Lokmat Sakhi >Parenting > आईवडिलांचा घटस्फोट झाला पण मी मात्र..! आमीर खानचा मुलगा सांगतो, ते वेगळे झाले तरी..

आईवडिलांचा घटस्फोट झाला पण मी मात्र..! आमीर खानचा मुलगा सांगतो, ते वेगळे झाले तरी..

Junaid Khan Spoke About His Life After Parents Divorce: आई- वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर बालपण कसं गेलं याविषयी सांगतो आहे अभिनेता आमीर खानचा मुलगा जुनैद खान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 16:31 IST2025-01-07T16:29:20+5:302025-01-07T16:31:17+5:30

Junaid Khan Spoke About His Life After Parents Divorce: आई- वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर बालपण कसं गेलं याविषयी सांगतो आहे अभिनेता आमीर खानचा मुलगा जुनैद खान..

Aamir Khan's son Junaid Khan spoke about his life after parents divorce | आईवडिलांचा घटस्फोट झाला पण मी मात्र..! आमीर खानचा मुलगा सांगतो, ते वेगळे झाले तरी..

आईवडिलांचा घटस्फोट झाला पण मी मात्र..! आमीर खानचा मुलगा सांगतो, ते वेगळे झाले तरी..

Highlightsजुनैद खान सांगतो त्या दोघांचा घटस्फोट झाला असला तरी आम्ही चौघं कुटूंब म्हणून नेहमीच....

आमीर खान आणि रिना दत्ता ही काही वर्षांपुर्वी एक लोकप्रिय जोडी होती. आमीर रिनाच्या प्रेमात कसा वेडा होता, त्याने तिला कसं प्रपोज केलं, तिचा होकार मिळविण्यासाठी त्याला काय काय करावं लागलं, असे त्यांच्या प्रेमाचे किस्से बरेच व्हायरल आहे. पण सुरुवातीला असं सगळं गोडगुलाबी असूनही आणि लग्नानंतर तब्बल १६ वर्षांचा संसार होऊनही त्यांचं नातं तुटलं. त्यावेळी त्यांची मुलं लहान होती. धाकटा मुलगा जुनैद हा अवघ्या ८ वर्षांचा होता. आता पालकांचा घटस्फोट होणं हा मुलांसाठी मोठाच आघात असतो. पण सुदैवाने मी त्याला अपवाद ठरलो. मला गरज होती तेव्हा माझे आई- वडील दोघेही माझ्यासोबत होते. त्या दोघांचा घटस्फोट झाला असला तरी आम्ही चौघं कुटूंब (आमीर, रिना आणि मुलं इरा, जुनैद) म्हणून नेहमीच सोबत होतो आणि आहोत असं जुनैद खान सांगतो...(Aamir Khan's son Junaid Khan spoke about his life after parents divorce)

 

जुनैद खानने नुकतीच विकी ललवाणी यांना एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने एक वडील म्हणून आमीर कसा आहे, याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. ज्या मुलांच्या पालकांचा घटस्फोट होतो त्या बहुतांश मुलांनी आपल्या आई- वडिलांना नेहमीच एकमेकांशी भांडताना पाहिलेलं असतं.

तिळाचे लाडू करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी, फक्त १० मिनिटांत करा किलोभर तिळाचे लाडू

पण जुनैद म्हणतो की माझ्या बाबतीत तसं झालं नाही. मुलांसमोर त्यांनी कधीच कुठले वाद घातले नाहीत. मी ८ वर्षांचा असताना माझे पालक वेगळे झाले. पण जेव्हा मी १९ वर्षांचा होतो तेव्हा त्यांना पहिल्यांदा भांडताना पाहिलं. त्या दोघांनीही त्यांच्यातील वादाचा कोणताच परिणाम आमच्यावर होऊ दिला नाही. घटस्फोटाने त्यांना वेगळं केलं असलं तरी पालक म्हणून अजूनही आमच्यासाठी ते एकत्रच आहेत. यातूनच ते आई- वडील म्हणून किती परिपक्व आहेत हे दिसून येतं.

 

जुनैद सांगतो जसं जसं वय वाढत आहे तसं तसं एक बाप म्हणून आमीर आणखीनच हळवा होत आहे. त्याला अधिकाधिक वेळ आमच्यासोबत राहावं वाटतं. आजही इराचं लग्न झालेलं असलं तरीही ते चौघं दर मंगळवारी सायंकाळी चहासाठी एकत्र जमतात.

तासनतास बैठं काम करून मान- पाठ दुखते? ५ मिनिटांत होणारे ३ सोपे व्यायाम- लगेच मिळेल आराम 

भरपूर गप्पा मारतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात आणि पुन्हा आपापल्या मार्गाला लागतात. आईवडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर खूप कमी मुलांच्या नशिबात हे सुख येतं.. याचं समान श्रेय आमीर आणि रिनाला जातं. किरण राव असो किंवा रिना दत्ता असो... आमीरचे कुटूंबिय म्हणून ते सगळेच नेहमी एकत्र असतात, याची झलक इराच्या लग्नातही दिसून आली..

 

Web Title: Aamir Khan's son Junaid Khan spoke about his life after parents divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.