Join us  

लहानपणापासून मुलांना लावा ५ सवयी-हुशार होतील मुलं, न ओरडता स्वत:हून अभ्यासाला बसतील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 3:22 PM

5 Ways Parents Can Help Children Build Effective Study Habits : मुलांनी अभ्यास करावा यासाठी त्यांना कोणत्या सवयी लावाव्यात ते समजून घ्यायला हवं. सगळ्यात आधी मुलांसाठी एक रूटीन सेट करा.

चांगल्या पालकत्वासाठी मुलांना लहानपणापासून चांगल्या सवयी लावणं गरजेचं असतं. अनेकदा पालकांची तक्रार असते. की मुलं अभ्यास करत नाहीत. मुलं अभ्यासापासून दूर पळतात. (5 Ways Parents Can Help Children Build Effective Study Habits) अभ्यासाला बसायला नाटकं करतात. (Parenting Tips)याचं कारण अनेकदा मुलांना अभ्यासाचं महत्वच कळच नाही. काही सवयी अशा आहेत ज्या रोजच्या जीवनात फॉलो केल्या तर तर मुलं अभ्यासात कमी  पडणार नाही. (Habits That Encourage Kids Too Study Daily Parenting Tips)

1) मुलांसाठी एक रूटीन सेट करा

मुलांनी अभ्यास करावा यासाठी त्यांना कोणत्या सवयी लावाव्यात ते समजून घ्यायला हवं. सगळ्यात आधी मुलांसाठी एक रूटीन सेट करा. (Effective Ways To Improve Study Habits For Your Kids) या रूटीनमध्ये खेळण्यापासून अभ्यासापर्यंत रूटीन सेट करा. यात मुलांसाठी २ तासांचा वेळ खेळण्यासाठी असावा आणि बाकीचा वेळ अभ्यास, आराम यासाठी असावा.  या नियमाने मुलांना रोज अभ्यास करण्याची सवय लागेल.

2) स्टडी एरिया

मुलांना अभ्यासासाठी एक जागा निववडा, मुलं टिव्ही बघत बघत अभ्यास करत असतील हे त्यांच्यासाठी योग्य नाही. म्हणूनच मुलांना स्टडी टेबलवर बसण्याची सवय लावा.  मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि ते अभ्यास करताना एकाग्र असतील असे पाहा.

ओटी पोट सुटलंय, मांड्या पसरट दिसतात? रोज 'या' वेळेत मूठभर मखाणे खा, भराभर घटेल चरबी 

3) मुलांवर प्रेशर देऊ नका

मुलांना नेहमी नेहमी अभ्यास करण्यासाठी फोर्स करू नका.  मुलांचे अभ्यासात मन लागावे यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांना  अभ्यासाला बसण्यासाठी स्वत:सुद्धा वेळ ज्या. त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा. 

4) लिखाणाची सवय लावा

फक्त अभ्यास करा असं बोलून मुलं चांगला अभ्यास करत नाहीत तर त्यांच्याकडून चांगला अभ्यास करूनही घ्यावा लागतो. म्हणूनच मुलांना नेहमी लिखाणाची आणि वाचनाची सवय लावा.  

लाल की काळा कोणता माठ वापरावा? माठात 'ही' वस्तू घाला-फ्रिजसारखं थंडगार होईल पाणी

5) हेल्दी डाएट आणि झोप

हेल्दी ब्रेनसाठी शरीर हेल्दी असणंही तितकंच महत्वाचे असते. मुलांना नेहमीच हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करण्यात प्रोत्साहन द्या. मुलांना सकाळी किंवा संध्याकाळी दूध प्यायला सांगा. मुलांना स्नॅक्स, कुरकुरे असे पदार्थ खाण्याची सवय खूप असते. ज्यामुळे  त्यांना चांगली झोप येत नाही आणि अशक्तपणाही येतो. अशावेळी मुलांना योग्यवेळी झोपण्याची सवय लावा. 

टॅग्स :पालकत्व