Join us  

मुलं अभ्यासच करत नाही, टाळंटाळ करतात असं का होतं? तज्ज्ञ सांगतात ९ कारणं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 1:51 PM

9 Reasons why Children Lack interest in Studies : मुलं काही केल्या अभ्यासाला बसत नाहीत, सतत त्यांच्या मागे लागावं लागतं यामागची काही महत्त्वाची कारणं...

अभ्यास करणे आणि अभ्यास घेणे ही शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बाबतीतील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. अभ्यास म्हटलं की मुलं काहीतरी कारणं काढतात आणि अभ्यास करणं टाळतात. अभ्यासाचं नुसतं नाव घेतलं तरी अनेक मुलं घरातून पळ काढतात किंवा बरं वाटत नसल्याचे नखरे करतात. असे सगळे असले तरी मुलांनी वेळच्या वेळी नीट अभ्यास करणे त्यांच्याच जास्त फायद्याचे असते. मग पालक कधी गोड बोलून, कधी ओरडून तर कधी फटका देऊन मुलांना अभ्यासाला बसवतात आणि गृहपाठ किंवा अन्य अभ्यास करायलाच लावतात (9 Reasons why Children Lack interest in Studies). 

मुलांना अभ्यास का आवडत नाही, अभ्यास म्हटल की ते का पळ काढतात. अभ्यासाची त्यांना भिती वाटते की नकोसाच होतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. प्रिती वैष्णवी यांनी पॅऱेंटींग डायरीज विथ प्रिती या आपल्या इन्स्टाग्रामवर याची काही महत्त्वाची कारणे दिली आहेत. एरवी सगळ्या गोष्टी आवडीने, शांतपणे करणारी मुलं एकाएकी अभ्यासाच्या बाबतीत असं का करतात हा पालकांपुढील एक महत्त्वाचा प्रश्न असतो. तर पाहूयात मुलांना अभ्यास आवडत नाही यामागची महत्त्वाची कारणं.

(Image : Google)

१. मुलांना  अभ्यास आणि दैनंदिन व्यवहारातील गोष्टी यांच्यात काहीत संबंध नसल्याचे कळते आणि म्हणून त्यांचा अभ्यासातला रस नकळतपणे कमी होत जातो. 

२. अभ्यास करण्याचे असणारे प्रेशर आणि ताण यांमुळे मुलांना अभ्यास नकोसा वाटतो. हे प्रेशर कधी पालकांकडून तर कधी शिक्षकांकडून निर्माण झालेले असते. 

मुलं बुजरी न होता कॉन्फिडण्ट व्हायची तर पालकांनी करायला हव्यात ३ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात सोपी सूत्र

३. अभ्यास शिकण्याबाबत किंवा करण्याबाबत मुलांना असणाऱ्या अडचणी पालक किंवा शिक्षक म्हणून अनेकदा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे मुलांना एकप्रकारचे फ्रस्ट्रेशन येते आणि त्यांचा अभ्यासातील उत्साह कमी होतो. 

४. काय शिकावे आणि कसे शिकावे याबाबत मुलांना कोणत्याही प्रकारचा से नसेल तर मुलांना अभ्यासात म्हणावा तसा इंटरेस्ट राहत नाही. 

५. सध्या मुलांना स्मार्टफोन, सोशल मीडिया यासारखी डिस्ट्रॅक्शन्स असताना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे त्यांना काहीसे कठीण जाते. 

६. अभ्यास शिकवण्याच्या पारंपरिक पद्धती जसे की अभ्यासाचा तास, त्यानंतर काय शिकवले ते आठवणे आणि कमीत कमी इंटरॅक्शन यामुळे मुलांना कंटाळा येतो आणि अभ्यास नकोसा वाटतो. 

७. सध्या मुलांचा अभ्यासापेक्षा चांगले मार्क मिळवण्याकडे जास्त ओढा असलेला दिसतो. त्यामुळे मुलांचा अभ्यासातला इंटरेस्ट तुलनेने कमी असतो. 

८. घरात किंवा आजुबाजूला अभ्यासाला प्रोत्साहन देणारे वातावरण नसेल तर मुलांचा अभ्यासातला इंटरेस्ट कमी होतो. 

९. ज्या मित्रमंडळींसोबत मुलं असतात त्यांना अभ्यासाचे महत्त्व नसले किंवा त्यात रस नसला तर आपल्या मुलांचाही रस आपोआप कमी होतो. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंशाळा