Lokmat Sakhi >Parenting > वयात येणाऱ्या मुलांना शिकवा ३ गोष्टी, होतील लवकर स्वावलंबी- त्यांच्या गुणांचं सगळ्यांना वाटेल कौतुक

वयात येणाऱ्या मुलांना शिकवा ३ गोष्टी, होतील लवकर स्वावलंबी- त्यांच्या गुणांचं सगळ्यांना वाटेल कौतुक

Parenting Tips: मुलगा असो किंवा मग मुलगी असो, आईने प्रत्येकालाच ३ गोष्टी आवर्जून शिकवल्या पाहिजेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा...(how to make your child independent?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 01:50 PM2024-07-11T13:50:44+5:302024-07-11T16:13:11+5:30

Parenting Tips: मुलगा असो किंवा मग मुलगी असो, आईने प्रत्येकालाच ३ गोष्टी आवर्जून शिकवल्या पाहिजेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा...(how to make your child independent?)

always teach these 3 lessons to your kids to make them independent child, how to make your child independent? | वयात येणाऱ्या मुलांना शिकवा ३ गोष्टी, होतील लवकर स्वावलंबी- त्यांच्या गुणांचं सगळ्यांना वाटेल कौतुक

वयात येणाऱ्या मुलांना शिकवा ३ गोष्टी, होतील लवकर स्वावलंबी- त्यांच्या गुणांचं सगळ्यांना वाटेल कौतुक

Highlights३ गोष्टी त्यांना नक्कीच स्वावलंबी बनवतील. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा...

जी मुलं सध्या १५ ते २० या वयोगटात आहेत, त्यांच्या पालकांची आणि विशेषत: आईची नेहमीच अशी तक्रार असते, की मुलं कामं ऐकतंच नाहीत. त्यांची स्वत:ची कामंही त्यांना व्यवस्थित जमत नाहीत. त्यांची अभ्यासाची पुस्तकं, शाळा- कॉलेजचं सामान हे देखील ते व्यवस्थित ठेवत नाहीत. एवढ्या मोठ्या मुलांना शिस्त लावणं मग आईसाठी कठीण होतं. म्हणूनच तुमच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून अगदी कमी वयापासूनच मुलांना ३ गोष्टी आठवणीने शिकवा (always teach these 3 lessons to your kids to make them independent child). या ३ गोष्टी त्यांना नक्कीच स्वावलंबी बनवतील. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा...(how to make your child independent?)

मुलांना स्वावलंबी बनविणाऱ्या ३ गोष्टी...

 

१. स्वयंपाक

आपल्या मुलांनी अगदी साग्रसंगीत पंचपक्वानांचा स्वयंपाक करावा असं मुळीच नाही. पण त्यांच्या गरजेपुरते, त्यांच्या आवडीनुसार त्यांना नक्कीच काही ना काही करता आलं पाहिजे. लॉकडाऊनचा काळ आपण अनुभवला.

आईचे दागिने लेकीलाही आवडतात! नीता अंबानींचे दागिने इशा घालते हौशीने, पाहा त्या दागिन्यांची झलक

अशावेळी आपलं सगळं आपल्याला करता येणं हे मुलींप्रमाणेच मुलांसाठीही अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे मुलगा- मुलगी असा भेद न करता दोघांनाही स्वयंपाकाची गोडी लावा. त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करायला शिकवा.

 

२. वस्तू जागेवर ठेवणे

वापर झाल्यानंतर घरातली प्रत्येक वस्तू जागेवरच गेली पाहिजे ही शिस्त मुलांना अगदी लहानपणापासून लावा. खेळून झाल्यानंतर खेळणी जागेवर ठेवायला शिकवा.

नेहमीच्या कैरीच्या लोणच्याला द्या लसणाचा खमंग तडका, चव होईल आणखी झकास- बघा रेसिपी

हळूहळू त्यांचे दप्तर, पुस्तकं, कपडे जागच्याजागी आणि व्यवस्थित ठेवण्याचं वळण लावा. त्यानंतर हळूहळू घरातल्या इतर वस्तू आवरायला शिकवा. ही सवय मुलांना लागली तर ते कधीच एखादी वस्तू हरवली म्हणून तुमच्याकडे विचारायला येणार नाहीत. 

 

३. स्वत:ची कामे करू देणे

मुलं लहान असतात तेव्हा पालक आणि विशेषत: आई हौशीने त्यांची कामं करून देतात. हळूहळू ही सवय मुलांना लागते आणि ते स्वत:च्या प्रत्येक लहान- मोठ्या कामासाठी आईला गृहित धरतात.

एरेका पाम वाढतच नाही, पानंही पिवळी पडली? कुंडीत ३ घरगुती पदार्थ घाला, ८ दिवसांतच बहरेल...

त्यामुळे मुलं मोठी होतील तसे तसे त्यांचे एकेक काम त्यांच्यावर सोपवत चला. सुरुवातीला ते चुकतील. तुमच्यासारखं परफेक्ट करणार नाहीत. पण हळूहळू नक्की शिकतील. 

 

Web Title: always teach these 3 lessons to your kids to make them independent child, how to make your child independent?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.