Join us  

बोर्डाच्या परीक्षेचं जाम टेंशन आलं आहे? ५ टिप्स, अभ्यास होईल उत्तम आणि स्ट्रेस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 6:52 PM

5 Tips to overcome board exam stress and anxiety बोर्डाच्या परीक्षेचं मुलांनाच नाही तर पालकांनाही प्रचंड टेंशन येतं, पण काही गोष्टी नियमित केल्या तर ताणाचा निचरा सहज होईल.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेला अवघे काही दिवस उरलेत. बोर्ड परीक्षा म्हटलं की मुलांना घाम फुटतोच. सध्या मुलं परीक्षेची जोमाने तयारी करत आहेत. प्रत्येक मुलाच्या डोक्यावर अभ्यासाचे प्रेशर आहे. वर्षभरात शिकलेल्या गोष्टी ते पुन्हा सराव करून परीक्षेला बसतात. मुलांना या काळात अभ्यास आणि पुढील भविष्याचे टेन्शन अधिक असते. त्याचबरोबर पालकही आपल्या मुलांच्या परिक्षेचं टेंशन घेतात. त्यामुळं मुलांवर अपेक्षांचा दबाव वाढतो.

यासंदर्भात मानसोपचार तज्ज्ञ डॉ.सामंत दर्शी सांगतात, ''परीक्षेच्या काळात मुलांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे महत्वाचे आहे. या काळात पालकांनी आपल्या पाल्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांची भीती, चिंता, अस्वस्थता, तणाव किंवा नैराश्य कमी करता येते. काही गोष्टी मात्र करायल्या हव्यात.’

घोकंपट्टी नको

पाठांतर घोकंपट्टी फक्त करु नका.  विषय समजून घ्या. अभ्यास पाठ करत असताना आपण रात्रभर जागून अभ्यास करतो. यामुळे मन थकते, यासह वाचलेल्या गोष्टी आपण विसरणार तर नाही ना याची चिंता देखील सतावते. अशा परिस्थितीत प्रत्येक विषय समजून अभ्यास करा. पुरेशी झोप घ्या, यामुळे परीक्षेत जाताना फ्रेश वाटेल.

नाश्ता हवाच

शरीरासाठी नाश्ता आवश्यक. परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी योग्य आहार घ्या. यामुळे शरीराला आवश्यक असणारी उर्जा मिळेल. परीक्षेत मध्येच भूक लागल्याने मन भरकटते. यामुळे लक्षात असणाऱ्या गोष्टी आपण विसरतो. त्यामुळे नाश्ता आवश्यक, नाश्त्यात गोड पदार्थांऐवजी फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खा. यामुळे  शरीरात उर्जा टिकून राहेल.

सरावाचे वेळापत्रक तयार करा

परीक्षा येण्यापूर्वी काही दिवस आधीच रिव्हिजन टेबल तयार करा. कठीण विषय पहिले घ्या त्यानंतर सोपे विषयाला सुरुवात करा. ऐनवेळी अभ्यास केल्याने गोंधळ उडतो. ज्यामुळे काही विषय अर्धवट राहतात. त्यामुळे अभ्यासाचा सराव करत राहा. कठीण विषयांवर अधिक लक्ष द्या आणि कठोर परिश्रम करा.

लॉजिकल विचार करा

बहुतांश जणांची भीती आणि चिंता तर्कहीन असतात, ज्याला आपण लॉजिकल विचार करून नियंत्रणात आणू शकतात. नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक गोष्टींपासून लांब राहा.

प्लॅन फॉलो करा

मानव रचना इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका पूजा पुरी म्हणतात, ''आपण जर परीक्षेच्या बाबतीत अधिक विचार करून टेन्शन घेत असाल तर तसे करू नका. यामुळे आपण ठरवलेल्या प्लॅनपासून लांब जातो. आपण ज्या परीक्षेसाठी प्लॅन बनवले आहे त्याला फॉलो करा. लक्ष विचलित होईल असे विचार करू नका''.

टॅग्स :पालकत्वविद्यार्थीमानसिक आरोग्य