आपल्या पालकांकडूनच आपण आदर्श पालकत्त्व काय असतं ते शिकत असतो. आपले पालक आपल्याला जसं वाढवतात साधारणपणे त्याच पद्धतीने आपण मुलांना वाढवण्याचा प्रयत्न करतो. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिने नुकतीच अभिनेत्री आणि तिची नणंद असलेली सोहा अली खान हिची मिरची प्लसवर पालकत्त्वाबाबत मुलाखत घेतली. त्यामध्ये करीनाने सोहाला अनेक प्रश्न विचारले आणि सोहानेही अतिशय मोकळेपणाने या प्रश्नांची उत्तरे दिली. पालकत्त्वाबद्दल तू तुझ्या पालकांकडून काय शिकलीस असं विचारलं असता सोहा म्हणाली, माझे वडील म्हणजेच मन्सूर अली खान हे कधीच असे करा, तसे करा असं सांगत नसत. तर तुम्ही पाहून, अनुभव घेऊन, निरीक्षण घेऊन ते शिकावं असं त्यांचं म्हणणं असे. त्यामुळेच त्यांनी कोणत्याही गोष्टीविरुद्ध कधी आवाज उठवलाय असं झालं नाही (Actress Soha Ali khan about her Upbringing and how she learn Parenting from her parents).
बाळ सांभाळायला कुणी नाही म्हणून नोकरी सोडली, ब्रेक घेतला? निर्णयाचा आनंद होतो की पश्चाताप?
तर सोहा सांगते, माझी आई शर्मिला टागोर वर्किंग मदर होती. तिच्या तारुण्यात तिने खूप झोकून देऊन काम केले. त्यामुळे ती कामाच्या निमित्ताने खूप काळ आमच्यापासून दूर असायची. तरीही आमच्या वाढण्यात तिचा खूप मोठा आणि महत्त्वाचा वाटा आहे. एकदा आई २ महिन्यांसाठी बाहेरगावी गेली होती, तेव्हा मी तिला खूप जास्त मिस करत होते आणि रोज पत्र लिहीत होते. काहीवेळा तिने माझा वाढदिवसही मिस केला आहे. पण ती म्हणायची, मी आले की आपण सेलिब्रेट करुया, आणि मीही तिची आतुरतेनं वाट पाहत राहायचे.
त्यामुळेच आमचं रिलेशन खूप वेगळं, खूप जवळचं आहे. आई वडीलांकडून आपण पालकत्त्वाबद्दलच्या या २ महत्त्वाच्या गोष्टी शिकलो असं सोहाने सांगितलं. सोहा आणि कुणाल खेमू यांना इनाया ही एक मुलगी आहे. तिला वाढवताना या गोष्टी अतिशय उपयुक्त ठरत असल्याचेही सोहा म्हणाली. सध्या सोशल मीडिया, सेलिब्रिटी चाईल्ड असण्याचे प्रेशर हे सगळे आजुबाजूला असताना आपल्या मुलांचे यात काय होणार याबद्दल काळजी वाटते असेही सोहा म्हणाली. कोणत्याही मुलाला माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत असताना सगळ्यांपेक्षा आपण वेगळे असावे असे नाही वाटत. तर त्यांना कोणाशी तरी संबंधित, कनेक्टेड असायचे असते.