एक स्त्री म्हटलं की एकाच वेळी ती अनेक नात्यांच्या बंधनात अडकली जाते. एक स्त्री आई, बायको, मुलगी, सून, काकी, मावशी अशी अनेक नाती एकाच वेळी तितकीच लिलया निभावून नेत असते. स्त्रीला एकाच वेळी या सगळ्या भूमिकांमधून जावे लागत असल्यामुळे ती या सगळ्या भूमिका अतिशय योग्यरितीने आणि परिपूर्ण पद्धतीने सांभाळते. स्त्री म्हटलं की तिला घर, स्वयंपाक, मुलं - बाळ, नातीगोती, स्वतःच करियर अशा असंख्य गोष्टी एकाच वेळी सांभाळाव्या लागतात. तिच्या एका हाती पाळण्याची दोरी असते तर दुसऱ्या हातात तितक्याच मोठ्या जबाबदाऱ्या असतात. या सगळ्यांत तिला तिच्यासाठी स्वतःचा असा वेळच मिळत नाही. काहीवेळा तर तिला या जबाबदाऱ्या पूर्ण करतानाच स्वतःच्या करियर आणि आवडीनिवडींकडे पाठ फिरवावी लागते. अशा किती जबाबदाऱ्या तिच्या जवळ असल्या तरीही ती अतिशय आनंदाने प्रत्येक जबाबदारी तितक्याच आवडीने पार पाडते.
क्रिकेटर विराट कोहली याची पत्नी आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या अभिनय कौशल्यामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या तिच्या कान्स डेब्यूमुळे चर्चेत आहे. अनुष्काचा कान्स डेब्यू हा तिच्यासारखा क्लासी होता असं म्हणायला हरक नाही. तिचे कान्समधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. एकीकडे कान्सची चर्चा सुरु असताना दुसरीकडे अनुष्का तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत अनुष्कानं केलेल्या वक्तव्यामुळे ती बॉलिवूडमधून ब्रेक घेणार का असा सवाल तिच्या चाहत्यांना पडला आहे. अनुष्का यावेळी म्हणाली की ती आता जास्त चित्रपट करणार नसून तिच्या मुलीसोबत वेळ घालवणार आहे(Anushka Sharma wants to do ‘one film a year’; Says her daughter Vamika ‘needs a lot more of my time’).
अनुष्का नेमकं काय म्हणाली....
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अनुष्काने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की, मी येणाऱ्या आगामी काळात जास्त संख्येने चित्रपट करणार नसून , वर्षाला केवळ एकच चित्रपट करणार आहे कारण आता मला माझ्या मुलीला वेळ द्यायचा आहे. तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. असे तिने स्पष्ट केले आहे. आपल्या मुलीच्या भविष्यासाठी वेळ द्यायचे सांगताना ती पुढे म्हणाली, मला अभिनय करताना खूप आनंद होतो, पण ज्याप्रमाणे मी आधी सतत चित्रपट करायचे तसे मी आता करणार नाही. मला एका वर्षात एकच चित्रपट करायचा आहे आणि त्यासोबत अभिनय करण्याची जी प्रोसेस आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं मला माझ्या आयुष्यात समतोल आणायचा आहे, जे मी सध्या माझ्या कुटुंबाला आणि कामाला देणाऱ्या वेळेत करत आहे."
मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? ८ टिप्स - मोबाइलशिवाय मुले जेवत झोपत नाही ही तक्रार संपेल...
४ दिवस लेकीपासून लांब, जीव तुटत होताच.. आलिया सांगते, लेकीला सोडून काम करतानाची तगमग....
पुढे आयुष्य कसं हवं आहे याविषयी बोलताना अनुष्का म्हणाली, "सध्या मी आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहे आणि जसं माझं आयुष्य आहे. ज्यात मी आनंदी आहे. याशिवाय मला कोणाला एक आई, एक अभिनेत्री, एक आयडल म्हणून काहीही सिद्ध करून दाखवायचं नाही. मला फक्त तेच करायचं आहे ज्यातून मला आनंद मिळतो, आणि जे करत असताना ते योग्य आहे असं मला वाटतं तेच मी करण्याचा निर्णय घेतला आहे. मी तेच करते जे मला योग्य वाटतं. यासाठी मला इतरांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही."
एवढूशा लेकानं आईला वाढला नाश्ता.. करिना कपूरची व्हायरल पोस्ट, जेहची तारीफ करत म्हणाली...
आलिया भट म्हणते, लेकीला छातीशी घट्ट धरलं आणि तिनं माझ्या चेहऱ्यावरुन हात फिरवला, तेव्हा वाटलं...
बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या प्यूमा कार्यक्रम जॅम विथ फॅममध्ये बोलताना, अनुष्का म्हणाली, "मला माहित आहे की माझी मुलगी आता ज्या वयात आहे त्या वयात तिला माझ्या वेळेची खूप जास्त गरज आहे. विराट एक चांगला पिता तर आहेच परंतु तो त्याच्या कामांमध्ये फारच गुंतलेला असतो. एक पालक म्हणून आम्ही दोंघांनी हा निर्णय घेतला आहे. आमची मुलगी वामिका आता सध्या ज्या वयात आहे त्या वयात तिला फक्त माझी जास्त गरज आहे. आम्ही पालक म्हणून ही गोष्ट ओळखून आहोत, म्हणून मी हे पाऊल उचलत आहे, असे अनुष्काने स्पष्ट केले आहे.