Join us  

आलिया भट म्हणते, लेकीला छातीशी घट्ट धरलं आणि तिनं माझ्या चेहऱ्यावरुन हात फिरवला, तेव्हा वाटलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 7:34 PM

Alia Bhatt Breastfeeding Photo – Alia Bhatt Shares Rahas Breastfeeding Gesture and Revel Her Unique Nicknames : आई होण्याचा अनुभव प्रत्येकीसाठी खास असतो, आपल्या बाळाचं कोडकौतुक प्रत्येक आई करते, आलिया भटही तेच सांगतेय..

आई होण्याचा अनुभव हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. बाळाला जन्म दिल्यापासून ते त्या बाळाचं पालनपोषण हा एक प्रवास असतो. कधी चुकतो, कधी भीती वाटते तर कधी आनंदाने मोहरुन जायला होतं. यासाऱ्यात आई आपल्या बाळाला पहिले सहा महिने फक्त स्तनपान करते, ते शिकून घेते. बाळाच्या भुकेची काळजी घेते हे सारं विलक्षण मायेनं भारलेलं असतं. आलिया भट नुकतीच आई झाली ती ही या साऱ्या अनुभवातून जाते आहे. ती म्हणतेच बाळ आल्यानंतर सारं जगणंच बदललं, अगदी बाळाला दूध पाजलं त्या क्षणापासून बदललेलं सारं किती विलक्षण होतं असं आलियालाही वाटतं. 

 आलियाने आपला मातृत्वाचा अनुभव शेअर केला आहे. ६ नोव्हेंबर २०२२ आलिया-रणबीरने राहाला जन्म दिला. सध्या आलिया तिचं काम आणि आईची कर्तव्ये चोखपणे पार पाडत आहे. आलियाने प्रेगनन्सी नंतर स्वत: ला सुंदरपणे बदलले आहे आणि बाळाला जन्म दिल्यानंतर सहा महिन्यांत वाढलेलं वजन कमी केलं आणि कामालाही सुरुवात केली(Alia Bhatt Reveals Baby Raha's Cutesy Gesture When She Breastfeeds Her, Shares Her Unique Nicknames).

आलिया सांगते तो क्षण...

हार्पर बाजार मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्टने तिची मुलगी राहासोबतच्या तिच्या सुंदर क्षणांबद्दल सांगितले आहे. आलिया म्हणते, जेव्हा मी राहाला फिडिंग करते तेव्हा मी तिच्याकडे पाहते आणि तिच्या चेहऱ्याला स्पर्श करते. तो अनुभवच खास आहे. एकदा दूध पिता पिता माझी लेक  माझ्या चेहऱ्याला स्पर्श करू लागली, तेव्हा मला असे वाटू लागले की, हा दिवसातला सर्वात सुंदर आनंदी क्षण आहे. आम्हा दोघींसाठीचा एक खास क्षण.

एवढूशा लेकानं आईला वाढला नाश्ता.. करिना कपूरची व्हायरल पोस्ट, जेहची तारीफ करत म्हणाली...

बाळ झाल्यानंतर लगेच स्लिम व्हायचा हट्ट तरी कशाला? आलिया भटचा सल्ला, आई झाल्यावर...

आपली मुलगी राहाच्या नावाचा वेगवेगळ्या भाषेत अर्थ सांगताना आलिया सांगते, अरबीमध्ये राहाच्या नावाचा अर्थ शांतता, स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंद, हिंदीत याचा अर्थ मार्ग असा आहे. आम्ही तिला वेगवेगळ्या टोपणनावाने देखील हाक मारतो. मी तिला pumpkin, pudding, pumpkin latte आणि cappuccino या नावांनी देखील हाक मारते. मी तिला कधी कधी काहीही नावाने हाक मारते. ज्या शब्दांचा उच्चार गोड असतो ती राहाची टोपण नावे आहेत, असे अलिया सांगते. या दिवसांत मी शिकलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम असंही आलिया सांगते.

टॅग्स :पालकत्व