Join us  

मुलांचं करिअर चांगलं व्हावं यासाठी 'ही' एकच गोष्ट करा... आर. माधवनचा पालकांसाठी खास सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2023 3:51 PM

Actor R. Madhavan Speaking About Carrier Of Children: मुलांचं करिअर चांगलं व्हावं यासाठी पालकांची भुमिका कशी असली पाहिजे, याविषयी अभिनेता आर. माधवन याने दिलेला हा खास सल्ला एकदा वाचा...

ठळक मुद्देlearnwithhustler या इन्स्टाग्राम पेजवरून आर. माधवन याच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग शेअर करण्यात आला आहे.

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणूनच आर. माधवन ओळखला जातो. मोजक्याच भूमिका पण त्या ही अतिशय ताकदीने करणारा अभिनेता म्हणून आर. माधवन याच्याकडे पाहिलं जातं. तो अभिनेता म्हणून तर चांगला आहेच, पण व्यक्ती म्हणून आणि खासकरून एक पिता म्हणूनही तो उत्तम आहे, असं त्याच्या बाबतीत नेहमीच बोललं जातं. एक पिता म्हणून तो त्याच्या मुलाकडे कसं लक्ष देतो, किंवा त्याचं करिअर चांगलं व्हावं म्हणून नेमकी काय काळजी घेतो, याविषयी त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे (how to develop carrier of children?). मुलांच्या करिअरची, भविष्याची चिंता करणाऱ्या अनेक पालकांसाठी तो जे काही बोलला आहे, ती माहिती मार्गदर्शक ठरू शकते.(Actor R. Madhavan says just do 1 thing for the best carrier of your children)

 

learnwithhustler या इन्स्टाग्राम पेजवरून आर. माधवन याच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग शेअर करण्यात आला आहे.

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

यामध्ये त्याला एक महिला प्रश्न विचारते की जर तुमच्या मुलाने तुम्हाला मी काय करिअर करू, असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल.. या प्रश्नाचं उत्तर देताना माधवन म्हणाला की ग्रेट हा एकच शब्द मी म्हणेल. ग्रेट करिअर म्हणजेच ॲम्बिशन आणि डिसिप्लिन यांचं कॉम्बिनेशन आहे.

 

पुढे बोलताना तो म्हणाला की मुलांचं करिअर चांगलं व्हावं यासाठी सगळ्यात आधी त्यांना त्यांचं रुटीन योग्य पद्धतीने फॉलो करायला सांगा. योग्य रुटीन फॉलो करणे म्हणजे सकाळी लवकर उठणे, सकाळी लवकर उठण्यासाठी त्यांना अभ्यास, खेळ असं काही कारण द्या.

हिवाळ्यात त्वचा राहील मुलायम- चमकदार, तेलकट त्वचेसाठी वापरून पाहा 'हे' ३ नाईट क्रिम... 

या कारणासाठी त्यांना सकाळी उठायचं असेल तर मुलांना रात्री लवकर झोपावं लागेल. रात्री लवकर झोपण्यासाठी त्यांना त्यांचं काम रात्री ९ च्या आधी संपवावं लागेल. रुटिन खराब करण्याचा खरा प्रश्न रात्री ९ नंतरच निर्माण होतो. त्यामुळे मुलांचं करिअर चांगलं होण्यासाठी त्यांना आधी शिस्त लागणं गरजेचं आहे, असा अर्थ माधवनच्या बोलण्यातून निघतो. 

 

टॅग्स :पालकत्वआर.माधवनलहान मुलं