Lokmat Sakhi >Parenting > अभ्यास करूनही कमीच मार्क मिळतात? ४ पद्धती मुलांना शिकवा,अभ्यासाला बसा म्हणावंच लागणार नाही..

अभ्यास करूनही कमीच मार्क मिळतात? ४ पद्धती मुलांना शिकवा,अभ्यासाला बसा म्हणावंच लागणार नाही..

4 Ways To Make Studies Interesting For Children : जर तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या तर शाळेच्या इतर स्पर्धांमध्येही मुलं पहिला नंबर मिळवतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 08:13 PM2024-11-13T20:13:05+5:302024-11-14T16:58:32+5:30

4 Ways To Make Studies Interesting For Children : जर तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या तर शाळेच्या इतर स्पर्धांमध्येही मुलं पहिला नंबर मिळवतील.

4 Ways To Make Studies Interesting For Children How To Motivate Child For Studies | अभ्यास करूनही कमीच मार्क मिळतात? ४ पद्धती मुलांना शिकवा,अभ्यासाला बसा म्हणावंच लागणार नाही..

अभ्यास करूनही कमीच मार्क मिळतात? ४ पद्धती मुलांना शिकवा,अभ्यासाला बसा म्हणावंच लागणार नाही..

आपल्या मुलानं एक चांगला विद्यार्थी बनवं असा विचार तुम्ही करत असाल तर त्यांची शिकवणी फक्त शाळेच्या भिंतींपुरता  मर्यादित ठेवू नका (How To Motivate Child For Studies).  मुल जी काही कौशल्य शिकतात ती त्यांच्या बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी महत्वाची असतात. मुलं दिवसरात्र अभ्यास करतात तरी त्यांच्या वागण्यात हूशारी दिसत नाही असं अनेकदा होतं. जर तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या तर शाळेच्या इतर स्पर्धांमध्येही मुलं पहिला नंबर मिळवतील. (4 Ways To Make Studies Interesting For Children)

आपल्या मुलांना शालेय शिक्षणाच्या पुस्तकांबरोबरच न्युज पेपर, मॅग्जीन वाचण्यासाठी प्रेरणा द्या. ज्यामुळे त्यांना जगभरातील घटनांबाबत माहिती मिळेल. यामुळे त्यांचे जनरल नॉलेज चांगले राहते. याव्यतिरिक्त  घरातल्या निर्णयात त्यांचा सल्ला घ्या. जेणेकरून त्यांच्यातील निर्णय घेण्याची क्षमता चांगली होईल. यामुळे मुलं साहसी होतील.

हिवाळ्यात रोज खा रताळी, व्हिटामिन-फायबरचे पॉवरहाऊस-कतरिना कैफच्याही डाएटमधला खास आवडता पदार्थ

मुलांना ज्या गोष्टीत रस आहे यात तुम्हीही रस दाखवा. जर मुलांना चित्र काढण्यात किंवा स्विमिंगमध्ये रस असले तर त्यांना त्याबाबत अधिक माहिती शोधण्यास सांगा. इंटरनेटवर दाखवली जाणारी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होईल याशिवाय नवीन गोष्टी शिकण्यास उत्साह दाखवतील. 

मुलांना ग्रे़ड किंवा टेस्ट स्कोरबद्दल विचारण्याऐवजी मुलं शाळेत काय शिकतात याबाबत विचार करा. त्यांच्या आवडत्या विषयाबाबत नवीन गोष्टी शिकवू शकता आणि त्यांना आपल्या भाषेत लिहायला शिकवा. मुलांना शाळेचे पेपर आणि असाईनमेंटस शिकण्यास मदत करा जेणेकरून मुलांना ओव्हरलोडेड वाटणार नाही. याव्यतिरिक्त मुलांशी नेहमी कनेक्टेड राहा.

दातांवर पिवळा-जाड थर दिसतो? रामदेव बाबा सांगतात १ आयुर्वेदीक उपाय, पांढरेशुभ्र चमकतील दात

मुलांच्या चांगल्या वाढीसाठी घरातलं वातावरण चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही मुलांच्या अभ्यासासाठी विशेष रूम तयार करा. मुलांच्या स्टडी टेबलवर बॉटल, पेन  बॉक्स, काही क्रिएटिव्ह वस्तू ठेवा जेणेकरून त्यांचे अभ्यासात मन लागेल आणि अभ्यासाची गोडी वाढेल.

Web Title: 4 Ways To Make Studies Interesting For Children How To Motivate Child For Studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.