बालपण हा एक असा काळ आहे (Child Care). जो एकदा गेला की परत येत नाही. मुलांची योग्य वाढ ही लहानपणीच होते (Parenting Tips). मुलांनी मोठेपणी आदर्श व्हावे. लहानपणीच मुलांना उत्तम संस्कार मिळावे. हे प्रत्येक आई - वडिलांची इच्छा असते. मात्र, पालकांच्याच काही चुकांमुळे मुल उद्धट किंवा त्यांच्यातला आत्मविश्वास कमी होतो. काही पॅरेण्टिंग टिप्समुळे मुलांच्या विकासामध्ये भर घालते. जेणेकरून मानसिक आणि शारीरिक योग्यरित्या वाढ होते.
जर आपली मुलं बुजरी आहेत, त्यांच्यातला आत्मविश्वास कमी पडत असेल तर, पॅरेण्टिंग टिप्समध्ये काही गोष्टींचा समावेश करायला हवा. यामुळे मुलांमधील आत्मविश्वास वाढेल. शाळेत न घाबरता प्रश्नांची उत्तरं देतील. यासह आत्मविश्वास वाढल्यामुळे कोणतीही गोष्ट करताना घाबरणार नाहीत(5 Ways to Boost Your Child's Self-Esteem (for Parents)).
जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट
मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा?
मुलांना मत मांडण्याची संधी द्या
मुलांना आपण अनेकदा टोकतो. हे करू नको, ते करू नको म्हणत अडवणूक करतो. ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो. ज्यामुळे मुलांना मत मांडण्याची भीती वाटू लागते. कारण काही पालक मुलांच्या मतांना ग्राह्य धरतात. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास झपाट्याने कमी होतो. त्यामुळे मुलांचे मत विचारा आणि त्यांना मत मांडण्याची संधी द्या.
कंबर, मांड्या - थुलथुलीत पोट कमीच होत नाही? कोमट पाण्यात घाला 'या' फळाचा रस; वजन घटेल - दिसाल सुडौल
सकारात्मक प्रतिक्रिया द्या
मुलांच्या चुकांवर रागवण्याऐवजी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करा. सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने मुलाला प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे ते आणखीन उत्तम कार्य करण्याचं प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांनी केलेल्या कोणत्याही गोष्टीत सकारात्मक प्रतिक्रिया द्या.
योग्य निर्णय घेण्यास मदत
मुलांना प्रत्येक गोष्ट करण्यापासून रोखण्याऐवजी त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून घेण्यात मदत करा. यामुळे त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजतील. आणि आपल्यासाठी काय योग्य, काय अयोग्य? याची त्यांना जाण होईल.
चुकांमधून शिकण्याची संधी
जर मुलाने चूक केली तर त्यांना फटकारण्याऐवजी त्यांच्या चुकीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा आणि कसे सुधारायचे ते समजावून सांगा. ज्यामुळे ते स्वतःचं आत्मपरीक्षण करतील आणि नवीन शिकण्याची संधी मिळेल.
आनंददायी वातावरण तयार करा
घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर आपलं बिझी शेड्युल असेल तर, वेळात वेळ काढून, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी शेअर करा. प्रेमळ वातावरणात मुलांचा आत्मविश्वास वाढेल. यासह मुल न घाबरता, पालकांजवळ गोष्टी शेअर करतील.