Lokmat Sakhi >Parenting > मुलांना वाढवताना नकळत पालकांकडून होतात ४ चुका; आईबाबा म्हणून आपलंही चुकतं का? तपासून पाहा..

मुलांना वाढवताना नकळत पालकांकडून होतात ४ चुका; आईबाबा म्हणून आपलंही चुकतं का? तपासून पाहा..

Avoid these Mistakes While Upbringing Child Patenting Tips : मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी फक्त इतकंच करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2023 05:02 PM2023-02-22T17:02:19+5:302023-02-22T18:09:44+5:30

Avoid these Mistakes While Upbringing Child Patenting Tips : मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी फक्त इतकंच करा...

Avoid these Mistakes While Upbringing Child Patenting Tips : 4 unknowing mistakes parents make while raising children, pay attention in time, otherwise... | मुलांना वाढवताना नकळत पालकांकडून होतात ४ चुका; आईबाबा म्हणून आपलंही चुकतं का? तपासून पाहा..

मुलांना वाढवताना नकळत पालकांकडून होतात ४ चुका; आईबाबा म्हणून आपलंही चुकतं का? तपासून पाहा..

मुलं ही एखाद्या टिपकागदाप्रमाणे असतात असं आपण नेहमी ऐकतो. आपण त्यांच्याशी जसे वागतो, बोलतो तसे ते घडत जातात. आपल्या वागण्या-बोलण्याचा त्यांच्या मनावर दिर्घकाळ परीणाम होत असतो. हा परिणाम चांगला आणि वाईट दोन्हीही होत असतो. आई-वडील हेच मुलांसमोरील सर्वात पहिला आदर्श असल्याने आपल्या प्रतिक्रिया, आपल्या म्हणण्याचा मुलांच्या मनावर खोलवर परीणाम होत असतो. अनेकदा आपल्याही नकळत आपण मुलांना काहीतरी सांगतो किंवा बोलून जातो. पण त्या लहानग्यांच्या मनावर आणि मेंदूवर त्याचे उमटलेले ठसे दिर्घकाळ तसेच राहतात. त्याचा त्यांच्या इवल्याशा जीवावर नेमका काय परीणाम होतो आणि मुलांना वाढवताना आपण नेमक्या कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, याविषयी (Avoid these Mistakes While Upbringing Child Patenting Tips)...

१. आनंदी मूल हवे? 

तर मुलांची त्यांच्या बरोबरीच्या इतर मुलांशी अजिबात तुलना करु नका. आपण अनेकदा नकळत अभ्यासाच्या बाबतीत, खेळात, कलागुणांच्या बाबत मुलांची नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी यांच्याशी तुलना करतो, त्यामुळे मुलं नकळत हिरमुसली जातात आणि ती दु:खी होतात. 

२. आत्मविश्वासू मूल हवे?

आपण मुलांना सतत असं कर, तसं कर असं सांगतो. सतत त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना सतत करेक्ट करायला आणि त्यांना टोकायला जाऊ नका.

३.  मुलांनी चांगलं वागावं असं वाटतं?

मुलांचा राग आणि हट्टीपणा याला प्रोत्साहन देणे चुकीचे आहे. मूल चुकत असेल तर त्याला कितीही हट्टीपणा केला तरी त्याचे ऐकून घेऊ नका. म्हणजे काय चूक आणि काय बरोबर हे मुलांना कळणे सोपे जाईल.

४. मुलांना जबाबदारी कळावी असं वाटतं?

मुलांना त्यांची जबाबदारी वयानुसार कळावी असं वाटत असेल तर त्यांना जास्त प्रोटेक्ट करु नका. तसेच त्यांच्यासाठी सतत काही करण्याचीही आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांना त्यांची जबाबदारी वेळीच समजणार नाही. 
 

 

Web Title: Avoid these Mistakes While Upbringing Child Patenting Tips : 4 unknowing mistakes parents make while raising children, pay attention in time, otherwise...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.