Join us  

मुलांच्या पोटात जंत होतात-पोट नीट साफ नसतं? ५ घरगुती उपाय-पोट त्वरीत साफ होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 2:07 PM

Home Remedies For Constipation In Kids : तासनतास टॉयलेटमध्ये बसून राहिल्यानंतरही पोट व्यवस्थित साफ होत नाही.

मोठ्यांप्रमाणेच मुलांनाही गॅसची समस्या उद्भवते. गॅस झाल्यास मलत्याग करण्यात अडचणी येऊ शकतात. मुलांना गॅस झाल्यास मल बाहेर काढण्यास त्याचा जास्त वेळ लागतो अनेकदा वेदनाही जाणवतात. गॅसचा त्रास झाल्यास मल  कडक होतो ज्यामुळे पोट जड होते.  तासनतास टॉयलेटमध्ये बसून राहिल्यानंतरही पोट व्यवस्थित साफ होत नाही. अशा स्थितीत गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. (Constipation Home Remedies Easy Way to Get Rid Of Constipation)

हेल्दी चिल्ड्रन.ऑर्गच्या रिपोर्टनुसार  लहान मुलांमध्ये ऑर्गेनिक कॉन्स्टिपेशन आणि फंक्शनल कॉन्स्टिपेशन असे 2 प्रकार त्रास जाणतात. हे टाळण्यासासाठी चांगला आहार घेणं फार महत्वाचे आहे, शरीर हायड्रेट ठेवा, आहारात फायबर्सचा समावेश करा, प्री बायोटिक्सचा आहारात समावेश करा. लेक्सेटिव्ह औषधं डॉक्टरांच्या सल्लाने मुलांना द्या,  टॉयलेट सिटवर बसण्याचे पोश्चर व्यवस्थित ठेवा. (5 Home Remedies For Constipation In Kids)

सफरचंद खायला द्या

फायबर आणि नॅच्युररल लॅक्टेसिव्ह गुणांनी परीपूर्ण सफरचंद तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. सफरचंद खाल्ल्यानं जड मलसुद्धा बाहेर येऊ लागतो. मलत्याग करणं सोपं होत आणि गॅसेसची समस्या उद्भवत नाही. सफरचंदाव्यतिरिक्त तुम्ही पिअरसुद्धा खायला देऊ शकता. 

शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवा

गॅस झाल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता उद्भवते. अशा स्थितीत मुलांनी जास्तीत जास्त पाणी प्यायला हवं.  दिवसभरात ६ ते ७ ग्लास प्या जेणेकरून शरीर डिहायड्रेट होत नाही आणि मल त्याग करणं सोपं होतं ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते याव्यतिरिक्त मुलांना सकाळी, संध्याकाळी हलंक गरम पाणी प्यायला द्यायल्यानं गॅसच्या त्रासापासून आराम मिळतो. 

गरम दूध आणि तूप

मुलांना रात्री झोपताना दूध गरम करून तूप द्या. तूप असलेलं दूध नॅच्युरल लॅक्सेटिव्हचे काम करते. ज्यामुळे मल पातळ होण्यास मदत होते रात्रीच्या वेळी २ ते ३  दिवस दूध तुम्ही मुलांना देऊ शकता ज्यामुळे गॅस, एसिडीटीची समस्याची दूर होते.

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा, नसांनसांत भरेल ताकद-कंबरदुखी टळेल 

डॉक्टरांना कधी दाखवावे?

जर मुलांना लहानपणापासून गॅसची समस्या उद्भवत असेल आणि पोट साफ व्हायला त्रास होत असेल आणि बाथरूमध्ये बसावं लागत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. याव्यतिरिक्त पोटात गॅस तयार होण्याची अनेक कारणं असू शकतात. मल जड होणं, वजन कमी होणं इतर गंभीर समस्या उद्भवतात. म्हणून डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं