Lokmat Sakhi >Parenting > मुलांचा कॉन्फिडन्स घालवणाऱ्या ५ गोष्टी, बघा पालकांच्या कोणत्या वाक्याचा मुलांवर कसा परिणाम होत जातो....

मुलांचा कॉन्फिडन्स घालवणाऱ्या ५ गोष्टी, बघा पालकांच्या कोणत्या वाक्याचा मुलांवर कसा परिणाम होत जातो....

Parenting Tips: मुलांसमोर आपण काय बोलतो, बोलताना आपला टोन कसा असतो, या काही गोष्टींचा विचार पालकांनी करायलाच पाहिजे... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 01:58 PM2023-01-19T13:58:38+5:302023-01-19T13:59:23+5:30

Parenting Tips: मुलांसमोर आपण काय बोलतो, बोलताना आपला टोन कसा असतो, या काही गोष्टींचा विचार पालकांनी करायलाच पाहिजे... 

5 Things of parents that reduces the confidence of a child, Avoid doing these 5 things with your child | मुलांचा कॉन्फिडन्स घालवणाऱ्या ५ गोष्टी, बघा पालकांच्या कोणत्या वाक्याचा मुलांवर कसा परिणाम होत जातो....

मुलांचा कॉन्फिडन्स घालवणाऱ्या ५ गोष्टी, बघा पालकांच्या कोणत्या वाक्याचा मुलांवर कसा परिणाम होत जातो....

Highlightsव्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी अगदी साध्या- सोप्या आहेत. पण त्यांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर असा काही परिणाम होईल, याचा आपण विचारही करत नाही. 

मुलांचं मन अतिशय नाजूक, संवेदनशील असतं. ते कोणत्या वातावरणात राहतात, त्यांचे पालक त्यांच्यासमोर कोणत्या गोष्टींची चर्चा करतात, एकमेकांशी कोणत्या भाषेत आणि कोणत्या पद्धतीने बोलतात. किंवा मुलांशी संवाद साधताना, त्यांचा अभ्यास घेताना पालकांची भाषा कशी असते, या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. यातूनच मुलं घडत किंवा बिघडत जातात (5 Things of parents that reduces the confidence of a child). त्यामुळे मुलं जर वागण्यात चुकत असतील, तर त्यासाठी आपलं त्यांच्याशी बोलणं, आपली भाषा तर जबाबदार नाही ना, याचा विचार प्रत्येक पालकांनी एकदा करायला हवा. (Avoid doing these 5 things with your child)

पालकांचा मुलांशी संवाद कसा असावा किंवा पालकांनी मुलांशी बोलताना- वागताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत, याविषयीची माहिती tortoyz_by_anchal या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

अस्सल पंजाबी चवीची ढाबास्टाईल दाल- मखनी करा घरीच, ही बघा एक चवदार रेसिपी

या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी अगदी साध्या- सोप्या आहेत. पण त्यांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर असा काही परिणाम होईल, याचा आपण विचारही करत नाही. 

 

मुलांशी बोलताना- वागताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा
१. मुलांनी ऐकलं नाही, अभ्यास केला नाही तर अनेक पालक मुलांना मारतात. असं केल्यामुळे मुलं सुरुवातीला ऐकतात. पण मनातून मात्र भित्री होत जातात. त्यांच्यातली असुरक्षितता वाढत जाते.

व्यायामासाठी वेळच नाही, ५ मिनिटांचे स्ट्रेचिंग करा... बघा फिटनेससाठी तज्ज्ञांनी सांगितलेले ५ व्यायाम

किंवा काही जणांच्या बाबतीत उलट होतं. मुलांवर मग मारण्याचा, चिडण्याचा, रागवण्याचा कोणताच परिणाम होत नाही. ती त्यांना वाटेल तशीच वागतात.

२. मुलांना अभ्यासावरून, वागण्यावरून सतत टोमणे मारत असाल तर मग मुलं शेवटी वैतागून प्रयत्न करणं सोडून देतात.

 

३. चारचौघांत मुलांचा कमीपणा सांगून त्यांना लाजिरवाणं करत असाल, त्यांची मजा उडवत असाल तर अशाने मुलं आत्मविश्वास हरवून बसतील.

वॉशिंग मशिनमध्ये धुवायला टाकलेल्या शर्टची कॉलर मळकीच राहते? १ सोपा उपाय, कॉलर होईल स्वच्छ 

४. मुलांवर नेहमीच अविश्वास दाखवू नका. असं केल्याने मुलं भांडखोर होतात. 

५. मुलांनी काही चांगलं केलं तर कौतूक करायला विसरू नका. कारण आपलं कुणीच कौतूक करत नाही, असा विचार करून मग मुलं शेवटी स्वत:चाच द्वेष करायला लागतात. आपल्याला काहीच जमत नाही, आपण कुणालाच आवडत नाही, हा विचार त्यांच्या मनात बळावू लागतो. 

 

Web Title: 5 Things of parents that reduces the confidence of a child, Avoid doing these 5 things with your child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.