Join us  

हवं ते दिलं नाही की मुलं घर डोक्यावर घेतात? ५ गोष्टी करा, आपोआप शिस्त लागेल-शांत राहतील मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:24 PM

5 Parenting Tips Will Help To Make Children Obedient : हट्टी मुलांना सुधारणं एक स्लो प्रोसेस आहे. ज्यात सातत्य ठेवणं गरजेचं आहे.

वाढत्या वयात मुलं जास्तच हट्टी होत जातात आणि एखाद्या गोष्टीवरून वारंवार चिडचिड करतात. मुलांना गरजेपेक्षा जास्त अटेंशन दिल्यामुळे किंवा त्यांचे अजिबात न ऐकल्यामुळे असे होते. जर तुमचे मूलही दिवसेंदिवस जास्तच जिद्दी होत असे तर त्याला पुन्हा शिस्त लावण्यासाठी तुम्ही काही बेसिक टिप्स वापरू शकता. (5 Parenting Tips Will Help To Make Children Obedient) हट्टी मुलांना सुधारणं एक स्लो प्रोसेस आहे. ज्यात सातत्य ठेवणं गरजेचं आहे. ५ पॅरेटींग टिप्स वापरून तुम्ही हट्टी मुलांना लगेच सुधरवू शकता. (How To Deal With Childs Tantrums)

हट्टी मुलांना सुधारण्याचे ५ उपाय

1) शांत राहा

मुलं हट्टी असतील तर त्यांना राग येणं, चिडचिड होणं अत्यंत स्वाभाविक आहे. अशा स्थितीत तुम्ही अधिक चिडल्याने स्थिती खराब होऊ शकते. शांत राहून धैर्य़ ठेवून तुम्ही मुलांशी प्रेमाने बोलू शकता. मुलांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

2) मुलांच्या हट्टाचे कारण समजून घ्या

मुलं का हट्ट करत आहेत याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. मूल उपाशी तर नाही ना किंवा त्याला कोणत्याही गोष्टीची भिती वाटत असेल तर त्याच्या भावनांना समजून, स्विकारून तुम्ही उत्तमरित्या बोलू शकता. ओव्हररिएक्ट न करता मुलांना मुलांना नीट समजावून सांगा.

लहानपणापासून प्रचंड हूशार असतात 'या' ४ सवयी असलेली मुलं; टेंशन घेणं सोडा-स्मार्ट होतील मुलं

3) मुलांना पर्याय द्या

मुलांना नेहमी २ किंवा ३ पर्याय द्या. तेव्हा त्यांना असं वाटेल की त्यांच्या नियंत्रणात तुम्ही आहात. उदाहरणार्थ, तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे मुलांना घालायचे आहेत यासाठी २ पर्याय देऊ शकतात.  

घरात उंदरांचा सुळसुळाट झालाय? ३ सोपे उपाय करा, न मारता उंदीर काढा घराबाहेर

4) आपल्या निर्णयावर ठाम राहा

जर तुम्ही कोणताही निर्णय घेतला तर त्यावर ठाम राहा. जर तुम्ही वारंवार आपले विचार बदलत राहाल तर मुलंसुद्धा तेच शिकतील. जेव्हा तुमची मुलं चांगली वागतील किंवा मनासारखी एखादी गोष्ट करतील तेव्हा त्यांचे कौतुक करायला विसरू नका. यामुळे त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल. जसं की छोटं स्टिकर किंवा खेळणी तुम्ही त्यांना देऊ शकता.

लहानपणापासून प्रचंड हूशार असतात 'या' ४ सवयी असलेली मुलं; टेंशन घेणं सोडा-स्मार्ट होतील मुलं

5) मुलांवर दबाव नको

मुलांवर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकला तर ते जास्त हट्ट करतात. मुलं झोपण्याआधी टिव्ही पाहण्याची जिद्द करतात, जबरदस्ती  केल्यानं काही होत नाही. मुलांसोबत बसून त्यांच्या आवडीत तुम्हीही आवड निर्माण करा. जेव्हा तुम्ही मुलांची काळजी करता तेव्हा ते हळूहळू तुमचं ऐकू लागतात.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं