गेल्या काही वर्षांपासून मोबाईल फोन, हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकांना मोबाईल फोन शिवाय जमत नाही. सकाळी उठल्यानंतर आपण सर्वप्रथम, मोबाईल फोन पाहतो. त्याशिवाय कित्येकांची सकाळ होत नाही. थोरा - मोठ्यांची ही सवय लहानग्यांना देखील लागलेली आहे. लहान मुलं मोबाईल फोनला इतके ॲडिक्ट झालेत, की अनकेदा अभ्यास करण्यासाठी देखील त्यांना मोबाईल फोनची गरज भासते.
सध्या मोबाईल फोनवर कोणतेही कण्टेट सर्च करणं सोप्पं झालं आहे. मुलं देखील सर्च करून स्वतःचे मनोरंजन करतात. शिवाय गेम्स खेळण्यातही दिवस घालवतात. परंतु, मुलांवर तितकंच लक्ष ठेवणं गरजेचं आहे. व त्याचं हे ॲडिक्शन सोडवणं गरजेचं आहे(5 ways to break smartphone addiction in children).
मुलांचं मोबाईल फोन ॲडिक्शन सोडवण्यासाठी उपाय
- सर्वप्रथम, मोबाईल फोनमध्ये पासवर्ड आणि पॅटर्न सेट करा. ज्याची माहिती चुकुनही मुलांना देऊ नका.
- लहान मुलांना व्हिडिओ अॅप्स खोलून देऊ नका. कारण मुलं एका व्हिडिओवरून दुसऱ्या व्हिडिओवर क्लिक करत राहतात. ज्यामुळे त्यांच्या समोर चुकीच्या माहितीचा व्हिडिओ समोर येऊ शकतो.
दर १० पैकी ६ टीनएज मुलींना आहे ॲनिमियाचा त्रास, वयात येतानाच ॲनिमिया झाला तर, डॉक्टर सांगतात..
- पालकांच्या किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच, मुलांना मोबाईल फोन वापरण्यासाठी द्या.
- तुमच्या मुलाच्या वयानुसार त्यांना चित्रपट किंवा व्हिडिओ दाखवा. बॅकग्राऊंड तपासल्यानंतरच त्यांना व्हिडिओ पाहायला द्या.
- मुलांसोबत मनमोकळेपणाने बोला, त्यांना मोबाईल फोन वापरण्याचे दुष्परिणाम सांगा. याव्यतिरिक्त अभ्यास करण्याचे फायदे सांगा.
मोबाईल फोन वापरण्याचे दुष्परिणाम
- डोळे नाजूक असतात, त्यामुळे डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकते.
- सतत मोबाईलच्या वापरामुळे, मोबाईलचे व्यसन लागू शकते. मोबाईलचं व्यसन लागल्यानंतर त्यांच्या वागणुकीत बदल घडू शकते. त्यामुळे वेळीच सांभाळा.
- मुलं चुकीच्या वेबसाइटवर क्लिक करू शकतात, जे त्यांच्या वयानुसार धोकादायक ठरू शकते.
- सतत मोबाईल फोनचा वापर केल्यामुळे, त्यांच्या मानेमध्ये आणि हातात, जडपणा आणि वेदना जाणवू शकतात.
दररोज मुठभर भाजलेले चणे खाण्याचे ६ फायदे, फक्त स्नॅक्स म्हणून खाऊ नका - आनंदाने खा पोटभर
- पालकांनी देखील मोबाईल फोनचा वापर कमी करायला हवा. कारण मुलं आपल्या आई - वडिलांचं आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वागतात.
- अनलिमिटेड प्लॅनएवजी लिमिट इंटरनेट प्लॅनचा वापर करा. यामुळे मुलं काही विशिष्ट वेळासाठीच मोबाईल फोन वापरू शकतील.