जस-जश्या पिढ्या बदलत जातात तस-तशी संगोपनाची पद्धतही बदलावी लागते. पिढीच्या कलाने विचार करावा लागतो. आजकाल 'पॅरेटींगच गंडल आहे' हे वाक्य आपण सारखं ऐकतो. "पालकांना मुलं सांभाळता येत नाहीत" असं लोक म्हणत असतात. (Are The Children Wasted Or The Parents?)पण असं का होतं त्या मागचं कारण काय असू शकतं? पुढच्या पिढ्यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यांचे संगोपन हे आधीच्या पिढ्यांसारखे करता येऊच शकत नाही. नवीन संवाद, नवीन बंधने असायला हवी. (Are The Children Wasted Or The Parents?)
आजकाल सगळेच खूप बदलले आहे. जेंडर इक्वालिटीपासून, जेंडर आयडेंटीफिकेशनपर्यंत सर्वच वेगळे आहे. तुमच्या पाल्याला तुमच्या मदतीची गरज अशा काळात फार आहे. या मुलांचे विचार पालकांना पचवणे फारच कठीण आहे. पण मुलांना सांभाळून घेणे ही गरजेचे आहे. (Are The Children Wasted Or The Parents?) वाढत्या मानसिक आजारांवर जर आळा घालायचा असेल तर, डॉक्टरांपेक्षा पालकांची भूमिका मोठी आहे. पालकांची एक चूक होते. जी फार वाईट निकालात रूपांतरित होते. पालक स्वत:ची स्वप्ने मुलांवर लादतात. यातूनच मुलांची मानसिकता बदलायला लागते. त्यांना त्यांच्या अनुसार निर्णय घेऊ द्या. चुकत असतील तर त्यांना सावरा. पण त्यांच्या मनानुसार आयुष्याचा मार्ग त्यांना निवडू द्या.
महत्त्वाचं म्हणजे स्वत:च्या पाल्याला त्यांच्या आवडी-निवडीं सकट स्वीकारा. पालकांच्या आशा, अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांची कला,हौस चिरडली जाते. त्यातूनच मुले डिप्रेशनमध्ये जायला लागतात. मानसिक स्वास्थ्यावर फार गंभीर परिणाम होतात. तुमच्यात आणि तुमच्या पाल्यात एक असे नाते हवे, जिथे मुलं दिलखुलास गप्पा मारू शकतील. त्यांच्या अडचणी तुम्हाला सांगतील. सोशल मिडियाच्या आहारी जाणारी ही पिढी आहे. सोशल मिडिया ब्रेनवॉश करू शकते. काय योग्य काय अयोग्य याची जाणीव त्यांना करू द्या. आपण बोलून मोकळे होतो की, "ही पिढी बिघडली आहे." पण आपण हा विचार करत नाही की, पालकांची देखील चूक असू शकते. आपल्या मुलांची मते हलक्यात घेऊ नका. त्यांचे मुद्दे ऐका. एंझायटीचे वाढते प्रमाण चांगले नाही. पोषक वातावरणात मुलांचे संगोपन होणे गरजेचे आहे.