Lokmat Sakhi >Parenting > मुलांची एकाग्रता वाढून अभ्यास करतील पटापट, फक्त ३ गोष्टी करा- मुलं होतील हुशार- गुणी

मुलांची एकाग्रता वाढून अभ्यास करतील पटापट, फक्त ३ गोष्टी करा- मुलं होतील हुशार- गुणी

Parenting Tips: मुलं एकाजागी शांतपणे बसून अभ्यासच करत नाहीत, असं अनेक जणींचं म्हणणं असतं. तुमचंही हेच म्हणणं असेल या ३ गोष्टी करून पाहा. (3 remedies for making your child more confident and more focused)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 09:07 AM2024-02-27T09:07:08+5:302024-02-27T09:10:01+5:30

Parenting Tips: मुलं एकाजागी शांतपणे बसून अभ्यासच करत नाहीत, असं अनेक जणींचं म्हणणं असतं. तुमचंही हेच म्हणणं असेल या ३ गोष्टी करून पाहा. (3 remedies for making your child more confident and more focused)

Ayurvedic tips for making your child more focused on studies, How to increase the concentration of kids, 3 remedies for making your child more confident and more focused | मुलांची एकाग्रता वाढून अभ्यास करतील पटापट, फक्त ३ गोष्टी करा- मुलं होतील हुशार- गुणी

मुलांची एकाग्रता वाढून अभ्यास करतील पटापट, फक्त ३ गोष्टी करा- मुलं होतील हुशार- गुणी

Highlightsमुलांची अभ्यासातली एकाग्रता वाढवायची असेल तर त्यांच्यासाठी या काही गोष्टी करून पाहा.

काही बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर मुलांचा अभ्यास घेणं किंवा त्यांना अभ्यासाला बसवणं हे बहुतांश आई लोकांसाठी अतिशय कठीण काम असतं. टीव्ही पाहात तासनतास एकाजागी बसणारी मुलं अभ्यासाला बसली की मात्र प्रचंड चंचल होऊन जातात. अजिबात शांत चित्ताने बसत नाहीत. त्यामुळे त्यांचा अभ्यास होतच नाही. अशा मुलांची अभ्यासातली एकाग्रता वाढवायची असेल तर त्यांच्यासाठी या काही गोष्टी करून पाहा. यामुळे अभ्यासावरचा त्यांचा फाेकस वाढेल आणि ते पटापट अभ्यास संपवून टाकतील (How to increase the concentration of kids). शिवाय शांतपणे, एकाग्रतेने अभ्यास करण्याची सवय लागल्याने त्याचा चांगला परिणाम आपोआपच त्यांच्या परिक्षेतल्या मार्कांवर दिसून येईल. (Ayurvedic tips for making your child more focused on studies)

मुलांची अभ्यासातली एकाग्रता वाढण्यासाठी उपाय

 

मुलांची अभ्यासातली एकाग्रता वाढण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा व्हिडिओ baby_led_parenting या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

"अपघातानंतर पाठीत भयानक दुखत होतं, तरीही शुटींग केलं, कारण....", हिना खानला का करावं लागलं असं?

पहिला उपाय

ज्याप्रमाणे आपल्या शरीराला योग्य पोषण मिळण्याची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या मेंदूलाही उत्तम आहाराची गरज असते. यासाठी मुलांना तूप, अक्रोड, भिजवलेले बदाम, हंगामी फळं, मनुका, सगळ्या डाळी, जीरे, मिरे हे पदार्थ नियमितपणे खायला द्या.

 

दुसरा उपाय 

ज्या पदार्थांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर असतात, अशा पदार्थांची गरज आपल्या मेंदूलाही असते. त्यामुळे मुलांच्या पोटात ब्रोकोली, टरबूज, टोमॅटो, बीटरुट, गाजर, रताळी, भोपळा हे पदार्थ जातील याची काळजी घ्या.

वेटलॉस करायचा आणि त्वचेवर छान ग्लो देखील पाहिजे? रोज प्या 'मॅजिकल वॉटर'- बघा कमाल

तिसरा उपाय

मुलांची रात्रीची झोप शांत आणि पूर्ण होईल याकडेही लक्ष द्या. मुलं जेव्हा झोपतात तेव्हा त्यांच्या शरीरात ह्युमन ग्रोथ हार्मोन तयार होत असतो. या हार्मोन्समुळे मुलांची स्नायू, हाडं बळकट होण्यास मदत होते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढून मेंदूचा विकास होण्यासाठीही फायदा होतो. त्यामुळे मुलांच्या झोपेकडेही कटाक्षाने लक्ष द्या. 

 

 

Web Title: Ayurvedic tips for making your child more focused on studies, How to increase the concentration of kids, 3 remedies for making your child more confident and more focused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.