Lokmat Sakhi >Parenting > मुलं रात्री लवकर झोपत नाहीत, किरकिर-दंगा करतात? ५ टिप्स- मुलं लवकर झोपतील शांत

मुलं रात्री लवकर झोपत नाहीत, किरकिर-दंगा करतात? ५ टिप्स- मुलं लवकर झोपतील शांत

5 Tips to Get Your Kids to Sleep मुलांच्या शाळा सुरु झाल्या की घरोघर रात्री लवकर झोपा म्हणून तगादा सुरु होतो, पण स्क्रिनला चिकटलेली मुलं लवकर झोपत नाहीत तेव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 02:44 PM2023-06-13T14:44:21+5:302023-06-13T14:49:12+5:30

5 Tips to Get Your Kids to Sleep मुलांच्या शाळा सुरु झाल्या की घरोघर रात्री लवकर झोपा म्हणून तगादा सुरु होतो, पण स्क्रिनला चिकटलेली मुलं लवकर झोपत नाहीत तेव्हा

5 Tips to Get Your Kids to Sleep | मुलं रात्री लवकर झोपत नाहीत, किरकिर-दंगा करतात? ५ टिप्स- मुलं लवकर झोपतील शांत

मुलं रात्री लवकर झोपत नाहीत, किरकिर-दंगा करतात? ५ टिप्स- मुलं लवकर झोपतील शांत

लहान मुलाचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी त्यांना पुरेशी झोप मिळणं गरजेचं आहे. पण लहान मुलांना रात्री वेळेवर झोपवणे म्हणजे सर्वात कठीण काम. मुलांना पुरेशा प्रमाणात झोप मिळाल्याने त्यांचा मूड फ्रेश राहतो. त्यांची चीडचीड होत नाही. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांची शारीरिक उर्जा प्रचंड असते. दिवसभर खेळल्यानंतरही त्यांना रात्री लवकर झोप लागत नाही. 

झोप पूर्ण झाल्यामुळे मुलांचा दिवस हा फ्रेश जातो. ज्यामुळे आई - वडिलांची कामं नीट आणि सहजरीत्या पूर्ण होतात. कारण दिवस भर वर्किंग पालक कामं करून घरी थकून येतात. जर लहान मुलं रात्रीच्या वेळी झोपत नसतील तर साहजिक त्यांची देखील चिडचिड होते. लहान मुलं वेळेवर झोपत नसल्यावर ते आजारी देखील पडू शकतात. जर तुमचीही मुलं रात्री वेळेत झोपत नसतील तर, आपण काही टिप्स फॉलो करून लहान मुलांना लवकर झोपवू शकता(5 Tips to Get Your Kids to Sleep).

झोपेच्या २ तास आधी खायला द्या

एडिट्यूटच्या रिपोर्टनुसार, झोपण्याच्या सुमारे दोन किंवा तीन तास आधी मुलाला खायला द्या. जर रात्री उशिरा खाऊ घातल्यास त्यांची पचनक्रिया सक्रिय राहते. ज्यामुळे त्यांना झोप येत नाही. विशेषत: जर तुम्ही त्यांना रात्रीच्या वेळी कॅफिन किंवा साखरयुक्त पदार्थ देत असाल तर, त्यांच्या झोपेचे चक्र बिघडू शकते.

मुलांचा मेंदू तल्लख व्हावा, हुशार व्हावी मुलं असं वाटतं? आहारात हवेच ५ पदार्थ

झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायला द्या

मुलांना रात्री भूक लागली तर बिस्किटांऐवजी गरम किंवा कोमट दूध प्यायला द्या. गरम दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे रसायन असते जे झोप येण्यास मदत करते.

रात्रीऐवजी दिवसभर जास्त पाणी प्यायला द्या

जर आपण मुलांना दिवसा पाणी प्यायला दिले तर, त्यांचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. ज्यामुळे त्यांना रात्री फार तहान लागत नाही. रात्रीच्या वेळी त्यांना पाणी दिल्यास त्यांना वारंवार लघवी येऊ शकते. ज्यामुळे त्यांची झोप मोड होऊ शकते.

स्तनदा मातेनं वारंवार छाती पाण्यानं धुवावी, हे कितपत खरं? डॉक्टर सांगतात, चुकीच्या माहितीचे गंभीर तोटे

शारीरिक व्यायाम महत्वाचं

लहान मुलांना संध्याकाळी खेळायला पाठवा. ज्यामुळे त्यांचे शरीर थकते. व रात्री निवांत - गाढ झोप लागते. लहान मुलांना झोपण्यापूर्वी चालण्याची सवय लावा. त्यांना सायकलिंग किंवा जॉगिंग करायला लावा. ज्यामुळे त्याचं शरीर फिट राहेल व रात्री झोप देखील लवकर लागेल.

डिस्‍ट्रॅक्‍शनपासून दूर ठेवा

रात्री घरात शांतता ठेवा व ब्राईट लाईट लावणे टाळा, त्याजागी दिवे लावा. झोपेचं वातावरण निर्माण करा. ज्यामुळे त्यांना लवकर झोप लागेल. तसेच, जर मुलाला अंधाराची भीती वाटत असेल तर मंद प्रकाश चालू ठेवा. झोपण्यापूर्वी खोलीचे वातावरण आरामदायक बनवा आणि घरातील दिवे बंद करा. यामुळे त्यांना चटकन झोप लागेल.

Web Title: 5 Tips to Get Your Kids to Sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.