Join us  

मुलं सारखं उलटून बोलतात, कसं समजवावं कळेना? ५ टिप्स.. मुलं होतील शहाणी- समजूतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 4:24 PM

Positive Parenting Tips: मुलांच्या या समस्येमुळे अनेक पालक सध्या हैराण आहेत. मुलांना नेमकं कसं समजावून सांगावं हे बऱ्याचदा कळतच नाही.. त्यासाठीच करून बघा हे काही खास उपाय (5 tips to control the backtalk of kids).

ठळक मुद्देबऱ्याचदा 'असं करू नको', असं नुसतं सांगण्यापेक्षा ते 'का करू नये', हे होणाऱ्या परिणामांसकट सांगितलं तर मुलांच्या वागण्यात बदल होतो. 

आजकालच्या मुलांना टीव्ही- मोबाईल या माध्यमातून खूप जास्त गोष्टी नको त्या वयात कळत आहेत. काही घरांमध्ये मुलांचे गरजेपेक्षा जास्त लाड केले जातात. त्या लाडापायी मुलं चुकत आहेत, हे देखील अनेक पालकांच्या लक्षात येत नाही. काही घरांमध्ये आई- बाबा रागावले तर मुलं चटकन आजी- आजोबांकडे पळतात. आजीआजोबा मग मुलांच्या बाजूने लगेच उभे राहतात. अशा एक ना अनेक कारणांमुळे आणि आई- बाबा, आजी- आजोबा यांच्याकडून होणाऱ्या अतिजास्त लाडामुळे नकळत उलटून बोलण्याची सवय अनेक लहान मुलांना लागते (How to control the backtalk of kids). मुलांची ही सवय डोईजड होण्याआधी या काही गोष्टी पालकांनी केल्या तर नक्कीच मुलांचं उलटून बोलणं कमी होऊ शकतं. 

मुलं उलटून बोलत असतील तर...१. सुरुवातीलाच आवर घालाउलटून बोलण्याची सवय मुलांना एकदम लागत नाही. सुरुवातीला जेव्हा मुलं बोलतात, तेव्हा अनेक पालकांना त्यांच्या बोलण्याचं कौतूक वाटतं. मुलं कशी स्पष्टवक्ती आहेत, असं म्हणून पालक ही गोष्ट उचलून धरतात. त्याचं समर्थन करतात. पण स्पष्टवक्तेपणा आणि उलटून बोलणं यात जी अंधूक रेषा आहे ती पालांनी वेळीच ओळखावी. आणि अगदी सुरुवातीपासूनच मुलांच्या उलटून  बोलण्याला आवर घालावी. 

 

२. नेमकं कुठून शिकत आहेत हे ओळखामुलं टीव्हीवर, इंटरनेटवर अनेक गोष्टी. मालिका बघतात. मग त्यात पाहिलेल्या पात्रांप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतात. आपलं मुलंही अशाच कुठल्या पात्राची नक्कल करत आहे का ते शोधून काढा आणि शक्य असल्यास त्याचं ते बघणं बंद करा.

 

३. मित्रमैत्रिणींच्या सवयी बघामुलं बहुतांश गोष्टी त्यांच्या मित्र- मैत्रिणींकडून शिकतात. आपल्या पाल्याचा एखादा मित्र किंवा मैत्रिण उलटून बोलणारं आहे का हे बघा. आणि असेल तर त्या दोघांनाही समजावून सांगा.

भेगाळलेल्या टाचांसाठी खास होममेड क्रिम.. फक्त ४ गोष्टी वापरा, टाचा होतील मऊ- मुलायम

४. तुम्हीही तसंच बोलता का?मित्र- मैत्रिणींकडून शिकतात तसंच मुलं त्यांच्या पालकांकडूनही शिकतात. बऱ्याचदा पालकांचा एकमेकांशी असणारा संवाद चुकीचा असू शकतो. किंवा पालकांना इतरांशी तशाच भाषेत बोलण्याची सवय असू शकते. त्यामुळे एकदा आपलं काही चुकतंय का, हे ही तपासून पहा.

 

५. उलटून बोलण्याचे परिणाम समजावून सांगामुलं जेव्हा शांत असतील तेव्हा त्यांच्यावर चिडचिड न करता शांतपणे उलटून बोलल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात, इतरांना कसं वाईट वाटू शकतं हे मुलांना त्यांच्या भाषेत समजावून सांगा.

नवरा असावा तर असा! मेकअपसाठी बायकोला मदत करणाऱ्या 'त्या' नवऱ्यावर अनेकजणी फिदा.. व्हिडिओ व्हायरल 

त्यांना स्वत:ला कुणी तसं बोललं तर त्यांना कसं वाटेल, हे ही त्यांना विचारा. बऱ्याचदा 'असं करू नको', असं नुसतं सांगण्यापेक्षा ते 'का करू नये', हे होणाऱ्या परिणामांसकट सांगितलं तर मुलांच्या वागण्यात बदल होतो.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं