Join us  

आलिया भट सांगतेय लेकीला ‘बेबी बी काईंड!’ छानछान गोष्टी सांगून मुलीला वळण लावणाऱ्या पुस्तकाची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2024 3:39 PM

Advantages Of Story Telling On Kids Brain Development: मुलीला गोष्टी सांगण्यात दंग असणाऱ्या आलिया भटचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देआलियाची लेक राहा सध्या दिड- पावणेदोन वर्षांची आहे. या वयापासूनच जर मुलांना गोष्टी ऐकण्याची सवय लावली तर ते मुलांच्या प्रगतीसाठी खूपच चांगले आहे.

आलिया भट (Alia Bhatt), रणबीर कपूर आणि त्यांची लाडकी लेक राहा (Raha Kapoor) हे तिघेही कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात. आलिया आणि रणबीर त्यांच्या बिझी शेड्यूलमधूनही राहासाठी वेळ काढतात. दोघांपैकी एक जण कायम तिच्यासोबत असतोच. त्यामुळे त्यांचं पॅरेण्टिंग हा देखील अनेकांसाठी एक कौतूकाचा विषय आहे. त्यातच सध्या आलिया भटने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे (benefits of telling story to kids). त्या फोटोमध्ये असं दिसतंय की आलिया तिच्या लाडक्या लेकीला गोष्ट सांगण्यात दंग झाली आहे. (5 benefits of listening story for kids)

 

मुलांना गोष्टी सांगितल्याने काय फायदे होतात?

आलियाची लेक राहा सध्या दिड- पावणेदोन वर्षांची आहे. या वयापासूनच जर मुलांना गोष्टी ऐकण्याची सवय लावली तर ते मुलांच्या प्रगतीसाठी खूपच चांगले आहे. त्यामुळे इतर पालकांनी आलियाकडून या पॅरेण्टिंग टिप्स नक्कीच घेतल्या पाहिजेत. 'बेबी बी काइण्ड' नावाचं पुस्तक आलिया भट लेकीला वाचून दाखवते आहे. लहान मुलंही इतरांशी कशी प्रेमानं वागू शकतात. कसं वागायचं, इतरांना मदत कशी करायची, गोष्टी वाटून कशा घ्यायच्या, राग आला तर कसं वागायचं, हे सगळं मुलांना कळेल अशा शब्दात कसं सांगायचं. मुलं तसं वागतील असा प्रयत्न करणारं हे पुस्तक आहे. ब

सीटचा भाग खूपच वाढला? आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगतेय व्यायाम, बेढब शरीराला येईल आकार

गोष्टी ऐकल्याने मुलांना नेमके कसे आणि किती फायदे होतात?

१. पालक स्वत: मुलांना गोष्टी सांगत असतील तर त्याचा सगळ्यात मुख्य फायदा म्हणजे पालकांचा आणि मुलांचा एकमेकांशी संवाद होतो. सध्याच्या काळात ते खूप गरजेचं आहे. पालक आणि मुलं दोघं एकमेकांसाेबत क्वालिटी टाईम घालवू शकतात. त्यामुळे त्यांची एकमेकांशी आणखी घट्ट भावनिक जवळीक निर्माण होते.

 

२. मुलं गोष्टी ऐकताना त्यात पुर्णपणे दंग होऊन जातात. यातून मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. मुलांची एकाग्रता वाढली तर त्याचा परिणाम आपोआपच त्यांच्या अभ्यासावर दिसून येतो.

यामी गौतमच्या आवडीचा 'चंबा का राजमा'- बघा हिमाचल प्रदेशची खास रेसिपी, चव घेताच म्हणाल आहाहा....

३. सध्याची बरीच मुलं हायपर ॲक्टीव्ह म्हणजेच खूप जास्त चुळबूळ करणारे या गटात येतात. याचं कारण म्हणजे टीव्ही आणि मोबाईल. अशा हायपर ॲक्टीव्ह मुलांना शांत करण्यासाठी गोष्टीचे तंत्र खूप उपयोगी ठरते.

 

४. मुलांची कल्पनाशक्ती वाढविण्यासाठी गोष्टी सांगण्याचा खूप फायदा होतो. कारण मुलांना जेव्हा गोष्ट सांगितली जाते तेव्हा ते त्या गोष्टीतली पात्र, ठिकाणं, प्रसंग मनातल्या मनात रंगविण्याचा प्रयत्न करतात. यातून त्यांची कल्पनाशक्ती वाढत जाते. 

फेसबूकवरून मिळाली चित्रपटाची ऑफर आणि... बघा कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या अनसुया सेनगुप्ताची भन्नाट गोष्ट...

५. मुलांचा भावनिक, मानसिक, बौद्धिक विकास होण्यासाठीही गोष्टी ऐकण्याची सवय खूप उपयोगी ठरते. कारण ते गोष्टीतल्या प्रत्येक प्रसंगाशी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न करतात. यातून त्यांच्या भावभावनांचा विकास होतो. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआलिया भटरणबीर कपूर