Lokmat Sakhi >Parenting > ‘नाही’ ऐकायची सवयच नाही नाही मुलांना? नकार पचवायला शिकवा, पालकांनी ६ गोष्टी करायलाच हव्यात...

‘नाही’ ऐकायची सवयच नाही नाही मुलांना? नकार पचवायला शिकवा, पालकांनी ६ गोष्टी करायलाच हव्यात...

6 Ways To Prepare Your Child To Deal With Rejection : आईबाबा-आजीआजोबा कशालाच नाही म्हणत नाहीत, सगळं हवं तेव्हा मिळतं, नकार-अपयश पचवायला मग मुलं शिकणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 04:38 PM2023-06-13T16:38:48+5:302023-06-13T17:17:30+5:30

6 Ways To Prepare Your Child To Deal With Rejection : आईबाबा-आजीआजोबा कशालाच नाही म्हणत नाहीत, सगळं हवं तेव्हा मिळतं, नकार-अपयश पचवायला मग मुलं शिकणार कशी?

6 Best ways to help your child overcome Fear of Rejection | ‘नाही’ ऐकायची सवयच नाही नाही मुलांना? नकार पचवायला शिकवा, पालकांनी ६ गोष्टी करायलाच हव्यात...

‘नाही’ ऐकायची सवयच नाही नाही मुलांना? नकार पचवायला शिकवा, पालकांनी ६ गोष्टी करायलाच हव्यात...

नकारात्मकता आणि सकारात्मकता या दोन्ही गोष्टी आपल्या रोजच्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहेत. माणसाच्या जीवनात येणारे बरेच विचार हे महत्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती करण्याची दैवीदेणगी दिली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची किंवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. चांगले किंवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा आपल्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर आपण चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते.

आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये काही सकारात्मक गोष्टी असतात तर काही नकारात्मक असतात. आपण कळत्या वयात असल्याने आपल्याला आलेल्या नाकारात्मकतेला किंवा रिजेक्शन आपण कसेही करून सामोरे जातोच, परंतु लहान मुलांचे काय? लहान मुलांमध्ये येणारी नकारात्मकता आणि रिजेक्शन यांना कसे सामोरे जावे हे त्यांना शिकवणे म्हणजे पालकांसाठी मोठा टास्कच असतो. सध्याची बदलती जीवनशैली, दररोज येणारी नवीन आव्हान, सगळ्या गोष्टीत असणारी स्पर्धा यामुळे मुलांना काहीवेळा नकारात्मकता आणि रिजेक्शनचा सामना करावा लागतो. असे वारंवार झाल्यामुळे मुलं निराश होतात किंवा कोलमडून जातात. अशा परिस्थितीतून, मुलांना बाहेर कसे काढावे किंवा त्यांच्यात परत सकारात्मकता कशी आणावी यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स. मनस्थलीच्या संस्थापक-संचालक आणि ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती कपूर यांनी सांगितले की, मुलांच्या आयुष्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालक त्यांना जीवनमूल्ये शिकवण्यासोबतच समस्यांशी लढायला आणि हुशारीने सोडवायला शिकवतात. यासोबतच नाती कशी जपायची हेही मुलं पालकांकडून शिकतात. नात्यातील नकार, द्वेष किंवा संघर्ष प्रत्येकाला आतून अस्वस्थ करतात, परंतु पालकांनी आपल्या मुलांना संघर्षातून पुढे कसे जायचे हे शिकवले पाहिजे(6 Best ways to help your child overcome Fear of Rejection).

पालकांनी आपल्या मुलांमधील नकारात्मकता किंवा रिजेक्शन कसे दूर करावे ? 

