Lokmat Sakhi >Parenting > काहीही केलं तरी मुले पालेभाज्या खातच नाहीत? ६ उपाय, पालेभाज्याही खातील आवडीने...

काहीही केलं तरी मुले पालेभाज्या खातच नाहीत? ६ उपाय, पालेभाज्याही खातील आवडीने...

6 Ways to Get Kids to Eat and Love More Vegetables : मुलं भाज्या खात नाहीत ? अशी सतत तक्रार करण्यापेक्षा, सोपे उपाय वापरुन पहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 06:40 PM2023-05-03T18:40:37+5:302023-05-03T18:55:27+5:30

6 Ways to Get Kids to Eat and Love More Vegetables : मुलं भाज्या खात नाहीत ? अशी सतत तक्रार करण्यापेक्षा, सोपे उपाय वापरुन पहा...

6 clever ways to trick your kids into eating vegetables | काहीही केलं तरी मुले पालेभाज्या खातच नाहीत? ६ उपाय, पालेभाज्याही खातील आवडीने...

काहीही केलं तरी मुले पालेभाज्या खातच नाहीत? ६ उपाय, पालेभाज्याही खातील आवडीने...

"मुलांचे खाण्याच्या बाबतीत खूपच नखरे असतात," अशी तक्रार आपल्याला प्रत्येक पालकांकडून सतत ऐकायला मिळते. त्यातही पालेभाज्या व फळे खायचे म्हटलं की मुलं अजूनच नाक मुरडतात. पालेभाज्या, फळ खाणं यासोबत मुलांचा कायमचा ३६ चा आकडा असतो. मुलांच्या समोर पिझ्झा - बर्गर ठेवा, चॉकलेट ठेवा किंवा अजून कोणता चमचमीत पदार्थ ठेवा ते हसत हसत अगदी चवीने सगळं चाटून पुसून संपवतात. पण जेव्हा पालेभाज्या खाण्याचा विषय येतो, तेव्हा मात्र ही मुलं नाकं मुरडतात. हे नखरे फक्त तुमचाच पाल्य करतो असं तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही, जगातील सगळ्याच लहान मुलांना हिरव्या पालेभाज्या खायचे म्हटलं की नको नको असं होत. 

मुलांना कितीही समजावून सांगितले तरी पालेभाज्या व फळ त्यांना खाऊ घालणं हे पालकांच्या दृष्टीने फारच महाकठीण काम असत. त्यांच्यासमोर कितीही सुंदर पद्धतीने पालेभाजी बनवून ठेवली तरीही मुलं त्याच्याकडे बघत देखील नाहीत. अशा परिस्थितीत, मुलांना सकस, पौष्टिक आहार व पालेभाज्या खायला घालणे पालकांसाठी एक मोठा टास्कच असतो. काही सोपे पर्याय वापरुन आपण आपल्या मुलांना पालेभाज्या खाण्याची गोडी लावू शकता(6 Ways to Get Kids to Eat and Love More Vegetables).

मुलानांच्या मनात पालेभाज्यांबद्दलची गोडी कशी निर्माण करावी ? 

१. मुलांच्या आवडत्या डिशमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा :- मुलांना बाहेरच्या गोष्टी आणि फास्ट फुड खायला फारच आवडतं. त्यामुळे तुम्ही त्याच्या आवडत्या डिशमध्ये पालेभाज्या घालून त्याला खायला देऊ शकता. जसे की काही मुलांना नुडल्स आवडतात, तर तुम्ही नुडल्स बनवतानच त्यात हिरव्या पालेभाज्या घातल्या तर नुडल्स सोबत त्याच्या शरीरात हिरव्या पालेभाज्या सुद्धा जातील आणि त्याला आवश्यक पौष्टिक घटक सुद्धा मिळतील. पिझ्झा आणि बर्गर सोबत सुद्धा तुम्ही असा प्रयोग करून पाहू शकता.

मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? ८ टिप्स - मोबाइलशिवाय मुले जेवत झोपत नाही ही तक्रार संपेल...

