अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांची मोठी मुलगी म्हणजे अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan). आता साराची ओळख फक्त सैफ आणि अमृता यांची मुलगी किंवा शर्मिला टागोर यांची नात एवढीच मर्यादित राहिलेली नाही. कारण आता तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नव्या फळीची आघाडीची अभिनेत्री म्हणून सारा खान ओळखली जाते. साराच्या एका मुलाखतीचा भाग सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या लहानपणी तिच्यावर जे काही प्रसंग ओढावले त्याबद्दल सांगते आहे... (Actress sara ali khan explains about her life after parents divorce)
सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाला तेव्हा सारा आणि तिचा भाऊ इब्राहिम हे दोघेही लहान होते. त्यामुळे आई- वडिलांमध्ये आलेल्या दुराव्याचा आणि त्यानंतर सैफच्या दुसऱ्या लग्नाचा परिणाम त्या दोघांच्याही मनावर झालाच.
सतत अपचनाचा त्रास? आहारतज्ज्ञ सांगतात 'या' पद्धतीने लवंग खा- पचन चांगलं होऊन मिळतील ५ फायदे
याविषयी सारा सांगते की सिंगल मदरसोबत राहताना तुम्हाला लहान वयातच खूप वेगवेगळ्या भुमिका पार पाडाव्या लागतात. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जी मुलं सिंगल पॅरेंटसोबत राहतात त्यांना इतर मुलांच्या तुलनेत एक गोष्ट खूप लवकर समजून येते आणि ती गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी काही करायला कोणी येणार नाही.
मुलीच्या नाकात अडकलेला मनुका दिसला नाही म्हणून आईने डॉक्टरांना फटकारलं.... बघा व्हायरल स्टोरी
तुमचं तुम्हाला उठून तुमच्यासाठी करावं लागणार आहे. सारा असंही म्हणाली की याचा अर्थ मला कोणाची मदत मिळाली नाही असा नाही. पण तरीही एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडून येण्यासाठी वाट पाहात बसणं हे या मुलांच्या हातात नसतं. त्यांची सुरुवात त्यांनाच करावी लागते.
घटस्फोटानंतर अमृतानेही स्वत:ला खूप लवकर सावरलं. झूम टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत तिनेच सांगितलं आहे की मला खूप लवकर त्या परिस्थितीतून बाहेर पडायचं होतं.
वजन- शुगर वाढेल म्हणून बटाटा खाणं टाळता? बघा बटाटा खाऊनही वजन कंट्रोलमध्ये ठेवण्याच्या टिप्स
कारण मला असं मुळीच वाटत नव्हतं की आपल्याला एका loser parent सोबत सोडून दिलं आहे, अशी भावना मनात घेऊन माझ्या मुलांनी मोठं व्हावं. त्यामुळे थोडा ब्रेक घेऊन अमृतानेही पुन्हा चित्रपटात काम करायला सुरुवात केली आणि मुलांसमोर एक उत्तम आदर्श ठेवला.