मुलांची स्मरणशक्ती चांगली असणे गरजेचे असते सोबतच हे त्यांच्या विकासाठी फायद्याचे ठरते. काहीवेळा मुलं भरपूर अभ्यास करतात, अभ्यासाचे धडे अगदी तोंडपाठ असतात, परंतु ऐन परीक्षेच्या वेळी केलेला सगळा अभ्यास विसरायला होत, अशी अनेक पालकांची तक्रार असते. यामुळे मुलांच्या कमकुवत स्मरणशक्तीच्या समस्येमुळे काही पालक सतत चिंतेत असतात. मुलं तासंतास अभ्यास करतात, सगळा अभ्यास झटपट तोंडपाठ करतात पण परीक्षेच्या ऐनवेळी नेमकं काही आठवतच नाही. या समस्येमुळे मुलांसोबतच पालक देखील तितकेच चिंतेत असतात(5 Ways to Remember What You Study).
अभ्यास करुन देखील आपलं मुलं परीक्षेच्या वेळी अभ्यास विसरत या समस्येमुळे पालकांना फार टेंन्शन येते. वर्षभर अभ्यास करून देखील ऐन परीक्षेत काहीच आठवले नाही किंवा लिहिता आले नाही तर त्याचा मार्कांवर परिणाम झालेला दिसून येतो. अशावेळी मुलांसोबतच पालकांनी देखील काय करावं हे काही सुचतच नाही. सुरुवातीला पालक आपल्या मुलाच्या कमकुवत स्मरणशक्तीकडे दुर्लक्ष करतात. पण पुढे जाऊन ही समस्या आणखीन वाढत जाते. या समस्येकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा आपण मुलांकडे वेळीच लक्ष देऊन त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करू शकता. यामुळे मुलं परीक्षेत टॉप करतील, शिवाय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतील(5 Tips to help your child remember what he has studied).
अभ्यास करूनही परीक्षेच्या वेळी काहीच आठवत नाही...
१. अभ्यासाच्या नोट्स तयार करा :- एखादा विषय शिकवल्यावर तो समजून घेताना त्या विषयाच्या नोट्स तयार करा. या नोट्समध्ये तुम्हाला समजेल, लक्षात राहील अशा प्रकारचे छोटे छोटे मुद्दे किंवा पॉइंटर्स काढून ठेवा, जेणेकरून परीक्षेच्या आयत्यावेळी तुम्हाला त्या वाचायला आणि लक्षात ठेवायला सोपे जाईल. या नोट्स तयार करताना पुस्तकी भाषेत कोणत्याही विषयाच्या नोट्स बनवू नका, तर तुम्हाला लक्षात ठेवण्यास सोपे जाईल अशा भाषेचा वापर करावा.
२. चित्रं - आकृत्या काढा :- जर आपल्याला भाषेपेक्षा चित्रं, आकृत्या काढून अधिक जास्त लक्षात राहत असेल तर त्याचा वापर करावा. एखादा विषय समजून घेताना त्याविषयासंबंधित आकृत्या किंवा चित्रं वहीत काढून ठेवावीत. यामुळे आपल्याला केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यास अधिक मदत होईल. काहीवेळा भाषेपेक्षा चित्रं आणि आकृत्या लक्षात ठेवणे अधिक सोपे जाते, या ट्रिकमुळे आपण एकापेक्षा अधिक विषय अगदी सहज लक्षात ठेवू शकता.
३. मुख्य विषयांचे फ्लॅशकार्ड तयार करा :- जे मेन कठीण विषय आहेत किंवा लक्षात ठेवण्यास अवघड जातात अशा विषयातील मेन मुद्यांचे फ्लॅशकार्ड तयार करून घ्यावेत. असे फ्लॅशकार्ड तयार करून आपल्या पुस्तकांत चिकटवून घ्यावेत. यामुळे तुम्हाला परीक्षेदरम्यान गोष्टी लक्षात ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. याशिवाय पुस्तकांमध्ये मुख्य मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी हायलायटरचा वापर करावा.
४. स्वतःच्या सराव टेस्ट घ्या :- प्रत्येक एक धडा शिकवून झाल्यावर त्यातील मुख्य मुद्यांच्या सराव टेस्ट घ्या. या सराव टेस्टमुळे आपल्याला आपले कुठे काय चुकते आहे हे लक्षात येण्यास अधिक मदत होईल. पुन्हा पुन्हा टेस्ट दिल्याने गोष्टींचा सराव चांगला होतो. जर तुमच्याकडे ५ विषय असतील तर दररोज २ ते ३ विषयांच्या टेस्ट द्या. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून तयारी करा.
५. व्हिज्युअल व्हिडीओ पाहा :- तुमच्या विषयाशी संबंधित व्हिज्युअल व्हिडीओ पाहिल्याने विषय लक्षात ठेवण्यास मदत होईल. यामुळे आपल्याला विषयांबद्दलच्या आपल्या आकलनाचे मूल्यांकन करण्यास देखील मदत होईल. याशिवाय तुम्हाला उजळणी करण्यात मदत होईल.
झोपलेल्या बाळाच्या अंगावर आईबाबा पांघरुण घालतात पण मुलं ते फेकतात, कारण माहिती आहे?