लहान मुलांच्या शाळेसाठीचा डबा निवडणे हे पालकांसाठी अतिशय कठीण काम असते. हा डबा निवडताना पालकांची अतिशय तारांबळ उडते. शाळेसाठी टिफिन निवडताना पालकांना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतोच. डबा हा आकाराने अगदी मोठा किंवा लहानही नको, त्यातून काही पदार्थ सांडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मुलांना हा डबा व्यवस्थित उघडता आणि परत लावता आला पाहिजे. तो डबा व्यवस्थित शाळेच्या बॅगेत राहिला राहिला पाहिजे, त्यातून तेल गळत आले नाही पाहिजे. इतके सगळे पाहून झाल्यांनंतर तो डबा मुलांच्या पसंतीस उतरला पाहिजे, हे मेन महत्वाचे. अशा सगळ्या गोष्टींचा विचार पालकांना करावा लागतोच.
प्रत्येक आई - वडील आपल्या मुलांची व त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीची अतिशय काळजी घेत असतात. मुलांच्या डब्याच्या बाबतीत अशा अनेक गोष्टी असल्या तरी हल्ली लहान मुलांना प्रत्येक वस्तू त्यांच्या आवडीची हवी असते. शाळेत नेण्याचा टिफिन बॉक्सही त्याला अपवाद नाही. आपणसुद्धा आपल्या लहान मुलांसाठी शाळेचा टिफिन बॉक्स घेण्याचा विचार करत असाल तर तो खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा(5 Things to keep in mind while buying the right Lunchbox for your kids).
मुलांसाठी शाळेचा टिफिन बॉक्स घेताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी...
१. खूप घट्ट किंवा सैल जेवणाचा डबा खरेदी करू नका :- टिफिन खरेदी करताना बरेच लोक तो उघडून बघत नाहीत. त्यामुळे अनेकदा घट्ट किंवा सैल झाकण असलेला जेवणाचा डबाही घरी विकत आणला जातो. यासाठीच जेवणाचा डबा खरेदी करताना तो उघडल्यानंतर आणि बंद केल्यानंतर पाहिला पाहिजे. कारण घट्ट जेवणाचा डबा उघडणे कधीकधी मुलांसाठी अवघड होऊन बसते. त्यामुळे जेवणाच्या डब्याचे झाकण मुलांच्या सोयीनुसार त्यांना उघडता येईल असे असावे.
पिझा-बर्गर-चमचमीतच हवं असा हट्ट मुलं करतात? ५ सवयी, मुलं आनंदाने खातील घरचे पदार्थ...
२. प्लास्टिकचे जेवणाचे डबे विकत घेऊ नका :- प्लास्टिकच्या जेवणाच्या डब्यात खाद्यपदार्थ ठेवणेही मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. वास्तविक, जेव्हा प्लास्टिकच्या टिफिनमध्ये गरम अन्न ठेवले जाते तेव्हा प्लास्टिकमध्ये असलेल्या रसायनांचा अन्नावर परिणाम होतो. जे मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. अशा परिस्थितीत तुम्ही प्लास्टिकचा जेवणाचा डबा किंवा बाटली खरेदी करणे टाळावे.
"आई, मला काहीतरी गोड खायला दे !" असा धोशा मुलं सतत तुमच्यामागे लावतात ? ५ सोप्या टिप्स...
३. स्टीलचा लंच बॉक्स खरेदी करा :- मुलांसाठी स्टीलचा लंच बॉक्स खरेदी करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. आजकाल बाजारात विविध प्रकारचे स्टायलिश स्टीलचे जेवणाचे डबे उपलब्ध आहेत, त्यापैकी आपण मुलांच्या आवडीचा लंच बॉक्स खरेदी करू शकता. खरंतर, स्टीलचा जेवणाचा डबा घेऊन जाणं मुलांसाठी खूप सोपं आहे. मुलाच्या हातातून जेवणाचा डबा खाली पडला तरी तो फुटण्याची भीती नसते.
४. इन्सुलेटेड बॅग लंच बॉक्स :- या प्रकारच्या टिफिन बॉक्समध्ये जेवणाच्या वेळेपर्यंत अन्न गरम राहते आणि टिफिनमधून अन्न बाहेर सांडण्याची भीती नसते. यासाठी, इन्सुलेटेड बॅगसह जेवणाचा डबा खरेदी करणे चांगले असू शकते. त्यात भरपूर जागा असते, तसेच ते घाण झाल्यावर आपण ते सहज धुवून स्वच्छ करू शकता.
५. खूप महागडे जेवणाचे डबे विकत घेऊ नये :- मुले अनेकदा त्यांचे जेवणाचे डबे शाळेतच विसरून येतात, जे परत मिळणे जवळजवळ अशक्यच असते. त्याचबरोबर मुलं आपल्या टिफिनची व्यवस्थित काळजी घेत नाहीत, त्यामुळे तो लवकर खराब होऊ शकतो. यासाठीच तुम्ही मुलांसाठी अधिक महागडे जेवणाचे डबे विकत घेणे टाळावे. फक्त स्वस्त जेवणाचा डबा विकत घेण्याचा प्रयत्न करा, जो हरवला किंवा तुटला तर तुम्ही नवीन जेवणाचा डबा सहज खरेदी करू शकता.