Join us  

गणित म्हणताच मुलांच्या पोटात गोळा? गणिताची भीती घालविण्यासाठी करा ५ गोष्टी- हसतखेळत होईल अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2024 12:18 PM

5 Tips For Your Kids To Love Mathematics: गणिताचं नाव घेताच अनेक मुलं अभ्यासाला टाळाटाळ करतात. म्हणूनच मुलांची गणिताची भीती कमी होऊन विषयाशी गट्टी व्हावी, म्हणून या काही गोष्टी करून पाहा...(How do we cure math phobia)

ठळक मुद्दे१० वीच्या नंतर गणित घ्यायचं की नाही हा पर्याय असतो. पण तोपर्यंत तरी मुलांना गणिताशी मैत्री करावीच लागणार आहे

गणित या विषयाचं नाव घेतलं तरी भल्याभल्यांच्या पोटात गोळा येतो. एकतर हा विषयही नको वाटतो आणि त्या विषयाचा पेपर म्हटलं की जीव आणखीनच नको नकोसा होऊन जातो. बहुतांश मुलांच्या मनात गणिताचा फोबिया असतोच. गणिताची भीती जोवर मनातून जात नाही, तोवर तो विषय त्यांच्या आवडीचा होणार नाही. आणि विषय आवडीचा झालाच नाही, तर मुलं गणिताचा अभ्यासच करणार नाहीत. बरं १० वीच्या नंतर गणित घ्यायचं की नाही हा पर्याय असतो. पण तोपर्यंत तरी मुलांना गणिताशी मैत्री करावीच लागणार आहे (5 Tips for your kids to love mathematics). म्हणूनच मुलांच्या मनातली गणिताविषयीची भीती घालविण्यासाठी या काही गोष्टी करून पाहा... (How to overcome kids fear about mathematics)

मुलांच्या मनातली गणिताची भीती कशी घालवायची?

 

१. शिक्षकांशी ओळख

अनेकदा गणिताचे शिक्षण खूप कडक शिस्तीचे असतात. त्यामुळे मुलांना मग तो विषयही आवडेनासा होतो. मुलांचे गणिताचे शिक्षण कडक शिस्तीचे असो किंवा नसो, तुम्ही पालक सभेला गेल्यावर त्या शिक्षकांना आवर्जून भेटा.

उन्हाळ्याची चाहूल लागते आहे- बागेतल्या रोपांची काळजी घेण्यासाठी ४ गोष्टी करा, बहरून जाईल बाग

तुमच्या मुलांच्या मनातला गणिताचा फोबिया त्यांना सांगा. मुलांची त्यांच्याशी चांगली ओळख करून द्या. जेणेकरून मुलांना शिक्षकांची भीती वाटणार नाही आणि ते मनातल्या शंका शिक्षकांना मोकळेपणाने विचारू शकतील. 

 

२. उदाहरणांतून शिकवण

पुस्तकी भाषा मुलांना खूप किचकट वाटते. त्यामुळे तुमच्या बोलीभाषेत, तुमच्याच आजुबाजुच्या गोष्टी दाखवून, उदाहरणं देऊन मुलांना गणित समजावून सांगा. त्यामुळे संकल्पना समजून घेणं त्यांना साेपं जाईल.

मुलतानी मातीमध्ये ४ गोष्टी मिसळून चेहऱ्याला लावा, त्वचेवर होईल जादू- येईल कमालीचा ग्लो

३. गणिताचे खेळ

हल्ली गणिताच्या वेगवेगळ्या संकल्पना हसतखेळत शिकविणारे काही खेळ असतात. हे खेळ मुलांना आणून द्या आणि तुम्ही त्यांच्यासोबत खेळा. किंवा त्यांच्या मित्रमंडळींना जमवून ते खेळ खेळायला सांगा. यातूनही मुलं हसतखेळत संकल्पना शिकतील.

 

४. अभ्यासाची वेळ

दिवसभर थकून आल्यानंतर किंवा इतर विषयांचा अभ्यास झाल्यावर सगळ्यात शेवटी मुलांना गणिताच्या अभ्यासाला बसवू नका. ज्यावेळी तुम्ही आणि मुलं दोघेही फ्रेश असाल, त्याचवेळी मुलांचा गणिताचा अभ्यास घ्या. 

प्रेमासाठी काय पण!! 'मिस जपान' चा मिळालेला मुकूटही केला परत- वाचा कॅरोलिना शिनोची प्रेम कहानी 

५. प्रोत्साहन द्या

आपले पाल्याची गणिताची भीती लक्षात घेऊन त्याला त्यासाठी रागावणे, मारणे टाळा. उलट गणित सोडविताना एखादी स्टेप जरी त्यांनी बरोबर केली, तरी त्यांचं कौतूक करून दाद द्या. मुलांना प्रोत्साहन मिळेल, आत्मविश्वास वाढेल. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंविद्यार्थी