Lokmat Sakhi >Parenting > लेकीला काय खाऊ घालावं, कसं मिळेल पोषण..? अनुष्कालाही सतावते चिंता, काय करावं पौष्टिक-आवडीचं

लेकीला काय खाऊ घालावं, कसं मिळेल पोषण..? अनुष्कालाही सतावते चिंता, काय करावं पौष्टिक-आवडीचं

कोणत्याही आईला वाटणाऱ्या काळजीसारखीच अनुष्का शर्मालाही काळजी वाटते ती आपल्या लेकीच्या पालन पोषणाची. हीच काळजी तिनं सोशल मीडियातून व्यक्त केली आहे. काय म्हणते अनुष्का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 06:29 PM2022-07-30T18:29:29+5:302022-07-30T18:36:37+5:30

कोणत्याही आईला वाटणाऱ्या काळजीसारखीच अनुष्का शर्मालाही काळजी वाटते ती आपल्या लेकीच्या पालन पोषणाची. हीच काळजी तिनं सोशल मीडियातून व्यक्त केली आहे. काय म्हणते अनुष्का?

Anushka Sharma shares about her challenges as being mother.. What mom Anushka says? | लेकीला काय खाऊ घालावं, कसं मिळेल पोषण..? अनुष्कालाही सतावते चिंता, काय करावं पौष्टिक-आवडीचं

लेकीला काय खाऊ घालावं, कसं मिळेल पोषण..? अनुष्कालाही सतावते चिंता, काय करावं पौष्टिक-आवडीचं

Highlightsअनुष्का म्हणते मूल झाल्यापासून आपलं आयुष्य बदलून गेलंय.वामिकाला खायल काय आवडतं, काय आवडत नाही? हे जाणून घेण्याचा आपण सतत प्रयत्न करतो असं अनुष्का सांगते. 

स्त्री जेव्हा आई होतं तेव्हा तिचं विश्व म्हणजे तिचं मूल असतं. आपल्या बाळाचं पालन पोषण करण्यात ती इतकी गढून जातं की त्याच्या पलीकडेही काही विश्व असतं याचा विसरच पडतो. मूल चांगलं खातं पितं होत नाही तोपर्यंत आईचं सर्व लक्ष बाळातच गुंतलेलं असतं. असं सर्वच आयांच्या बाबतीत होतं. याला बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)  तरी अपवाद कशी असेल? अनुष्काने नुकतीच वामिका विषयी वाटणारी काळजी सोशल मीडियातून व्यक्त केली आहे. प्रत्येक आईला असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न अनुष्काला देखील पडला आहे. त्या उत्तराचा शोध अनुष्का (Anushka Shama as mother)  सतत घेत असते.  अनुष्का सध्या आपल्या दीड वर्षाच्या मुलीच्या म्हणजेच वामिकाच्या (Vamika)  पालन पोषणात गढून गेलेली आहे. आपल्या मुलीसोबतचा प्रत्येक क्षण अनुष्का रसरसून जगते आहे. ज्या विषयावर एक आई म्हणून बोलावंसं वाटतं त्याबाबत ती मोकळेपणानं व्यक्तही होत आहे. अशाच एका पोस्टमधून अनुष्कानं तिच्यातल्या आईला वाटणारी काळजी (Anushka Sharma worry about)  व्यक्त केली आहे. 

Image: Google

अनुष्काला वाटणारी काळजी ही कोणत्याही आईला वाटत असलेल्या काळजीसारखीच आहे. आपल्या बाळाचं पालन पोषण नीट होण्यासाठी त्याला पौष्टिक खाऊ घालण्यावर प्रत्येक आईचा भर असतो.  मुलांसाठी काय पौष्टिक असेल, त्यांनी काय खावं, काय खायला नको याबाबतची माहिती आई झालेली स्त्री विविध माध्यमातून शोधत असते. सध्या अनुष्का एक आई म्हणून याच टप्प्यात आहे.

अनुष्का शर्मा  म्हणते की आई झाल्यापासून आपलं आयुष्य एकदम बदलून गेलं आहे. आपलं शरीर आणि मन सतत वामिका भोवतीच घुटमळत असतं. मूल वाढवण्याच्या , त्यांचं पालन पोषण करण्याच्या युक्त्या प्रत्येक आईकडे असतात. तरीही एक आई म्हणून तिला सतत चिंता असते.  ही चिंता असते आपल्या बाळाच्या आरोग्याची. आपलं मूल बरोबर खातंय ना, त्याचं व्यवस्थित पोषण होतंय ना, ते पुरेसं खेळतंय ना अशा अनेक चिंता प्रत्येक आईला असतात. आपल्यालाही हीच काळजी असल्याचं अनुष्का म्हणते. वामिकाला खायला काय आवडतंय, काय आवडत नाहीये हे जाणून घेण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो असं अनुष्का सांगते. 

Image: Google 

स्वत: वेगन असलेली अनुष्का वामिकाच्या पोषणाच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे. तिचं योग्य पोषण होण्यासाठी वामिकाच्या आहारात ज्वारी, नागली, ओटसचे घरगुती पदार्थ असतात. वामिकाच्या आहारात साखर, मैदा हे आरोग्यास नुकसानकारक पदार्थ अनुष्का कटाक्षानं टाळते. आपल्या मुलीसाठी पौष्टिक काय? असा प्रश्न , काळजी व्यक्त करुन या वयातल्या मुलांसाठी पौष्टिक काय असू शकतं याचं उत्तरंही अनुष्कानं आपल्या पोस्टमधून अनेक न्यू माॅम्सला दिलं आहे. 
 

Web Title: Anushka Sharma shares about her challenges as being mother.. What mom Anushka says?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.