला पाठवा
मुलांना मित्रांसोबत खेळायला पाठवा. मुलांसोबत रमतील, खेळतील ज्यामुळे मोबाईल फोन पाहण्याचं व्यसन सुटेल.
तेलकट पदार्थ खाणे बंद करूनही वजन घटेना? ' हे ' ४ तेल स्वयंपाकासाठी वापरा, वजन वाढणारच नाही
मोबाईल फोनचं व्यसन वाईट; कारण..
मोबाईल फोनचं व्यसन अत्यंत वाईट कारण, यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे विचारांमध्येही बदल येतात. त्यामुळे मुलांना फोनपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी स्वतः जागरूक राहणे गरजेचे आहे.