Lokmat Sakhi >Parenting > तुम्हालाही वाटतं की आपलं मूल हट्टी आहे? ५ सवयी बदला, मुलांचा हट्टीपणा होईल कमी

तुम्हालाही वाटतं की आपलं मूल हट्टी आहे? ५ सवयी बदला, मुलांचा हट्टीपणा होईल कमी

5 Bad Habits In Children Know The Reasons : मुलांच्या वर्तनात अचानक बदल होतात ज्यामुळे आई वडील दोन्ही त्रस्त होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 04:53 PM2024-08-18T16:53:32+5:302024-08-19T12:39:21+5:30

5 Bad Habits In Children Know The Reasons : मुलांच्या वर्तनात अचानक बदल होतात ज्यामुळे आई वडील दोन्ही त्रस्त होतात.

5 Bad Habits In Children Know The Reasons And Figure Out Effective Solution Tips For Parents With a clingy Toddlers | तुम्हालाही वाटतं की आपलं मूल हट्टी आहे? ५ सवयी बदला, मुलांचा हट्टीपणा होईल कमी

तुम्हालाही वाटतं की आपलं मूल हट्टी आहे? ५ सवयी बदला, मुलांचा हट्टीपणा होईल कमी

जगातल्या प्रत्येक आई वडीलांना असं वाटतं की आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना चांगल्या सवयी लावव्यात पण काही मुलं खूपच जिद्दी असतात. (Tips For Parents With a clingy Toddlers) याच कारणामुळे त्यांना आई-वडीलांसोबत राहून राग येऊ लागतो. (Parenting Tips) मुलांच्या वर्तनात अचानक बदल होतात ज्यामुळे आई वडील दोन्ही त्रस्त होतात. मुलं चिडचिड करता आणि ओरडू लागतात. मुलांच्या हट्ट करण्यामागे अनेक कारणं  असू शकतात. (5 Bad Habits In Children Know The Reasin And Figure Out Effective Solution Tips For Parents With a clingy Toddlers)

 काम शिकवायला हवं

आई वडिलांनी मुलांना आपल्या रूटीनच्या हिशोबानं प्रत्येक काम शिकवायला हवं. जेव्हा मुल हळूहळू मोठं होतं तेव्हा त्याच्यात शिस्त यायला सुरूवात होते आणि मुलं आपल्या रुटीनच्या हिशोबानं काम करतात. एक रूटीन तयार करून द्या. ज्यामुळे मुलांमध्ये शिस्त येईल.

निगेटिव्ह, पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी सांगा

तुमच्या मुलांनी जर काही चुकीचे केले तर त्याबाबतीत त्यांना समजावून सांगा त्यांचे कौतुक करा. मुलांना निगेटिव्ह व्यवहार न करता पॉझिटिव्ह कसं वागायचं ते शिकवा. मुलांनी काही चांगले केले तर त्यांचे कौतुक करा जेणेकरून ते  अजून चांगली कामं करण्यास प्रोत्साहीत होतील.

डोक्यावरचे केस पांढरे झालेत? ना डाय ना हेअर कलर; 3 घरगुती उपाय करा, दाट-काळे होतील केस

मुलांची प्रत्येक गोष्ट ऐकू नका

मुलांचं तुम्ही जितकं ऐकाल तितकीच मुलं हट्टी होत जातील. तुमचं  मुल १० गोष्टी सांगत असेल तर त्यापैकी ७ किंवा ८ गोष्टीच करा. कारण जर तुम्ही मुलाचं सगळं ऐकत गेलात किंवा त्यांच्या मनासारखं करत गेलात तर त्यांनासुद्धा तिच सवय लागेल.

श्रावणात फुटाणे खाण्याची खास परंपरा, फुटाणे सालांसह खावेत की नाही? तब्येतीसाठी पाहा फायदेशीर काय

कशासाठीही नाही म्हणत असाल तर त्याचे कारण सांगा

आई वडिलांना आपल्या मुलांच्या भावना समजायला हव्यात.  अनेकदा आपण मुलांना चुकीचं करण्यापासून रोखतो तेव्हा त्यांना गोष्टी मागचं कारण समजावून सांगा. मुलं जर चुकीचं काम करत असतील तर याचं कारण सांगायला विसरू नका. त्यांना चूक, बरोबर यातील फरक समजावून सांगा.

कुटुंबातील वातावरण चांगले ठेवा

मुलं आपल्या कुटूंबातील वातावरणातून खूप काही शिकत असतात. म्हणूनच मुल शांत व्हायला हवं, त्यानं  जास्त हट्ट करू नये यासाठी आई वडीलांनी प्रयत्नरत राहायला हवं. आपल्या स्वभावात बदल करावा. मुलांनी पाहिलं की आई वडील खूप जिद्दी आहे आणि कोणत्याही गोष्टीवर अडून राहतात तर मुलंसुद्धा तेच करतील समान वातावरण ठेवणं गरजेचं आहे.
 

Web Title: 5 Bad Habits In Children Know The Reasons And Figure Out Effective Solution Tips For Parents With a clingy Toddlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.