१. मुलांना भावनिकदृष्ट्या मजबूत बनवा :- नकारात्मक गोष्टींमधून बाहेर येण्यासाठी मुलांना भावनिकदृष्ट्या मजबूत बनवा. आपण योग्य मार्गाने या रिजेक्शन किंवा नाकारात्मकतेवर मात कशी करू शकतो, हे पालकांनी मुलांना समजावून सांगायला हवे. मुलांना भावनिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी पालकांनीच त्यांना मदत करायला हवी. मुलांना त्यांच्या भावना तुमच्यासमोर मनमोकळेपणे व्यक्त करू द्या, त्यांच्या समस्या सोडवण्यात मदत करा अशा प्रकारे मुलांना भावनिकदृष्ट्या मजबूत बनवा. 

आई झाल्यावर करिअर संपते का? मग तुम्ही काय निवडाल? - समीरा रेड्डीचा सवाल...

२. स्वाभिमानी राहायला शिकवा :- पालकांनी मुलांमधील सकारात्मक आत्मसन्मान वाढवावा आणि मुलांना विकसित होण्यास मदत करावी. मुलांना त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहित करा. मुलांना स्वारस्य असलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित करा, त्यांना ध्येय निश्चित करण्यात मदत करा आणि त्यांचे यश साजरे करा. त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवा, जेणेकरून ते गुंतागुंतांना सामोरे जाण्यास शिकतील आणि लवकर बरे होतील. तसेच, त्यांनी त्यांची टीका किंवा नकार मनावर घेऊ नये आणि सकारात्मक राहावे अशी शिकवण द्यावी. 

आई-बाबा, कटकट करू नका! मुलं पालकांना असं उद्धटपणे बोलतात, अजिबात ऐकत नाहीत.. त्यावर उपाय काय?

३. स्वतःच्या मर्यादा निश्चित करण्यास शिकवा :- आपल्या मुलांना वैयक्तिक सीमांबद्दल समजावून सांगा आणि इतरांच्या सीमांचा आदर करणे शिकवा. ते स्वतःच्या मर्यादा कशा ठरवू शकतात हे देखील त्यांना सांगा. स्वतःच्या मर्यादा निश्चित करणे खूप महत्वाचे आहे, यामुळे मुलांना नातेसंबंधातील मर्यादा ओळखण्यास मदत होईल.

४. मुलांचे विचार मांडण्यास प्रोत्साहन द्या : - घरात असे वातावरण तयार करा, ज्यामध्ये मुल आपले विचार, समस्या आणि अनुभव तुमच्याशी कोणतीही भीती आणि संकोच न करता शेअर करेल. तसेच, मुलांना मैत्री, कौटुंबिक आणि रोमँटिक संबंधांबद्दल मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहित करा. त्यांना ठामपणे बोलायला आणि इतरांचे ऐकायला शिकवा.   

५. स्वतः निरोगी नातेसंबंधाचे उदाहरण व्हा :- प्रत्येक मुलावर त्याच्या पालकांचा प्रभाव असतो. आपण स्वतः जसे वागता, मुलही तेच शिकेल. म्हणूनच नातेसंबंधांचे आणि स्वतःच्या वागणुकीचे महत्त्व अशा प्रकारे ठेवा की ते मुलासाठी एक उदाहरण होईल. तुमचा जोडीदार, कुटुंब आणि मित्र यांच्याशी निरोगी नातेसंबंधाचे उदाहरण व्हा. संघर्ष व्यवस्थित मार्गाने कसा सोडवला जाऊ शकतो ते त्यांना दाखवा. सहानुभूती आणि समजूतदारपणा कसा जोपासला जाऊ शकतो हे त्यांना दाखवा.

६. मनाने खंबीर व्हायला शिकवा :- मुलांना सांगा की अपयश आणि नकार हा जीवनाचा भाग आहे. कधी तुम्हाला सर्व बाजूंनी यश आणि टाळ्या मिळतील तर कधी निराशेला सामोरे जावे लागेल. त्यांना अपयशातूनही शिकण्यासाठी प्रोत्साहित करा. शांतता आणि समजूतदारपणाने संघर्ष सोडवायला शिकवा.

Web Title: 6 Best ways to help your child overcome Fear of Rejection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.