Lokmat Sakhi >Parenting > मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल

मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल

5 Brain Foods For Kids :  स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांच्या खाण्यापिण्यात कोणते बदल करावेत ते पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 11:25 AM2024-02-12T11:25:34+5:302024-02-12T16:23:30+5:30

5 Brain Foods For Kids :  स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांच्या खाण्यापिण्यात कोणते बदल करावेत ते पाहूया.

5 Brain Foods For Kids : 5 Foods To Include In Kids Diet For A Sharp Brain According to Science | मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल

मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल

आपली मुलं अभ्यासात, वागण्या बोलण्यात हूशार व्हावीत असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. यासाठी ते आधीपासूनच वेगवेगळे प्रयत्न करत असतात. (Parenting Tips) ब्रेन डेव्हलपमेंट ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. (Brain Foods For Kids) जी मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरते. हेल्दी  आहार गरजेचा असतो.  स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांच्या खाण्यापिण्यात कोणते बदल करावेत ते पाहूया. (Foods To Include In Kids Diet For A Sharp Brain)

१) हिरव्या भाज्या

UCLA हेल्थच्या रिपोर्टनुसार मुलं भाज्या खायला नाक मुरडत असले तरीही त्यांच्या आहारात भाज्यांचा समावेश असायलाच हवा.  स्मूदीज, पास्ता या पदार्थांमध्ये भाज्या घालून द्या किंवा सॅण्डविचमध्ये त्यांना या भाज्या द्या. ज्यामुळे रक्ताची  कमतरता भरून निघते आणि मेंदूचे मुख्य कार्य सुरळीत करण्यास मदत होते.

२) केळी 

वाढत्या वयातील मुलांना केळी खाऊ घाला. केळी खाल्ल्याने एनर्जी मिळते. यात व्हिटामीन बी-६, व्हिटामीन -ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर्स असतात ज्यामुळे मेंदूच्या विकासात मदत होते. 

३) तूप

मुलांना लहानपणापासूनच तूप खाण्याची सवय लावा.  तुपामुळे शरीराला डिएचए आणि गुड फॅट्स मिळतात.  हे दोन्ही मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात. यात एंटी फंगल, एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी बॅक्टेरिअल गुण असतात  ज्यामुळे इम्यूनिटी चांगली राहते.

४) ड्रायफ्रट्स

नट्स, सिड्स यात प्रोटीन्स आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते. प्रोटीन्स मेंदूच्या विकासासाठी आवश्यकत असते. मुलांच्या वाढत्या वयात झिंकची कमतरताही भासू नये याची काळजी घ्या. झिंकची कमतरता भासल्यास मुलांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर परिणाम होतो.  म्हणून मुलांना सकाळी नाश्त्याला किंवा मधल्यावेळेत खाण्यासाठी ड्रायफ्रुट्स द्या. 

५) योगर्ट

योगर्ट मुलांच्या मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. यात  प्रोटीन्स, जिंक असते. यामुळे हार्मोनल इम्बेलेन्सचा त्रास उद्भवत नाही.  मुलांच्या ओव्हरऑल शरीरावर याचा परिणाम होऊ शकतो. मुलांना  दुपारच्या जेवणात योगर्टचा समावेश असावा.

मुलं हुशार व्हावीत असं वाटतं? पालकांनी मुलांना द्यायला हवीत 'ही' ८ खेळणी; कॉम्प्यूटरपेक्षाही वेगाने चालेल डोकं

 व्यायाम आणि फिजिकल एक्टिव्हीटीज

मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी व्यायाम करणं गरजेचं असतं. आई वडिलांनी मुलांची हेल्दी बॉडी आणि माईंडसाठी  कोणत्या ना कोणत्या फिजिकल एक्टिव्हिटीज त्यांच्याकडून करून घ्यायला हव्यात. व्यायामाने शरीराला बरेच फायदे मिळतात. यामुळे ब्रेनमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. ब्लड फ्लो व्यवस्थित झाल्यामुळे ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा पुरवठा व्यवस्थित होतो.

हट्ट पूर्ण केला नाही की मुलं चिडतात-उलटं बोलतात? ३ गोष्टी करा, राग शांत होईल-गुणी होतील मुलं

मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी या गोष्टींची काळजी घ्या (Basic Steps To Build Your Childs Brain)

कोणतीही गोष्ट मुलांना जबरदस्तीने शिकवू नका. मुलांच्या भावनांची कदर करा. मुलांशी मोठ्या आवाजाने बोलू नका. सौम्य आवाजात मुलांशी बोला.  मुलांच्या शारिरीक, मानसिक विकासासाठी त्यांना ओव्हरइंटिंग करू  नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांच्या आहारात नवीन पदार्थांचा समावेश करू नका.

Web Title: 5 Brain Foods For Kids : 5 Foods To Include In Kids Diet For A Sharp Brain According to Science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.