Lokmat Sakhi >Parenting > तुमचं मूल दिवसाला किती दूध पिते? दात किडलेत, वजन वाढलेय का? बालरोगतज्ज्ञ सांगतात..

तुमचं मूल दिवसाला किती दूध पिते? दात किडलेत, वजन वाढलेय का? बालरोगतज्ज्ञ सांगतात..

Babies Constantly Having Milk even after 6 Months : तो खातच नाही, मग उपाशी कशी ठेवू म्हणून दूध देते , असे म्हणणाऱ्या पालकांची जास्त चूक असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2023 02:51 PM2023-04-09T14:51:30+5:302023-04-09T14:56:14+5:30

Babies Constantly Having Milk even after 6 Months : तो खातच नाही, मग उपाशी कशी ठेवू म्हणून दूध देते , असे म्हणणाऱ्या पालकांची जास्त चूक असते.

Babies Constantly Having Milk even after 6 Months : How much milk does your child drink a day? Tooth decay, weight gain? Pediatrician says.. | तुमचं मूल दिवसाला किती दूध पिते? दात किडलेत, वजन वाढलेय का? बालरोगतज्ज्ञ सांगतात..

तुमचं मूल दिवसाला किती दूध पिते? दात किडलेत, वजन वाढलेय का? बालरोगतज्ज्ञ सांगतात..

डॉ. कल्पना सांगळे 

3 वर्षाचा धवल केबिन मध्ये आला . गुबगुबीत गोबरे गाल ,अपेक्षित वजनापेक्षा 2 किलो जास्तच असलेले वजन ,पण पांढराफटक ! 

 आल्या आल्या मी आईला विचारले ,"  दिवसाला किती लिटर दूध पितो हा ?"

 आणि मला अपेक्षित उत्तर आले ! " दोन लिटर तरी पीत असावा "

या अशा मुलांना मी मिल्कबेबी म्हणते ! बकरीच्या लेंडयांसारखी शी करणारे ,आणि वारंवार सु सु करणारे. सतत आजारी पडणारे , आणि सतत कधी कॉन्स्टिपेशन नाही तर जुलाब लागणारे . सतत किरकिर करणारे , निरुत्साही आणि चावून जेवण न करणारे. पुढचे दात हमखास किडलेले किंवा किडायला लागलेले असणारे .त्यांना घास चावून खाण्याची सवय नसते ,किंबहुना ती लावलेली नसते. अशी मुलं मोठी झाली तरी नुसती पेज ,पातळ पदार्थ  आणि बाटली किंवा ग्लासमधून दूध पित असतात! हेच त्यांचे अन्न असते. इथे मुलांची चूक नसते, तो खातच नाही, मग उपाशी कशी ठेवू म्हणून दूध देते , असे म्हणणाऱ्या पालकांची जास्त चूक असते (Babies Constantly Having Milk even after 6 Months). 

(Image : Google)
(Image : Google)

आता दिवसाला इतक्या जास्त प्रमाणात दूध पिणाऱ्यांना इतर पदार्थांची गोडीच लागत नाही. यावर उपाय म्हणजे त्वरित त्यांचे दूध ,फक्त 250ml प्रति दिवस ,एवढे कमी करावे . त्यांना आपल्या ताटातील अन्न खाऊ घालायला शिकवावे, भले अजून एक दोन किलो वजन कमी झाले तरी चालेल. पण स्वतःच्या दातांनी चावून खायला शिकवा. एका दिवसात बदल होणार नाही, पण हळू हळू नक्की होईल.  या मुलांना आवर्जून घरचे ताजे जेवण द्यावे. बिस्किटे, चिप्स, चॉकलेट, मॅगी, बेकरी पदार्थ अजिबात देऊ नये. 

(Image : Google)
(Image : Google)

मिल्कबेबीचे  हेल्दीबेबी बनवायला सुरुवात व्हायला हवी ,नाहीतर अशी लेकरे वारंवार आजारी पडतात आणि आहेत त्याहून कृश होत जातात. दूध हे पूर्णान्न आहे असे आपण अनेकदा ऐकतो. पण  6 महिन्यांवरील मुलांसाठी ते पूर्णान्न नक्कीच नाही. म्हणूनच दूध पूर्णान्न आहे या भ्रमातून पालकांनी बाहेर पडले पाहिजे. तरच मुलं पोषक, सर्वसमावेशक असा आहार घेतील आणि त्यांची तब्येत सुधारण्यास मदत होईल. अन्यथा मुलांच्या आरोग्याचा पायाच कच्चा राहील. 


(लेखिका बालरोगतज्ज्ञ आहेत.)

 

Web Title: Babies Constantly Having Milk even after 6 Months : How much milk does your child drink a day? Tooth decay, weight gain? Pediatrician says..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.