पालकत्त्व ही एक प्रकारची शाळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुलांना वाढवताना पालक म्हणून आपणही त्यांच्यासोबत वाढत असतो. आपलं मूल भविष्यात हुशार व्हावं, त्याने सगळ्य गोष्टी योग्य पद्धतीने कराव्यात, त्याला चांगली शिस्त लागावी असे आपल्याला वाटते. त्यादृष्टीने आपण त्यांना सतत काही ना काही चांगले शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण काहीवेळा आपल्याही नकळत आपण मुलांशी वागताना किंवा बोलताना चुकतो. मुलांशी कसं वागायला हवं आणि कसं वागू नये याबाबत आपल्याला पुरेशी माहिती असायला हवी (5 Things You Should Avoid Saying to Your Child).
पालकत्त्वामध्येच काही दोष असतील तर मुलांची वाढ निकोप होण्यात अडचणी येतात. प्रसिद्ध पॅरेंटींग कोच रिद्धी देवरा पालकांनी मुलांशी बोलताना काय काळजी घ्यायला हवी याबाबत महत्त्वाच्या टिप्स देतात. शब्दांमध्ये खूप ताकद असते त्यामुळे शब्द जपूनच वापरायला हवेत असं त्यांचं म्हणणं आहे. नुकताच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी मुलांशी बोलताना कोणती वाक्य टाळायला हवीत आणि त्याऐवजी कोणती वाक्य वापरायला हवीत याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पाहूया त्या काय सांगतात...
१. रडणं थांबव, सगळं नीट होईलत्याऐवजी - काय झालंय, तू का रडतोस किंवा रडतेस?
२. लहान मुलासारखं वागू नकोस त्याऐवजी - तु असं का वागतोयस?
३. एक गोष्ट तुला १०० वेळा सांगायची कात्याऐवजी - हे मी तुला आधीही सांगितलंय, त्यामुळे तू प्लीज...
४. मी सगळं तुझ्यासाठी करतेत्याऐवजी - आम्ही तुझ्यावर प्रेम करतो त्यामुळे तुझ्यासाठी सगळं करतो
५. अमुक गोष्ट खाऊ नकोस त्यामुळे तू जाड होशीलत्याऐवजी - हे तुझ्या आरोग्यासाठी चांगलं नाही त्यामुळे शक्यतो ते खाणं टाळ