Join us  

करिना कपूरने सांगितला तिच्या दोन्ही मुलांचा मजेशीर किस्सा, म्हणाली खूप कठीण असतं जेव्हा.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 1:27 PM

Kareena Kapoor Reveals Funny Things About Her Children: करिना कपूरने जो मजेशीर किस्सा सांगितला आहे, त्याचा अनुभव दोन अपत्य असणाऱ्या जवळपास प्रत्येक आईला येतोच...

ठळक मुद्देअगदी रोजच्या सवयींपासून ते पर्यटनाच्या ठिकाणांपर्यंत बऱ्याच बाबतीत करिना म्हणते तसेच अगदी दोघं दोन ध्रुव असतात. अशावेळी दोघांची मनं सांभाळून सुवर्णमध्य साधता येणं पालकांना जमायला हवं.

अभिनेत्री करिना कपूर सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. हेल्थ, फिटनेस याविषयीचे वेगवेगळे विषय तर ती शेअर करतेच, पण तिच्या स्वत:चे, कुटूंबाचे, मुलांचे अनेक किस्सेही सांगत असते. आज करिना आणि सैफ हे दोघेही जेवढे प्रसिद्ध आहेत, तेवढीच चर्चा त्यांच्या तैमूर आणि जेह (Jeh and Taimur) या दोन मुलांचीही होत असते. आता करिनाने नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली असून यामध्ये ती जे काय मजेशीर सांगते आहे, ते दोन अपत्य असणारी आई थोड्या फार फरकाने अनुभवतच असते. (kareena kapoor reveals about her children)

 

करिनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये साधारण तिच्याच मुलांच्या वयाची असणारी दोन भावंडं दाखवली आहेत. त्यापैकी जो धाकटा आहे तो चिखलामध्ये खूप आनंदाने उड्या मारत आहे. त्याला तसं करण्यात खूप मजा येत आहे.

ऑक्सिडाईज सुंदर जोडवी मिळतील फक्त १५० रुपयांत, पाहा लेटेस्ट डिझाइन्स खास सणावारांसाठी

त्याउलट दुसरा मोठा मुलगा मात्र त्या चिखलाच्या पाण्यापासून खूप दूर उभा आहे आणि त्याला ते अजिबात आवडत नाही. ही स्टोरी शेअर करताना करिना म्हणतेय “God this is so true”. ज्या पालकांना दोन अपत्य आहेत, त्यांना हा अनुभव कधी ना कधी किंवा काही पालकांना तर अगदी रोजच्या रोज येतच असणार. दोघांच्या आवडीनिवडी अगदी वेगळ्या असतात आणि त्या दोन्ही पुर्ण करताना मात्र पालकांच्या नाकीनऊ येतात. 

 

खाण्यापिण्याच्या बाबतीत जेव्हा मुलांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, तेव्हा त्या घरातल्या बाईची खरी पंचाईत होते. घरात मोजकी ४ माणसं आणि त्यात दोघांच्या आवडी अगदी टोकाच्या. त्यामुळे करावं काय हा प्रश्न पडतो. शिवाय एकाच्याच मनाचं सतत झालेलंही चालत नाही.

नुकत्याच वयात आलेल्या मुलींना पिरियड्सचा खूप त्रास होतो? ६ पदार्थ खाऊ घाला, पोटदुखी कमी होईल

दोन्ही बाळांची मनं सारखीच जपावी लागतात. अगदी रोजच्या सवयींपासून ते पर्यटनाच्या ठिकाणांपर्यंत बऱ्याच बाबतीत करिना म्हणते तसेच अगदी दोघं दोन ध्रुव असतात. अशावेळी दोघांची मनं सांभाळून सुवर्णमध्य साधता येणं पालकांना जमायला हवं. नाहीतर मग आई- बाबा माझं ऐकतच नाहीत, त्यांना मी आवडतच नाही, त्यांचं माझ्यावर प्रेमच नाही, ही भावना मुलांच्या बालमनात जोर धरायला वेळ लागत नाही. तोच अनुभव करिना आणि सैफ सध्या घेत आहेत, असं  दिसतं.

 

टॅग्स :पालकत्वकरिना कपूरसैफ अली खान तैमुर