Lokmat Sakhi >Parenting > लेकीला वळण लागण्यासाठी अनुष्का शर्मा करते 'या' गोष्टी, म्हणाली आम्ही परिपूर्ण पालक नाही, पण....

लेकीला वळण लागण्यासाठी अनुष्का शर्मा करते 'या' गोष्टी, म्हणाली आम्ही परिपूर्ण पालक नाही, पण....

Anushka Sharma Reveals About Her Parenting: मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अनुष्का शर्माने पालक म्हणून ती कशी आहे, हे सांगणाऱ्या काही रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2024 04:15 PM2024-09-05T16:15:10+5:302024-09-05T16:16:33+5:30

Anushka Sharma Reveals About Her Parenting: मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अनुष्का शर्माने पालक म्हणून ती कशी आहे, हे सांगणाऱ्या काही रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत.. 

Anushka sharma reveals about her parenting experience, says parenting is a tough job | लेकीला वळण लागण्यासाठी अनुष्का शर्मा करते 'या' गोष्टी, म्हणाली आम्ही परिपूर्ण पालक नाही, पण....

लेकीला वळण लागण्यासाठी अनुष्का शर्मा करते 'या' गोष्टी, म्हणाली आम्ही परिपूर्ण पालक नाही, पण....

Highlightsअनुष्का म्हणते की मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी तुमच्या 'इन्स्ट्रक्शन्स'पेक्षा तुम्ही घेतलेल्या 'ॲक्शन' महत्त्वाच्या आहेत, असं आम्हाला दोघांनाही वाटतं.

आपल्याला माहिती आहेच की अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohali) यांनी काही महिन्यांपुर्वीच त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. मोठी मुलगी वामिका आणि मुलगा अकाय या दोघांचं संगोपन करण्यात अनुष्का सध्या पुर्ण वेळ बिझी असून तिचा तिच्या मुलांसोबत मागील काही महिन्यांपासून परदेशातच मुक्काम आहे. ती नुकतीच मुंबईत आली असून एका कार्यक्रमात तिने हजेरी लावली होती. यावेळी पालक म्हणून तिचा अनुभव कसा आहे, याविषयी तिने उपस्थितांना काही रंजक गोष्टी सांगितल्या. (Anushka sharma reveals about her parenting experience) 

 

ती म्हणते की पालक होणं हे खरंच खूप अवघड काम आहे, तुम्ही पालक म्हणून परफेक्ट असलं पाहिजे असा  खूप मोठा दबाव तुमच्यावर असतो. पण प्रत्येकवेळी आपल्याला तो दबाव पेलणं शक्य होईलच असं नाही.

बघा मॅट लिपस्टिकला कसा द्यायचा ग्लॉसी लूक! सणासुदीला कामी येणारी भन्नाट ट्रिक- लगेच पाहा

त्यामुळे आम्ही दोघेही असं मानतो की पालकत्व ही एक प्रक्रिया असून आम्ही दोघेही अजून ते शिकतो आहोत. त्यामुळे आम्ही परफेक्ट नाही. ही गोष्ट आम्ही स्वत: मान्य करतो आणि आमच्या मुलांसमोरही मान्य करू. जेणेकरून त्यांनाही त्यांचे पालक कसे आहेत, याचं खरंखुरं आकलन होऊ शकेल.   

 

अनुष्का म्हणते की मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी तुमच्या 'इन्स्ट्रक्शन्स'पेक्षा तुम्ही घेतलेल्या 'ॲक्शन' महत्त्वाच्या आहेत, असं आम्हाला दोघांनाही वाटतं. बऱ्याचदा मुलांना आपण समजावून, सूचना देऊन काही गोष्टी शिकविण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्या लक्षात येत नाही.

विद्या बालन म्हणते, लोकांसाठी तुमच्या भावना महत्त्वाच्या नसतात; त्यांना फक्त हा प्रश्न पडतो की....

शिवाय वामिका सध्या अशा वयात आहे की तिला सूचना देण्यापेक्षा आमच्याकडे बघून ती जास्त शिकते. त्यामुळे आपण कसे वागतो हे फार महत्त्वाचं आहे. कारण मुलं नकळतपणे त्यांच्या पालकांचं बघूनच बऱ्याच गोष्टी शिकतात, यावर आमचा विश्वास आहे. अनुष्का म्हणते ते अगदी खरं आहे. मुलांना ओरडून, रागावून काही सांगण्यापेक्षा ते तुमच्या कृतीतून त्यांना शिकवा, तुम्ही जसं वागाल तसं ते आपोआप घडत जातील...

 

Web Title: Anushka sharma reveals about her parenting experience, says parenting is a tough job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.