Join us  

मुलांचा मेंदू तल्लख होण्यासाठी करा ५ गोष्टी; आईबाबांशी मुले बोलतील मनातले आणि होतील आनंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 10:40 AM

5 Activities that boost child’s brain and helping you bond with them : या सगळ्या अॅक्टीव्हीटीजमध्ये मुलं मनापासून एन्जॉय करतात.

आपल्या मुलाचा मेंदू तल्लख असावा, त्याने अभ्यासात आणि इतर सगळ्याच गोष्टींत हुशार असावे असे प्रत्येक पालकांना वाटक असते. यासाठी आपण मुलांना लहान वयापासूनच काही ना काही नवीन गोष्टी शिकवत असतो, सांगत असतो. हे मुलांच्या मेंदूपर्यंत कितपत जाते हे कदाचित आपल्याला समजत नाही. मात्र त्याचा मुलांच्या वाढीवर निश्चितच परीणाम होत असतो. मुलांच्या मेंदूची वाढ चांगली व्हावी आणि मेंदू तल्लख व्हावा यासाठी तसेच मुलांसोबतचा आपला बाँड चांगला राहावा यासाठी अगदी सोप्या अशा अॅक्टीव्हीटी कोणत्या ते आज आपण पाहणार आहोत. पॅरेंटींग विथ ब्रेनिफाय या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून मुलांसाठी कोणत्या अॅक्टीव्हिटी करायला हव्यात, पाहूया...

१. साबणाचे फुगे बनवणे आणि ते पकडण्याचा प्रयत्न करणे 

२. मुलांसोबत लपाछपी खेळणे

(Image : Google)

३. उशांचा वापर करुन किल्ला तयार करणे

४. मुलांसोबत गाण्यांवर डान्स करणे 

५. मुलांसोबत पाण्यात खेळणे 

या सगळ्या अॅक्टीव्हीटीजमध्ये आपण मुलांसोबत त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. यामुळे मुलं खूश होतात आणि त्यांचे आपल्यासोबतचे बाँडींगही सुधारण्यास मदत होते. इतकेच नाही तर फुगे, पाणी, उशा यांसोबत खेळायला तसेच डान्स करायला आणि लपाछपी खेळायला मुलांना कायमच आवडते. या सगळ्या अॅक्टीव्हीटीजमध्ये मुलं मनापासून एन्जॉय करतात. त्यामुळे या अॅक्टीव्हीटीज करण्याचा मुलांचा मेंदू तल्लख होण्यासाठीही फायदा होतो. 

आपण घरात असलो की मुलांसोबत नेहमीच वेगवेगळे खेळ खेळण्याचा प्रयत्न करत असतो. पण सतत पेपरवरच्या किंवा इतर अॅक्टीव्हीटी करणे, पेंटींग करणे यांसारख्या गोष्टींचा मुलांना कंटाळा येऊ शकतो. वरील अॅक्टीव्हीटीज या आपल्याला एकमेकांशी खेळण्यास भाग पाडणाऱ्या असल्याने त्यामुळे मुलांना नेहमीपेक्षा जास्त मज्जा येते. तेव्हा अगदी सोप्या अशा या अॅक्टीव्हीटीज नक्की करुन पाहा. तुम्हाला काही दिवसांतच मुलांमध्ये फरक लक्षात येईल.     

टॅग्स :पालकत्वलहान मुलं