२. जेवणाला नाही म्हणायची सवय मोडा :- जेवणाबाबतीत आणि एकंदर खाण्याबाबत तुम्ही लहान मुलांना काही गोष्टींची सवय लावली पाहिजे. त्यांना शिकवा की जे काही जेवण बनवलं आहे, ते खायलाच हवं. जर मुलं हिरव्या पालेभाज्या बघून जेवण जेवायचे टाळत असतील तर तुमची जबाबदारी आहे की त्या पालेभाज्यांपासून अशा डिशेस बनवाव्यात कि त्याला मुलं नकार देणारच नाही. त्या इतक्या स्वादिष्ट बनवा की त्याने त्या पूर्ण खायलाच हव्यात. मुलांची आवड - निवड ओळखून आवर्जून त्याला आवडेल असे जेवण बनवा.

३. मुलांना कलरफुल भाज्यांच्या डिशेज बनवून द्या :- लहान मुलांना वेगवेगळे गडद रंग आवडतात. त्याचप्रमाणे त्यांच्या आवडीचे रंग ओळखून पालकांनी भाज्या अधिक आकर्षक पद्धतीने कापल्या पाहिजेत. आपण या भाज्या नेहमी कापतो तशा न कापता मुलांना आवडतील अशा वेगवेगळ्या आकारात कापाव्यात. जसे की आपण चांदणीच्या आकारात किंवा प्राण्याच्या आकारात भाज्या कापून घेऊ शकता. त्यामुळे मुलांना भाजीपाला खायला आणि खेळायला मदत होईल. या वेगवेगळ्या आकारांतील भाज्या पाहून मुलांना ते खाण्याचा मोह होईल. या निमित्ताने मुलांकडून पटापट भाज्या खाल्ल्या जातील. 

आईबाबा ऑफिसात आणि वयात येणारी मुलं घरी एकटीच? ४ गोष्टी मुलांना सांगा, नाहीतर होते गडबड...

४. तुम्ही स्वतः त्यांच्यासमोर खा :- पालकांनी मुलांसाठी आदर्श बनले पाहिजे. तुमच्या मुलांसमोर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या गोष्टी करण्यास सुरुवात करा. मुलांसमोर तुम्ही देखील पालेभाज्या खायला सुरुवात करा. यामुळे  मूल तुम्हाला पाहून आरोग्यदायी गोष्टी लवकर आणि सहज खायला शिकेल. तुम्ही सर्वजण मिळून सकस आणि पौष्टिक अन्न खाण्यास सुरुवात करा. याचा मुलाच्या खाण्याच्या सवयींवर मोठा परिणाम होईल. मुले नेहमी मोठ्यांचे अनुकरण करत असतात आणि त्यात देखील सर्वप्रथम ते त्यांच्या पालकांचे अनुकरण करतात. तुम्हाला भाजी खाताना पाहून त्यालाही तुम्हाला कंपनी द्यावीशी वाटेल.

५. पालेभाज्या खाण्याची जबरदस्ती करु नका :- मुलांना पालेभाज्या खाण्याची जबरदस्ती करु नका. तसेच मुलानांच्या मागे पालेभाज्या खा असा लकडा लावू नका. यामुळे मुलांना पौष्टिक पदार्थ खाण्याचा तिरस्कार वाटू शकतो. यामुळे मुलांच्या पाठीमागे भाज्या खा अशी वारंवार जबरदस्ती करू नका. त्यापेक्षा त्यांच्या आवडत्या डिशमध्ये पालेभाज्या मिक्स करा किंवा भाज्यांच्या प्युरी बनवून त्यांचे सूप बनवून द्या. 

६. पालेभाज्यांची पौष्टिकता समजावून सांगा :- मुलांना पालेभाज्या खाण्याचे महत्त्व समजावून सांगा. पालेभाज्यांची पौष्टिकता किती आहे ? ते खाणे किती महत्वाचे आहे? ते खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो, यांसारख्या गोष्टींचे महत्व मुलांना साध्या, सोप्या सरळ मार्गाने समजावून सांगा. याचे महत्व मुलांना पटल्यावर मुलं आपोआप स्वतःहून पालेभाज्या खाऊ लागतील.

Web Title: 6 clever ways to trick your kids into eating vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.