माझ्या आईने मला वयाच्या १४ व्या वर्षीच लैंगिक शिक्षण दिलं होतं. म्हणजेच मी वयात येताना मला लैंगिक गोष्टींबाबत माहिती असावी असं तिला वाटत होतं असं अभिनेत्री कल्की कोचलिन हीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. यामध्ये आईने आपल्याला गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम यांसारख्या सगळ्या गोष्टींबद्दल विस्ताराने माहिती दिली होती. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तिला स्वत:ला वयाच्या १७ व्या वर्षी गर्भधारणा झाली होती. त्यावेळी तिचं वय खूप लहान असल्याने तिला मूल नको होतं. मात्र तिला ती गर्भधारणा तेव्हा ठेवावी लागली आणि ही सगळी परिस्थीती मॅनेज करणं त्या काळात तिच्यासाठी खूप अवघड होतं असंही ती म्हणाली (Actress Kalki Koechlin talk about sex education).
आता नातेसंबंधांमध्ये जर चुकून मुलीला गर्भधारणा झाली तर लग्न करण्याचा पर्याय असतो आणि बरेच जण असे करतातही. पण तिच्या आयुष्यात घडलेल्या या गोष्टींमुळे मला वेळेत या सगळ्या गोष्टींची माहिती असावी असं तिला वाटत असल्याने तिने कमी वयातच मला या सगळ्याची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे सगळ्याच पालकांनी आपल्या मुलांना ते वयात येताना लैंगिक गोष्टींबाबत न संकोच करता आवश्यक ती माहिती द्यायला हवी असे मतही कल्कीने यावेळी व्यक्त केले.
कल्की तिच्या कामामुळे आणि हृतिक रोशन याच्याशी असलेल्या नातेसंबंधामुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडिया किंवा सामाजिकरित्याही जास्त व्यक्त न होणारी कल्की नुकतीच लैंगिक शिक्षण या काहीशा न बोलल्या जाणाऱ्या विषयावर व्यक्त झाली. मुलांना लैंगिक शिक्षण नेमके कोणत्या वयात द्यावे याविषयी बरीच मतमतांतरे आहेत. कल्कीने याबाबत आपला अनुभव हॉटरफ्लाय आणि स्टोरी टेलर इंडिया यांना ही मुलाखत दिली असून त्याच्या लहानशा भागाचे रिल इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.