Lokmat Sakhi >Parenting > वारंवार सांगूनही मुलं ऐकत नाहीत, उद्धटासारखं वागतात? ५ चुका टाळा; मुलं शहाण्यासारखं वागतील

वारंवार सांगूनही मुलं ऐकत नाहीत, उद्धटासारखं वागतात? ५ चुका टाळा; मुलं शहाण्यासारखं वागतील

5 Reasons Your Child Doesn't Listen When You Speak : पालकांनी ५ चुका टाळाव्या; मुलं नक्कीच सगळं ऐकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 01:08 PM2024-06-29T13:08:13+5:302024-06-29T13:09:24+5:30

5 Reasons Your Child Doesn't Listen When You Speak : पालकांनी ५ चुका टाळाव्या; मुलं नक्कीच सगळं ऐकतील

5 Reasons Your Child Doesn't Listen When You Speak | वारंवार सांगूनही मुलं ऐकत नाहीत, उद्धटासारखं वागतात? ५ चुका टाळा; मुलं शहाण्यासारखं वागतील

वारंवार सांगूनही मुलं ऐकत नाहीत, उद्धटासारखं वागतात? ५ चुका टाळा; मुलं शहाण्यासारखं वागतील

साधारणपणे सर्व पालकांची एकच समस्या असते. ती म्हणजे मुलं आपलं अजिबात ऐकत नाहीत (Parenting Tips). एखादे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक वेळा बोलावे लागते (Child Care). बरीच मुलं पालकांशी वाद घालत बसतात. अशावेळी काही पालक मुलांवर हात उगारतात किंवा ओरडतात. तर काही समजावून सांगतात. पण आपलं मुल का ऐकत नाही? याचा विचार आपण कधी केला आहे का?

पालकांनी मुल त्यांचे ऐकत नाही, हे तक्रार करण्याआधी पालकत्वामध्ये काही बदल करून पाहावे. मुलं नक्कीच ऐकतील(5 Reasons Your Child Doesn't Listen When You Speak).

मुलांना विश्वासात घेऊन समजवा

प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या सुंदर भविष्याचे स्वप्न पाहतात. त्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात आणि शक्यतो मुलांना उत्तम वाढवण्याचा मार्ग शोधतात. पण त्यांच्याच काही चुकांमुळे मुलांचा पालकांवर असलेला विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे मुलांना विश्वासात घेऊन त्यांना समजवा.

ज्वारीचे आप्पे करा फक्त १५ मिनिटांत, गुबगुबीत ग्लूटन फ्री आप्पे-नाश्त्याला बेस्ट-शाळेच्या डब्यासाठीही मस्त

जेव्हा पालक धमक्या देतात

बरेच पालक मुलांना धमक्या देतात. ‘खोली साफ करा नाहीतर बाहेर जायचं नाही’ किंवा ‘तुम्ही खेळणी उचलली नाहीत तर मी फेकून देईन’ या धमक्यांमुळे मुलं पालकांच्या सूचना पाळत नाहीत. मुलं सुरुवातीला ऐकतात. पण नंतर मुलांना धमक्या फक्त बोलण्यापुरत्या आहेत प्रत्यक्षात पालक कृतीत उतरवू शकत नाहीत हे त्यांना कळतं. त्यामुळे मुलं पालकांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात.

मुलांशी वाद घालू नका

पालकांनी मुलांशी वाद घालू नये. लहान मुलांशी वाद घालणे योग्य नाही. पालक जितके जास्त वाद घालतील तितके मूल ऐकणे बंद करेल. मुलांना त्याऐवजी समजावून सांगा. मुलांशी वाद घालणं टाळा.

मुलांना ओरडू नका

अनेक वेळा पालक मुलाशी इतक्या मोठ्या आवाजात बोलू लागतात की मुलांना काय करावे समजत नाही. अशावेळी मुलांच्या मनातील भीती कमी होते किंवा गायब होते. त्यामुळे मुलांना सतत ओरडू नका.

टिफिनसाठी मुलांनी पराठा मागितला? टेन्शन घेऊ नका, १० मिनिटांत करा बटाटा पराठा, सारण न करता

टोमणे मारणे टाळा

अनेक पालक आपल्या मुलांकडून चूक झाली की दिवसभर टोमणे मारत राहतात. अशावेळी काय चांगले काय वाईट हे कळून येत नाही. शिवाय मुलं मनाने खचतात. त्यामुळे मुलांना सतत टोमणे मारणे टाळा. 

Web Title: 5 Reasons Your Child Doesn't Listen When You Speak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.