बऱ्याच मुलांच्या सहामाही परीक्षा आता सुरू झाल्या आहेत. पण बहुतांश मुलांच्या पालकांची हीच तक्रार असते की परीक्षेचे दिवस असूनही मुलांचं मात्र अभ्यासात मुळीच लक्ष नाही. त्यांना अभ्यासाला बसवताना काही पालकांच्या अक्षरश: नाकी नऊ येतात. पण तरीही मुलं काही अभ्यास करत नाही. अभ्यासाला बसलीच तरी मध्येच उठून येतात. मन एकाग्र करून अजिबात अभ्यास करत नाहीत. तुमच्याही मुलांचं असंच असेल तर त्यांच्या बाबतीत या काही गोष्टी करून बघा (5 Ways To Motivate Your Kids For Study).. मुलांमध्ये नक्कीच काही प्रमाणात तरी सकारात्मक बदल दिसेल. (how to encourage your child for study?)
मुलांनी मन एकाग्र करून अभ्यास करावा यासाठी उपाय...
१. वेळ ठरवून द्या..
मुलांना दिवसाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट सांगून टाका की त्यांना अमूक वाजता आज अभ्यासाला बसावेच लागणार आहे. त्यापुर्वीचा जो वेळ आहे, त्यात त्यांना त्यांच्या मनासारख्या गोष्टी करू द्या. त्यांना खूप टोकू नका. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्यानंतर मात्र अभ्यासाची वेळ त्यांना पाळावीच लागेल, हे आधीच सांगून ठेवा.
वाढदिवसाला केक, पेस्ट्री खाणं महागात पडू शकतं! FSSAI ने दिला कॅन्सरचा धोका- 'हे' केक खाणं टाळाच
२. काही तरी खाऊ घाला
उपाशीपोटी अजिबात अभ्यास होत नाही. मुलांचं अभ्यासात लक्षही लागत नाही. त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करण्यापुर्वी मुलांचं पोट व्यवस्थित भरेल असं काही त्यांना खाऊ घाला. शक्यतो त्यांच्या आवडीचं खाऊ घातलं तर अधिक चांगलं. अभ्यासाचा उत्साह अधिक वाढेल.
३. छोटे- छोटे टप्पे ठरवा
मुलांना एकदम खूप मोठा अभ्यास देऊ नका. ज्यांना अभ्यासाचा कंटाळा असतो, अशा मुलांना एकदमच मोठा अभ्यास दिला की ते लगेच घाबरून टाळाटाळ करू लागतात. त्यामुळे अर्ध्या अर्ध्या तासाचा टप्पा ठरवून द्या. अर्ध्या तासानंतर ५ मिनिटांचा ब्रेक द्या. पुन्हा पुढच्या अर्ध्या तासाचा अभ्यास ठरवून द्या.
'मी खूप नशिबवान आहे; मला रितेशसारखा नवरा मिळाला'- नवऱ्याचं कौतुक करत जेनेलिया डिसुझा म्हणाली ....
४. प्रोत्साहीत करा
मुलांवर चिडून, ओरडून, रागावून त्यांना अभ्यासाला बसवू नका. त्यांनी सुरुवातीच्या अर्ध्या तासात खूप काही ग्रेट केलं नसलं तरी त्यांनी जे काही केलं त्याबद्दल त्यांचं कौतूक करा आणि पुढच्या अर्ध्या तासांत त्यांना अजून चांगलं करावं लागणार आहे, हे आधीच गोड शब्दांत बजावून सांगा.
५. अभ्यास झाल्यानंतर...
मुलांनी ठराविक वेळेत ठराविक अभ्यास केला तर त्यांना तुम्ही त्यांच्या आवडीचं काही तरी द्याल, हे आधीच सांगून ठेवा.
कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर
उदा- त्यांना मित्रमैत्रिणींसोबत थोडा जास्त वेळ खेळू देणे, त्यांना त्यांच्या आवडीचा काहीतरी घरगुती खाऊ देणे, गोष्ट सांगणे.. असं काहीही त्यांच्या आवडीचं तुम्ही करू शकता...