पालकांची आपल्या पाल्याबद्दल काही खास तक्रार नसते. फक्त एकच तक्रार असते, ती म्हणजे आमचा मुलगा/मुलगी वेळेवर अभ्यास करत नाही. ही तक्रार प्रत्येक आई - वडील करत असतात. मुलं फार चंचल मनाची असतात. काही मुलं न सांगता अभ्यासाला बसतात, तर काहींच्या मागे लगावं लागतं. मुलांचे अभ्यासात मन न लागणे यामागे अनेक कारणे असू शकतात.
सध्याची मुलं मोबाईल, गेम्स, इंटरनेट या सगळ्यात व्यस्त झाले आहेत. अशावेळी प्रत्येक आईवडिलांना एकच प्रश्न सतावत असतो, की आपल्या मुलाला अभ्यासाची गोडी कशी लावावी? यासंदर्भात, गेटवे ऑफ हीलिंग सायकोथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चांदनी तुगनाईत यांनी मुलांमध्ये अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी, याबाबतीत काही टिप्स शेअर केले आहेत(6 effective ways to help your child learn faster).
संतुलित आहार
मुलांच्या आहारात काही बदल करून आपण त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करू शकतो. मानसिक विकासाच्या कमतरतेमुळे देखील मुलांचे लक्ष अभ्यासात लागू शकत नाही. त्यामुळे आहारतज्ज्ञांची मदत घेऊन मुलांना खास संतुलित आहार द्या.
लहान मुलांना चहा प्यायला द्यावा की नाही? वाढीच्या वयात चहा पिणं फायद्याचं की तोट्याचं?
मुलांचा ताण कमी करा
मुलांच्या जीवनात अभ्यास, मित्र, किंवा खेळ इत्यादींबाबत तणाव असू शकतो. आपल्यासाठी हा ताण खूपच लहान असला तरी, त्यांच्यासाठी मोठा असू शकतो. त्यामुळे ते जर चिंतीत असतील, तर त्यांचा ताण समजू घ्या, व त्यांचे लक्ष दुसरीकडे केंद्रित करायला मदत करा.
मुलांना मारू नका
मुलाने अभ्यासात काही चूक केली असेल तर, त्याला ओरडू किंवा मारू नका. त्यांना त्यांची चूक समजावून सांगा. मुलांना सतत मारलं तर, त्यांच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो.
मुलांची झोप पूर्ण होते की नाही पाहा
अनेकदा मुलांची झोप पूर्ण होत नसल्यामुळे त्यांची चिडचिड होते. त्याचं अभ्यासात मन लागत नाही. ज्यामुळे ते अभ्यास करताना टाळाटाळ करतात. मुलांना ८ ते १० तासांची झोप मिळायला हवी. शाळा - क्लास यात मुलं गुंतून जातात, त्यामुळे शरीरालाही आराम हवाच. झोप पूर्ण झाल्यामुळे त्यांचा अभ्यासातला रस आणखी वाढू शकतो.
मुलांना नियमांत करकचून बांधून ठेवलं तर मुलं ऐकतच नाहीत! ४ गोष्टी पालकांनी करायलाच हव्यात
मुलांशी संवाद साधा
मुलांशी संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. काही वेळेला मुलं त्यांच्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी इतरांसोबत शेअर करत नाहीत. ज्यामुळे त्यांना स्ट्रेस येतो. अशा स्थितीत त्यांच्यासोबत नियमित चर्चा करा, संवाद साधा. यामुळे ते आपल्याला नियमित सगळ्या गोष्टी न घाबरता शेअर करतील.
टाईम टेबल तयार करा
मुलांना वेळेचं महत्व पटवून द्या, त्यांना अभ्यासात मदत करा. यासह दिनचर्य तयार करा, व हे दिनचर्य एका टाईम टेबलवर लिहून ठेवा. मुलं हे टाईम टेबल रोज फॉलो करतील याची खात्री करा. यामुळे त्यांना शिस्तही लागेल. व वेळेवर अभ्यासही पूर्ण करतील.