Join us  

आईबाबांनी फक्त ४ गोष्टी केल्या तर मुलं आयुष्यात डगमगणार नाहीत-खचणार नाहीत, जन्मभराची काळजी संपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 10:00 AM

4 Ways to Boost Your Child's Self-Esteem (for Parents) : चांगले आईबाबा होणं, म्हणजे मुलांसाठी नेमकं काय करायचं?

आत्माविश्वासाच्या (Self - Esteem) कमतरतेमुळे बऱ्याच गोष्टींमध्ये नुकसान होते (Parenting Tips). जीवनात बदल घडवण्यासाठी किंवा काही साध्य करण्यासाठी आत्मविश्वास (Confidence) हवाच. आपण पाहिलं असेल फक्त मुलंच नाही, मोठे व्यक्तीही चारचौघात बोलताना घाबरतात, लाजतात. किंवा जास्त विचार करतात.

आपली मुलं सगळ्याच गोष्टींबाबत कॉन्फीडन्ट नसतात. पण त्यांचा कॉन्फीडन्स वाढवणं हे पालकांच्या हातात आहे. कॉन्फीडन्स हे एकाच दिवशी वाढत नाही. यासाठी आधीपासून पालकांना मेहनत घ्यावी लागते. आपल्या मुलांमध्ये बरीच क्षमता असते. पण हिरा परखणं हे आपल्या हातात आहे. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा पाहा(4 Ways to Boost Your Child's Self-Esteem (for Parents)).

जेवणानंतर 'ही' चूक केली तर पश्चाताप अटळ, वजन वाढते झरझर! ५ मिनिटं ‘एवढं’ करा...

'या' गोष्टीमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो

किड्स हेल्थच्या मते, 'एखाद्या मुलाला जेव्हा आपण सकरात्मक अटेन्शन आणि भरपूर प्रेम देतो. तेव्हा मुलांमधला आत्मविश्वास हा बुस्ट होतो. जेव्हा पालक मुलांकडे लक्ष देतात, त्यांना नवनवीन गोष्ट करताना टोकत नाही. तेव्हा मुलं आनंदाने प्रत्येक गोष्ट करतात. जर मुलांना काही गोष्टींमध्ये अपयश मिळाले तर, त्यांना प्रोत्साहन द्या.

मुलांना वेळ द्या

मुलांना त्यांच्या पालकांच्या सहवासाची गरज असते. त्यामुळे मुलांसोबत वेळ काढून नवनवीन गोष्टी शिकवा. मुलांच्या ज्ञानात भर पालकांनी शेअर केलेल्या गोष्टींमुळे पडेल. त्यामुळे कितीही बिझी शेड्युल असले तरी, त्यांच्यासाठी वेळ काढा.

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

मुलांना इतरांसोबत मिळून - मिसळून राहायला शिकवा

मुलांना सुरुवातीपासूनच कौटुंबिक कार्यात घेऊन जा. मुलांची परिवारातील इतर सदस्यांसोबत भेट घडवून आणा. यामुळे मुलं आपोआपच लोकांशी जुळवून घेण्याची कला आत्मसात करतील. विविध लोकांना भेटल्यावर मुलं २ गोष्टी शिकतील. यासह त्यांचा आत्मविश्वासही वाढेल.

कौतुक करा

मुलांनी घेतलेल्या निर्णयांचे कौतुक करा. कौतुक ऐकल्यानंतर मनात असलेली भीती निघून जाईल. ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल. 

टॅग्स :पालकत्वमानसिक आरोग्य