आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत आई-वडील दोन्ही वर्किंग असल्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही लोक बरेचदा पैश्यांनी मुलांच्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्न करतात कारण त्यांच्याकडे मुलांना देण्यासाठी जास्त वेळ नसतो.(Parenting Tips in Marathi) याचाच परिणाम म्हणून मुलांच्या वागण्याबोलण्यात नकारात्मकता दिसून येते आणि स्ट्राँग बॉन्डींग दिसून येत नाही. मुलांनी चांगलं वागावे, त्यांना योग्य वळण लागावे यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी ५ टिप्स सांगितल्या आहेत. (5 Commandments of Good Parenting)
1) घरातलं वातावरण चांगलं ठेवा (Basic parenting tips)
सद्गुरू सांगतात की कोणत्याही मुलाच्या चांगल्या पालन पोषणासाठी घरातलं वातावरण फार महत्वाचे असते. घरातलं वातावरण चांगलं असेल तर मूल स्ट्राँग, निर्भय आणि साहसी बनेल, घरातलं वातावरण खराब असेल तर मुलांच्या मनात भिती आणि चिंता असते.
2) मुलांना आकर्षण कसलं?
लहान मुलांचे मन खूपच कोमल असते. कोणतीही गोष्ट त्यांना अट्रॅक्ट करते, म्हणून सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी स्वत:ला आकर्षक बनवायला सांगितले आहे. तुम्ही जे काही करताय त्याकडे मुलं अट्रॅक्ट होतात. मुलांसमोर रिल्स पाहणं टाळा, पुस्तकं वाचा. मुलंही पुस्तक वाचतील, खाण्याच्या टेबलवर हेल्दी पदार्थ ठेवा जेणेकरून मुलंही हेल्दी पदार्थांचे सेवन करतील.
3) मुलांना सपोर्ट करा
सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आई वडिलांना मुलांना सपोर्ट करण्याचा सल्ला दिला आहे. मुलांच्या तुलनेत पालक अधिक अनुभवी असतात. त्यांचे मार्गदर्शक बनू शकता म्हणून वेळोवेळी मुलांशी बोलायला शिका. मुलांना चुक-बरोबरचे मार्गदर्शन करा.
4) मुलांवर खरं प्रेम करा
सद्गुरू सांगतात की मुलांवर निर्मळ आणि खरं प्रेम करा. खरं प्रेम करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करा. तुम्ही मुलांसाठी जे काही करत आहात ते मन लावून करा. मुलांना चांगले आणि वाईट यातील फरक समजावून सांगा. मुलं वारंवार पैसे मागत असतील तर त्यांना पैशांचे महत्व समजावून सांगा.
5) मुलांसमोर नेहमी आनंद राहा
सदगुरू सांगतात, आई-वडीलांच्या वागण्याचा मुलांवर परिणाम होतो. मुलांना आनंदी, समजदार पर्सनॅलिटी बनवायचं असेल तर मुलांसमोर नेहमी आनंदी राहा. मोठ्याने बोलू नका. अन्यथा मुलांनाही तशीच सवय लागेल.