वाढत्या वयानुसार मुलांना योग्य संस्कार देणं गरजेचं आहे (Parenting Tips). आपल्या मुलांनी चांगलं वागावं, चांगलं बोलावं, वडीलधाऱ्यांचा आदर ठेवावा. असे प्रत्येक पालकांना वाटते (Bright Future). त्यांच्यासाठी काय योग्य, काय अयोग्य? हे मुलांना आपले पालकचं समजावून सांगू शकतात. मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा.
शिवाय त्यांना शिकवलेले संस्कार मोठे झाल्यानंतरही विसरू नये असे वाटत असेल तर, आजपासूनच त्यांना ५ गोष्टी शिकवा. या '५' गोष्टींमुळे मुलांना उत्तम संस्कार मिळतील. शिवाय वयात आल्यानंतर या ४ गोष्टी मुलं कधीच विसरणार नाही(5 Parenting Tips To Setup A Bright Future For Your Child).
मुलांना चांगले संस्कार कसे द्यावे?
मोठ्यांची परवानगी घेण्याची सवयी
द हेल्थ साईट, कॉम या वेबसाईटनुसार, 'मुलांचे भविष्य घडवणे हे पालकांच्या हाती आहे, आणि यासाठी त्यांना योग्य संस्कार देणं गरजेचं आहे. मुलांना लहानपणापासून मोठ्यांची परवानगी घ्यायला शिकवा. मुलांना काही खरेदी करायचे असेल, मित्राला काही द्यायचे असेल किंवा बाहेर खेळायला जायचे असेल तर त्यांनी तुमची परवानगी घेणं गरजेचं आहे. मुख्य गोष्टी मुलांना पालकांच्या परवानगीशिवाय करायला देऊ नका.
दुपारी जेवण झालं की खूप झोप येते? रिसर्च सांगते दुपारची झोप घेतल्याने वजन वाढतं की..?
चूक सुधारा
लहान मुलं असो, वयात आलेली किंवा मोठी व्यक्ती. प्रत्येकाकडून चुका होतात. पण अधिक करून लहान मुलांकडून चुका होतात. जर आपल्याही लहान मुलाकडून चूक घडत असेल तर, त्यांना चूक सुधारण्याची संधी द्या. त्यांना चूक समजावून सांगा. पुन्हा ती चूक होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगा. त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा.
शिकण्याच्या वृत्तीचा सन्मान ठेवा
काही मुलांमध्ये शिकण्याची वृत्ती नसते. तर काही मुलांना नवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यामुळे पालकांनी लहान मुलांना नवनवीन गोष्टी शिकवणं गरजेचं आहे. वडीलधाऱ्यांचा आदर ठेवायला शिकवा. मुलांना कोणी शिकवत असेल त्यांच्या शिकवणीचा आदर ठेवायला सांगा.
गोष्टी शेअर करण्याची सवय लावा
जर आपल्याला दोन अपत्य असतील तर, त्या दोघांनाही प्रत्येक वस्तू वाटून घ्यायला शिकवा आणि एकत्र जेवायला, खेळायला शिकवा. ज्यामुळे मुलांना गोष्टी शेअर करण्याची सवयी लागेल.
वेट लॉससाठी चपाती खाणे योग्य की भाकरी? तज्ज्ञ सांगतात, वजन कमी - त्वचेवर ग्लो हवा तर
मुलांना जास्त ओरडू नका
मुलं कधी कधी काही मोठ्या चुका करतात. आणि आपण आपला संयम गमावतो आणि त्यांच्याशी रागाने किंवा ओरडून बोलतो. मुलं आपल्याकडूनचं सर्व गोष्टी शिकतात. त्यामुळे मुलांना ओरडू नका. मुलांनी कितीही मोठी चूक केली तर, त्यांना ओरडू नका. चूक समजावून सांगा. यामुळे मुलांना नक्कीच तुमचं म्हणणं पटेल.